मुंबई : तायक्वांदो जळगाव जिल्हा, तायक्वांदो असोसिएशन, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सब जुनिअर तायक्वांदो स्पर्धेत मुंबईच्या एस डब्ल्यूज अकादमीच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करताना चार सुवर्ण, एक रौप्य आणि‌ तीन अशी एकूण आठ पदके पटकावली. त्यांच्या दुर्वा गुरव, अंतरा कश्यप, श्रीया पाडावे, रुद्र जाधव यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. स्पृहा जानकरने रौप्य पदकाची कमाई केली तर जान्हवी पांगा, समर्थ घोमन, स्वराज तोरसकर यांनी कांस्यपदक मिळविली. सुवर्णपदक विजेते खेळाडू हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये दूर्वा संतोष गुरवने *बेस्ट फायटर*चा किताब पटकावला. हे सर्व पदकविजेते खेळाडू संतोष वाळुंज, राज चकोर, असद वली आणि समीर लवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सेंट्रल येथे नियमीत सराव करतात. पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे खास अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष दीपक शेडे, संजय जेधे, रुतुराज, तावडे सर यांनी केले आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *