Month: November 2024

दादा भुसे यांचा मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा दणदणीत विजय

मालेगाव : मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय झाला आहे. अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचा भुसे यांनी १ लाख ६…

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना

 मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार   मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे. आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा गट-क  च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज, संबंधित सर्व कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रे हे पडताळणी, अनुवाद चाचणीच्या वेळी सोबत मूळ प्रतींसह सादर करणे अनिवार्य राहील. लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांने या संदर्भात शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. ६ मधील “लेखनिक/ वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता या परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी” या तरतुदीकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात येत आहे. या परीक्षांकरिता किमान शैक्षणिक अर्हता, विविध विषयातील पदवी असल्याने लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता पदवीच्या एक टप्पा कमी म्हणजे १२ वी असणे आवश्यक आहे. या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाची मागणी करणे आवश्यक आहे. लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्रे पडताळणी/अनुवाद चाचणीच्या वेळी प्रपत्र १/प्रपत्र २, लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व नमुना क्रमांक ११ अशी कागदपत्रे सादर करावीत. शारीरिक दिव्यांगत्व (दोन्ही हात बाधित/नसलेले) / मेंदुचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक ११ सादर करणे आवश्यक नाही. लेखनिकाची मागणी करणा-या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र १/ प्रपत्र २ मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हतादेखील नमूद करणे आवश्यक आहे. विहित प्रपत्र १/ प्रपत्र २ व नमुना क्रमांक ११ आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करू-संजय केळकर

ठाणे : विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत, मला विजयी केले. त्यामुळे ठाणेकरांना मी वचन देतो की, लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करेन असे आश्वासन भाजप नेते संजय केळकर यांनी…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड विजयी

ठाणे : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा कळवा मुंब्रा मतदार संघातून विजयी झाले आहेत. सुमारे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. आव्हाड यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर…

कल्याण ग्रामीणमध्ये आमदार बदलाची परंपरा कायम

कल्याण : मागील वीस वर्षाच्या कालावधीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार बदलाची परंपरा यावेळी कायम राखली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित आमदार मनसेचे राजू पाटील यांना शिवसेनेचे डोंबिवली शहर…

मुरबाडमध्ये कथोरेंनी चक्रव्युव्ह भेदले

बदलापूरः माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या रूपाने स्वपक्षिय छुपे आव्हान आणि महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांची नाराजीतून प्रचारातून माघार यामुळे कधी नव्हे ते आव्हानात्मक झालेल्या मुरबाड…

 उल्हासनगरात कलानींना नाकारले, आयलानींवरच विश्वास;

