मुरबाड शहरी व ग्रामीण भागात राजरोसपणे गुटखा विक्री सुरु
मुरबाड : (राजीव चंदने )
संपूर्ण मुरबाड शहरात व तालुक्यात छुपा पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू याबाबत तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलिस प्रशासनाला खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गुटखा विक्रीला महाराष्ट्रात बंदी असली तरी तो बिनधास्तपणे दुध डेयरी, पानटपरी व वडापाव गाडीवर चोरून विकला जात आहे. शहरातील रस्ते, शासकीय कार्यालय, बस स्थानक परिसर तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी गुटका थुंकल्याचे ताजे ठसे हमखास नजरेस पडत असतात. मुरबाड तालुक्यात किमान दर महिन्याला लाखोंचा गुटखा विक्री होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, या गुटख्याचे होलसेल व्यापारी दररोज तालुक्यातील रस्त्यांवरून या गुटख्याची बिनदास्तपणे वाहतूक करीत असल्याची चर्चा उघड चर्चा आहे. मात्र असे असतांना गेल्या पाच ते सहा वर्षात मुरबाड पोलीस ठाण्यात एक ही गुन्हा दाखल नसल्याची खंत नागरिक करीत आहेत, अनेक वृत्तपत्रात गुटखा माफिया बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई का झाली नाही? असा सवाल मुरबाड शहरातील शिवसेना पक्षाचे (उ. बा. ठा.) कार्यकर्ते नरेश देसले यांनी उपस्थित केला आहे.
शहर व ग्रामीण भागातील गुटखा विक्रेते यांच्या विरोधात आम्ही अनेकदा तक्रारी केल्या परंतु या गुटखा माफियाना पोलिसांचा अभय असल्यामुळे ते बिनधास्त पणे खुलेआम गुटखा विक्री करीत आहेत, या संदर्भात आम्ही मुरबाड पोलीस यांच्याकडे पुन्हा एकदा लवकरच तक्रार करणार आहोत,आणि त्या गुटखा माफियावंर मुरबाड पोलिसांना कडक कारवाई करण्यास भाग पाडू आणि कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू —–नरेश देसले, शिवसेना(उ.बा.ठा )कार्यकर्ते
000000