व्यापाऱ्यांचे धान्याला प्राधान्य दिल्याने गदारोळ

 

राजीव चंदने
मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांचे धान्य खरेदी विक्री संघा मार्फत हमी भावाने खरेदी होत असल्याने त्याचा टोकन घेण्यासाठी आपला नंबर लागेल की नाही यासाठी कडाक्याचे थंडीत हजारो शेतकरी मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानात उघड्यावर झोपले असताना संघाकडून व्यापारी वर्गाला टोकन दिले जात असल्याने खरेदी विक्री संघाचे कारभारावर शेतकऱ्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन संघाचे पदाधिकारी व शेतकरी यामध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकविलेले धान्य हे शेतात पाणी साठल्यामुळे सडले असताना थोडेफार उरलेले धान्य आपल्या घरात आणुन त्यातील आपल्या परिवाराचे पोटाची खळगी भरण्यासाठी ठेवले.व उर्वरित धान्य शासन हमी भावाने खरेदी करत असल्याने ते खरेदी विक्री संघात देण्यासाठी संघाने पंचवीस नोव्हेंबर रोजी टोकन घेण्याचे आवाहन करताच आपले धान्य लवकरात लवकर कसे देता येईल यासाठी टोकन घेण्यासाठी भगवान यादव भालेराव.मु.विढे.बाळकृष्ण हरड.मु.नारिवली.पुंडलिक हरणे.मु.केदुर्ली यांचेसह हजारो शेतकऱ्यांनी चोवीस तारखेच्या रात्री बाजार समितीचे मैदानात कडाक्याचे थंडीत मुक्काम केला असताना संघाचे कर्मचारी हे व्यापारी वर्गाचे व धनदांडग्या शेतकऱ्यांचे एकाच कुटुंबातील चार पाच टोकन धान्य खरेदी करण्यासाठी टोकन देण्यात प्राधान्य देत असल्याने रात्रभर जागरण केलेल्या शेतकऱ्यामध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि काही काळ वातावरण तंग बनले. अखेर पोलिसांनी धाव घेतली असता वातावरण शांत केले.
कोट
खरेदी विक्री संघ धान्य खरेदीत नेहमीच सावळागोंधळ करत असल्याने व्यापाऱ्यांचे धान्य घेतले जाते व कष्टकरी शेतकरी वंचित राहिला जातो. हे सहन केले जाणार नाही *——-,भगवान भालेराव.विढे.
कोट
आज टोकन देण्याचा पहिलाच दिवस असल्याने शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे कामकाजावर परिणाम झाला होता.——किसन गिरा.चेअरमन.खरेदी विक्री संघ.मुरबाड.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *