एकदा वापरून फेकून देण्याजोग्या ( सिंगल युज ) प्लास्टिकचा वापर सर्रास होताना दिसत आहे. सिंगल युज प्लास्टिक मध्ये प्लास्टिकचे कप, पिशव्या, पॉलिथिन, स्ट्रॉ, पाण्याची बाटली, प्लेट, अन्न पदार्थ ठेवण्यासाठी झाकण्यासाठी वापरण्यात येणारे पॅकिंग कागद, प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळ्या यांचा समावेश होतो. सहज उपलब्ध होत असल्याने जो तो सिंगल युज प्लास्टिकचा वापर करतो. सहज आणि कमी पैशात उपलब्ध होत असल्याने सिंगल युज प्लास्टिकचा वापर वाढला आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो टन सिंगल युज प्लास्टिकचा वापर केला जातो. भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सिंगल युज प्लास्टिकचा कचरा बायोडीग्रेडिबल म्हणजे कंपोस्ट होऊ शकत नाही. सिंगल युज प्लास्टिक जाळूनही नष्ट होत नाही. तो मायक्रो कणांच्या माध्यमातून आस्तित्वात राहतो. सिंगल युज प्लास्टिक जाळण्याचा प्रयत्न केला तर वायू प्रदूषण होते. हा कचरा जमिनीखाली दबला तर पाण्याच्या स्त्रोतांना अडथळा निर्माण करतो. हे सिंगल युज पलिस्टक नदी, विहीर, तलावात टाकले तर जलस्त्रोत खराब होतात. नदीतून वाहून सिंगल युज प्लास्टिक समुद्रात जाऊन साठते. सिंगल युज प्लास्टिकमुळे जलचारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सिंगल युज प्लास्टिकचे कण जलचरांच्या पोटात जात असल्याने त्यांचे आस्तीत्वाच धोक्यात आले आहे. सिंगल युज प्लास्टिक नष्ट होत नाही. पाण्यात, जमिनीत मायक्रो कण वर्षानुवर्ष राहतात. सिंगल युज प्लास्टिकमुळे जलप्रदूषणही होते. सिंगल युज प्लास्टिक कचरा कुंडीत टाकला जातो. हा कचरा गुरांकडून खाल्ला जातो. त्यामुळे गुरांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. एकूणच सिंगल युज प्लास्टिक मुळे जल, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
मनुष्यप्राण्यांसह इतर जैवविविधतेला सिंगल युज प्लास्टिकमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. सिंगल युज प्लास्टिकमुळे पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. सिंगल युज प्लास्टिक मानवी आरोग्यासाठी तसेच जैवविविधतेसाठी हानिकारक असल्याने त्याचा वापरावर सरकारकडून टप्पा टप्प्याने निर्बंध लादले जात आहेत. निर्बंधासोबतच सिंगल युज प्लास्टिकचे दुष्परिणाम नागरिकांपर्यंत पोहचिण्यासाठी सरकारने जनजागृती करायला हवी. सरकारने सिंगल युज प्लास्टिकचे दुष्परिणाम लोकांना समजावून सांगायला हवेत. शाळा कॉलेजमधून देखील याबाबत प्रबोधन करायला हवे. प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन कारणे आणि सिंगल युज प्लास्टिक वस्तूंचा वापर कमी करणे या दोन्ही विषयी जाणीव जागृती होणे, हे अत्यंत महत्वाचे आहे. सिंगल युज प्लास्टिकमुळे संपूर्ण सजीव सृष्टीलाच धोका निर्माण झाल्याने नागरिकांनीच सिंगल युज प्लास्टिक पासून दूर राहायला हवे. सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर निर्बंध लादले जात असेल तरी त्याचा वापर कमी होताना दिसत नाही. त्यामुळे या प्लास्टिकचे दुष्परिणाम जाणून घेत नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करणे हाच भविष्यात मानवजीवन व जैव विविधता राखण्याचा मार्ग आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५