Month: November 2024

मिहीर शहा आणि त्याच्या चालकाची अटक कायदेशीरच

 वरळी येथील हिट अँण्ड रन प्रकरण : मुंबई : वरळी येथील अपघाताप्रकरणी शिवसेना (एकनाथ शिंद) नेत्याचा मुलगा मिहीर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांना झालेली अटक ही कायदेशीरच होती. त्यात काहीच बेकायदा नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने सोमवारी दोघांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. अटक करताना ती करण्याची कारणे आपल्याला सांगण्यात आली नव्हती, असा दावा करून मिहीर आणि बिडावत यांनी अटकेला आव्हान दिले होते. तसेच, अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दोघांची अटक कायदेशीर ठरवून त्यांच्या याचिका फेटाळला. दरम्यान, याचिकांवरील युक्तिवादाच्या वेळी एखाद्या व्यक्तिला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे ही निव्वळ एक औपचारिकता असते. मद्यपान करून बेदरकारपणे गाडी चालवणे आणि सदोष मनुष्यवधासाठी कारणीभूत ठरण्याच्या प्रकरणात तर या नियमाचे पालन न केल्याने फारसा फरक पडत नाही, असे खंडपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले होते. तसेच. गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगितले नसल्याचा दावा करून अटकेला आव्हान देणाऱ्या मिहीर आणि बिडावत यांच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. त्यानंतरही त्याला अटकेचे कारण माहिती नाही ? अटकेचे कारण सांगितले नाही म्हणून त्यांची अटक ही बेकायदा कशी ठरते ? प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार, कार्यवाही करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. याचिकाकर्त्यावरील आरोप लक्षात घेता त्याने मद्याच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर, धडकेमुळे, दुचाकीवरून पडलेल्या महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. एवढेच नाही, तर याचिककर्ता इतका घाईत होता की तो फास्टॅग कार्ड मागे विसरला, त्याचाही त्याला विसर पडला. त्यामुळे, या प्रकरणाकडे उदाहरण म्हणून पाहण्याची गरज आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली मिहीर याच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करताना केली होती. आरोपीला त्याने केलेल्या कृत्याची माहिती असतानाही निव्वळ औपचारिकता म्हणून त्याला ताब्यात घेत असल्याची माहिती द्यावी लागते. परंतु, सर्वकाही माहिती असूनही आपल्याला अटकेचे कारण सांगितले नाही हा मिहीर याचा दावा आश्चर्यकारक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. प्रकरण काय ? मिहीर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. त्याच्यावर मद्याच्या नशेत भरधाव बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा (४५) या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. मिहीरने ९ जुलै रोजी मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवताना नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे जमिनीवर पडलेल्या कावेरी यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्याने गाडीनेच दीड किमीपर्यंत फरफटत नेले होते. यात कावेरी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून पळून गेला. राजेश शहा यांनाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, त्यांना जामीन मिळाला आहे.

डोंबिवली जवळील अप्पर कोपर रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा रेल्वे मार्गातून प्रवास

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे बहुतांशी प्रवासी जिन्यावरून चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी आणि मधला मार्ग म्हणून रेल्वे मार्गातून प्रवास करत आहेत. दररोज…

नाशिक जिल्ह्यात केवळ १६ उमेदवारांना अनामत वाचविणे झाले शक्य

हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघात मोठ्या फरकाने महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवल्याने अनेक ठिकाणी प्रमुख प्रतिस्पर्ध्यासह पराभूत इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली. १५ मतदारसंघात १९६ पैकी १६५ म्हणजे ८४ टक्के उमेदवारांनी ही रक्कम गमावली. केवळ १६ उमेदवार आपली अनामत वाचवू शकले. विधानसभेच्या जिल्ह्यातील १५ पैकी १४ जागांवर एकहाती विजय मिळवत महायुतीने महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडवला. राष्ट्रवादीने (अजित पवार) सर्वाधिक सात, भाजपने पाच तर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दोन आणि एमआयएमने एक जागा मिळवली. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांसह काँग्रेसचा दारूण पराभव झाला. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये भरावे लागतात. अनामत रक्कम परत मिळण्यासाठी उमेदवाराला एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते (१६.३३ टक्के) मिळणे आवश्यक असते. निवडणुकीत मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाल्यास प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवाराला अनामत वाचविणे शक्य होत नाही. ज्यांना तेवढी मते मिळतात, केवळ त्याच उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळते. उर्वरितांना ती गमवावी लागते. जिल्ह्यात १६५ उमेदवार तेवढी मते मिळवू शकले नाहीत. संबंधितांना अनामत रक्कम गमवावी लागली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव बाह्य, बागलाण आणि इगतपुरी मतदारसंघात प्रत्येकी १६ उमेदवार होते. मतदानासाठी या ठिकाणी दोन मतदार यंत्रांचा वापर करावा लागला. नाशिक पश्चिममध्ये १५ तर नाशिक मध्य चांदवड आणि नांदगावमध्ये प्रत्येकी १४ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात बागलाणमध्ये भाजपचे दिलीप बोरसे १ लाख २९ हजार या सर्वाधिक फरकाने विजयी झाले. या मतदारसंघात दोन लाख तीन हजार मतदान झाले होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवारास ३३ हजार मते मिळणे अपेक्षित होते. परंतु, शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण यांना ३० हजार ३८४ मते मिळाली. तशीच स्थिती इगतपुरी मतदारसंघातही झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हिरामण खोसकर यांनी ८६ हजार ५८१ च्या मताधिक्याने विजय मिळवला. या मतदारसंघात एकूण मतदान दोन लाख १४ हजार इतके झाले होते. प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे लकी जाधव यांना अनामत रकमेसाठी ३५ हजार मते मिळणे आवश्यक होते. तथापि, त्यांना ३० हजार ९९४ मते मिळाली. बागलाणमध्ये दीपिका चव्हाण आणि इगतपुरीत लकी जाधव या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांनाही अनामत रक्कम गमवावी लागली. उर्वरित १३ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावरील नाशिक पश्चिम मतदारसंघ वगळता १२ मतदारसंघात उमेदवारांनाही ही रक्कम गमवावी लागली. त्यास केवळ नाशिक पश्चिम मतदारसंघ अपवाद ठरला. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार १५ मतदारसंघात केवळ १६ उमेदवार एकूण मतदानाच्या एक षष्ठांशहून अधिक मते मिळवत अनामत रक्कम वाचवू शकले. यामध्ये येवल्यात माणिकराव शिंदे, नांदगावमध्ये समीर भुजबळ, चांदवडमधील गणेश निंबाळकर व केदा आहेर, देवळालीत राजश्री अहिरराव व योगेश घोलप, नाशिक मध्य मध्ये वसंत गिते, नाशिक पश्चिम मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावरील सुधाकर बडगुजर व तिसऱ्या क्रमांकावरील दिनकर पाटील, नाशिक पूर्वमध्ये गणेश गिते, निफाडमध्ये अनिल कदम, कळवणमध्ये जे. पी. गावित, सिन्नरमध्ये उदय सांगळे, मालेगाव बाह्यमधील बंडुकाका बच्छाव, मालेगाव मध्यमधील असिफ शेख रशिद व दिंडोरीतील सुनिता चारोस्कर यांचा समावेश आहे. ०००००

 मानसिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी अध्यात्माची जोड महत्त्वाची

 प्रल्हाद पै यांचे प्रतिपादन कर्जतच्या जीवनविद्या ज्ञानपीठात आनंद सोहोळा उत्साहात   मुंबई, : ‘माणूस आनंदी असला की शरीरात हॅपी हॉर्मोन्स तयार होतात आणि या हॅपी हॉर्मोन्समुळे माणूस आनंदी होतो. मानसिक…

१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्यावतीने पुस्तक भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे…

व्यवसाय परवाना नुतनीकरणाबाबत जाहीर आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376, अनुसूची ड, प्रकरण 18, भाग 4 मध्ये समाविष्ट असलेले सर्व व्यवसाय (उदा. खानावळी, हॉटेल, उपहारगृहे, लॉजिंग बोर्डींग, स्वीट मार्ट, केक…

भिवंडीतील अवैध भंगार गोदामे असुरक्षित

भिवंडी  : भिवंडीतील बेकायदा भंगार गोदामे आता सुस्थितीत नाहीत, अवैध भंगार गोदामांमुळे नेहमी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्याचा फटका लोकवस्तीलादेखील बसतो. ही जाळपोळ थांबविण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला…

हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करणाऱ्या स्नेहा दुबे-पंडित कोण आहेत ?

