जयेश पाटील,
पालघर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दौलत दरोडा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून यांच्यात चुरशीचीची लढत पाहायला मिळाली. यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दौलत दरोडा हे 1671 मतांनी निवडून आले आहेत. दौलत दरोडा यांच्या विजयात वाडा तालुक्यात येणाऱ्या 49 बुथवर मिळालेल्या 3 हजार 946 मतांची आघाडी निर्णायक ठरली असून या मतांच्या निर्णायक आघाडीने दौलत दरोडा यांना तारले आहे.
लोकसभेतील आघाडी टिकवण्यात निलेश सांबरेना अपयश
तर लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेतलेल्या निलेश सांबरे यांच्या रंजना उघडा या उमेदवार तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या असून त्यांना वाडा तालुक्यातील एकाही बुथवर मतांची आघाडी घेता आली नाही तर पांडुरंग बरोबर यांना फक्त 9 बुथवर किरकोळ आघाडी घेता आली आहे.
शहापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 329 बूथ असून यात वाडा तालुक्यातील 49 बुथचाही समावेश आहे. शहापूर विधानसभेत येणाऱ्या वाडा तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटात अजित दादांचे राष्ट्रवादीच्या या विद्यमान सदस्य आहेत तर याच गटातील गारगाव गणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पूनम पथवा या पंचायत समिती सदस्य तर दुसऱ्या डाहे गणात रघुनाथ माळी हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य आहेत. मोज गटात शिवसेना (उबाठा)चे अरुण ठाकरे तर मोज पंचायत समिती गणात शिवसेना (शिंदे) चे सागर ठाकरे हे पंचायत समिती सदस्य आहेत. अबिटघर जिल्हा परिषद गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भक्ती वलटे या जिल्हा परिषद सदस्य असून अभिर गणात अजित दादांच्या राष्ट्रवादीचे जगदीश पाटील हे विद्यमान सभापती व पंचायत समिती सदस्य आहेत. तर कुडुस पंचायत समिती गणातील कोंढले ग्रामपंचायतमधील म्हसवल गाव व पाडे शहापूर विधानसभेत जोडलेले आहेत. वाडा तालुक्यातील 49 बूथमधील राजकीय परिस्थिती अशा प्रकारे असताना वाडा तालुक्यातील 49 बुध मध्ये 3 हजार 946 एवढी निर्णायक आघाडी देऊन आमदार दरोडा यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये राष्ट्रवादी (अप) चे उमेदवार दौलत दरोडा यांना 14069 राष्ट्रवादी (शप) चे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना 10153 तर निलेश सांबरे यांच्या उमेदवार रंजना उघडा यांना 4705 एवढी मते मिळाली असून त्या तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या आहेत.
कोट
वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये येणाऱ्या गाव – पाड्यात आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असून मी स्वतः जिल्हा परिषद सभापती म्हणून केलेल्या कामांचाही आम्हाला फायदा झाला आहे.
रोहिणी शेलार
सभापती : महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पालघर
कोट
वाडा तालुक्यातील मताधिक्य मिळविण्यासाठी विरोधकांनी आमच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र वाडा तालुक्यातील 49 बूथ मधील सुज्ञ मतदार राजाने आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांची पोच पावती आमदार दौलत दरोडा यांना दिली आहे.
जयेश शेलार
अध्यक्ष : राष्ट्रवादी (अजितदादा) वाडा तालुका
००००