ठाणे : बालविवाह प्रतिबंध दिनानिमित्त ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व सेवा संस्था/महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट (डॉ. कैलास सत्यर्थी फाऊंडेशन संलग्न भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह या अनिष्ट प्रथेविरुध्द जिल्ह्यात चित्ररथ हा दि.27 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
27 नोव्हेंबर हा बालविवाह प्रतिबंध दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये जाणीव जागृती दिन साजरा करण्यात येतो. ठाणे जिल्ह्यातही यानिमित्त बालविवाह प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व सेवा संस्था/महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट (डॉ. कैलास सत्यर्थी फाऊंडेशन संलग्न भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने 27 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येणार आहे.
या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्टनाका, ठाणे पश्चिम येथे सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत करण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे.
00000
