विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आयोजन

 

ठाणे : महायुतीच्या विजयासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार, निवडणूक अभ्यासक भाऊ तोरसेकर यांचे व्याख्याने ठाण्यात शुक्रवारी होणार आहे. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने नौपाड्यातील हितवर्धिनी सभेच्या मैदानावर शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी ही माहिती दिली.
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या विजयाची खात्री सर्वप्रथम दिली होती. या पार्श्वभूमीवर `कारणं महायुतीच्या विजयाची, भाजपाच्या यशाची’ या विषयावर भाऊ तोरसेकर यांचे शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेलगतच्या हितवर्धिनी सभेच्या मैदानात व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाला नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *