हाणूमधील घटनेने खळबळ
कासा : डहाणू तालुक्यातील एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंकी डोंगरकर ( २६) असे या गर्भवती महिलेचे नाव आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यातील सारणी गावातील पिंकी डोंगरकरला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने मंगळवारी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आधीच तिची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. रुग्णवाहिका वेळेवर दाखल न झाल्याने पिंकीला उपचारासाठी वेळेवर दाखल करण्यास उशीर झाल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सिल्वासा येथे पोहोचण्याआधीच अर्ध्या रस्त्यात पिंकी डोंगरकर आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला.
प्रकृती गंभीर असताना गर्भवती महिला कासा उपजिल्हा रुग्णालयात आली होती. तिला तत्काळ उपचार करून तिची प्रकृती स्थिर करून लगेच अधिक उपचारासाठी पुढे आमच्या रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले.- डॉ. सचिन वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कासा
0000