कल्याण : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल लिहून महिलांना सामानतेचा अधिकार देऊन संविधानात तशी तरतूद करून समस्त महिला वर्गावर, लाडक्या बहिणीवर, लाडक्या सुना लेकीवर उपकार केले आहेत असे उदगार डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी भीमशक्ती क्रांतिकारी संघटना हाजीमलंग विभाग यांच्या वतीने कल्याण कोळेगाव येथे संविधान दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना काढले. अध्यक्षस्थानी भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोईर होते.
स्रियांना सामानतेचा अधिकार, वडिलांच्या संपतीत मुलीला हिस्सा, घटस्फोटचा अधिकार, नोकरदार स्रियांना बाळंतपणात भरपगारी रजा आदि बाबत संविधानात तरतूद केली आहे. स्रियांच्या अधिकारासाठी लोकसभेत मांडलेले हिंदू कोड बिल पास होत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला होता असे ही राहुल हंडोरे म्हणाले.
संविधान दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भीमशक्ती क्रांतिकारी संघटनेचे सचिव गुरुनाथ जाधव, कार्याध्यक्ष शैलेंद्र पवार, युवा अध्यक्ष सागर भोईर, खजिनदार रतन जाधव, युवा उपाध्यक्ष महेंद्र गायकवाड, समाजसेवक सतीश जगताप, आदीची भाषणे झाली. कामगार नेते, पत्रकार मिलिंद वानखेडे यांनी इ व्ही एम विरोधात आंदोलन करण्याचे जनतेला आवाहन केले. बौद्धचार्य प्रदीप जाधव यानी बुद्ध वंदना घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते प्रवीण जाधव यांनी केले. शेवटी संविधान उद्देशीकाचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
00000