वसई : विरारमध्ये गेली 35 वर्ष एक हाती सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना या निवडणूकीत जबरी पराभवाला सामोरे जावं लागलं. त्याच्या तिन्ही विद्यमान सीट भाजपा आणि शिवसेनेने जिंकून बहुजन विकास…

 ठाणे जिल्ह्यात मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात ?

 रविंद्र चव्हाणांसह गणेश नाईक, किसन कथोरे, बालाजी किणीकर चर्चेत बदलापूरः एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का ही चर्चा देशभर सुरू असतानाच त्यांच्याच ठाणे जिल्ह्यात मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह माजी पालकमंत्री गणेश नाईक, पाच वेळा आमदार राहिलेले मुरबाडचे किसन कथोरे आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर यांच्या नावांची चर्चा रंगली आहे. भाजपचे अभ्यासू चेहरा असलेले संजय केळकर, प्रताप सरनाईक यांचीही नावे चर्चेत असल्याचे बोलले जाते. त्यातही एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरून बरीचशी समीकरणे बदलतील अशीही चर्चा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून कुणाच्या गल्यात मंत्रीपदाची माळ पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभेच्या जागांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख वगळता सर्व जागांवर महायुतीने विजय मिळवला. यात भाजपने एरोली, बेलापूर, ठाणे, डोंबिवली, भिवंडी पश्चिम, कल्याण पूर्व, उल्हासनगर, मुरबाड, मीरा भाईंदर हे मतदारसंघ जिंकले. तर कोपरी पाचपखाडी, ओवळा माजीवडा, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, अंबरनाथ आणि भिवंडी ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेने जिंकले. शहापूर हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने (अजित पवार) जिंकला. जिल्ह्यात महायुतीच्या मोठ्या विजयानंतर आता मंत्री पदासाठीही ज्येष्ठ आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल का याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांच्यासोबत मंत्रीमंडळात असलेले रविंद्र चव्हाण यांना पुन्हा संधी मिळण्याची चर्चा आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यंदा मंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. तर पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले मुरबाडचे किसन कथोरे यांनी निकालाच्या दिवशीच आपल्याला मंत्रीपद मिळावे ही कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगत दावा केला आहे. तर चौथ्यांदा आमदार झालेले आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकरही मंत्रीपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. ओवळा माजीवडा मतदारसंघाचे प्रताप सरनाईक आणि भाजपचा अभ्यासू चेहरा असलेले संजय केळकर यांचीही नावे चर्चेत आहेत. एकनाथ शिंदेंच्या मंत्रीपदावर समीकरणे अवलंबून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळते की ते एखादे दुसरे खाते सांभाळतील यावरून ठाणे जिल्ह्यातील मंत्रीपदाची समीकरणे अवलंबून असल्याचे बोलले जाते. एका जिल्ह्यात किती मंत्रीपदे मिळतील हाही मोठा प्रश्न आहे. त्यात भाजपचे पारडे यंदा जड मानले जाते. मात्र जिल्ह्यात एकनाथ शिंदे आपला वरचष्मा ठेवतील अशी शक्यता आहे. त्यामुळे भाजपतील काहींचा हिरमोड होऊ शकतो असेही बोलले जाते. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निकष पाळल्यास काहींना अनपेक्षित मंत्रीपदाला लाभ होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. 00000

मुख्यमंत्रिपदी शिंदेच हवेत

 ठाण्यातील मंदिरांमध्ये शिंदे गटाची आरती   ठाणे : महायुतीची सत्ता आल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे गटाने ठाण्यातील कोपरी येथील मंदिरात आरती आयोजित केली होती. या आरती दरम्यान महिलांनी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले फलक हाती घेतले होते. विधानसभा निवडणूकीत महायुतीला सत्ता मिळाली आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा व्हावा अशी मागणी करत आहेत. दरम्यान, कोपरी येथील दौलतनगर परिसरातील एका मंदिरात शिवसेना शिंदे गटाने आरती आयोजित केली होती. यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळावे अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली. 00000