 कुमार आयलानी विक्रमी मतांनी विजयी   उल्हासनगरः अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या उल्हासनगर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी सहज विजय मिळवला आहे. आयलानी ३० हजार ७५४ मतांनी विजयी झाले आहेत. आयलानी यांना ८२ हजार २३१ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे ओमी कलानी यांना ५१ हजार ४७७ मते मिळाली आहेत. यंदा कलानी पिता पुत्रांच्या आक्रमक प्रचारालाही उल्हासनगरच्या मतदारांनी नाकारले. ओमी कलानी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रचारात केंद्रस्थानी ठेवल्याने कुमार आयलानी यांना फायदा झाल्याचे बोलले जाते. गेल्या दोन दशकात उल्हासनगर विधानसभेत आलटून पालटून आमदार निवडून येत होते. मात्र यंदा आयलानी यांनी या परंपरेलाही छेद दिला आहे. उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत यंदा आमदार कुमार आयलानी यांच्यासमोर कलानी कुटुंबियांचे कडवे आव्हान होते. कुमार आयलानी यांना पहिल्या यादीत स्थान मिळाल्याने त्यांची गच्छंतीच्या चर्चा रंगल्या होत्या. उल्हासनगर शहरात विशेष कामगिरी दाखवू न शकल्याने आयलानी यांच्यावर टीकाही होत होती. यंदा पहिल्यांदा पप्पू कलानी आणि त्यांचा पुत्र ओमी कलानी प्रचारात सक्रीय होते. त्यांनी आक्रमकपणे प्रचारही केला होता. मात्र कलानी पिता पुत्रांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शेवटच्या टप्प्यात कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी यांनी एका कार्यक्रमात केलेले भावनीक भाषण यामुळे कलानी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पुन्हा चर्चेत आली. उल्हासनगर विधानसभेचा भाग असलेल्या वरप, म्हारळ, कांबा या मराठी पट्ट्यात कलानी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीपेक्षा आयलानी बरे अशी प्रतिक्रिया मतदारांमधून उमटत होती. या भागात अखेरच्या टप्प्यात मतदानही चांगले झाले. त्यामुळे कुमार आयलानी यांचा मार्ग मोकळ्या झाल्याचे बोलले जाते. पहिल्या फेऱीपासून कुमार आयलानी आघाडीवर होते. अखेर ३० हजार ७५४ मतांनी कुमार आयलानी यांनी कलानी यांना पराभवाची धुळ चारली. विक्रमी विजय गेल्या काही निवडणुकांमध्ये अवघ्या काही मतांनी उमेदवार विजयी होत होते. २००४ च्या निवडणुकीत कुमार आयलानी यांचा २२ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर २००९ निवडणुकीत ७ हजार मतांनी आयलानी विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ निवडणुकीत १ हजार ८६३ मतांनी ज्योती कलानी जिंकल्या होत्या. तर २०१९ निवडणुकीत २००४ मतांनी आयलानी जिंकले होते. त्यानंतर आता तब्बल ३० हजार ७५४ मतांनी आयलानी जिंकले आहेत. त्यामुळे हा मोठा विजय असल्याचे मानले जाते.

रेल्वे युनियन मान्यतेच्या निवडणुकीसाठी व्यापक मोहीम – वेणू नायर

अनिल ठाणेकर ठाणे : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, रेल्वे युनियन मान्यता २०२४ च्या निवडणुकीसाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. रेल्वे कामगारांना, ‘एक उद्योग, एक युनियन’ साठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन आर एम यु) च्या बॅनरखाली एकत्र येण्याचे आवाहन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणू पी नायर यांनी केले आहे. एनआरएमयुचे जनरल सेक्रेटरी वेणू पी नायर यांच्या गतिशील नेतृत्वाखाली नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांनी भारतीय रेल्वेवरील युनियनच्या मान्यताप्राप्तीसाठी आगामी गुप्त मतदान निवडणुकांसाठी ४ ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार आहे. एक व्यापक मोहीम सुरू केली. विविध ठिकाणांचा समावेश करून  संपूर्ण मध्य रेल्वेवर, मोहिमेचे उद्दिष्ट ७०% पेक्षा जास्त मते मिळून “एक उद्योग, एक युनियन” च्या बॅनरखाली कामगारांना सुरक्षित करून एकत्रित करणे आहे.वेणू नायर यांनी वैयक्तिकरित्या या मोहिमेचे नेतृत्व केले, मुंबई विभागातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांना संबोधित करत कर्मचारी अधिकारांचे रक्षण, रोजगार सुरक्षित करणे आणि खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी युनियनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला प्रत्येक स्टॉपवर,  त्यांनी कर्मचारी एकजुटीचे महत्त्व, मजबूत रेल्वे कर्मचाऱ्यांची सामूहिक दृष्टी आणि युनियनच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. माटुंगा कार्यशाळेत या मोहिमेची सुरुवात  त्यांनी  कर्मचाऱ्यांना युनियनीकरणाच्या महत्त्वावर संबोधित केले आणि त्यांना रेल्वेमध्ये “एक उद्योग, एक युनियन” आणण्याचे आवाहन केले.  कर्मचाऱ्यांच्या आणि नेतृत्वाच्या सारख्याच समर्थनाच्या जोरदार आश्वासनाने कार्यक्रमाची सांगता झाली.ही मोहीम सीएसएमटी यार्डमध्ये सुरू राहिली, जिथे जीएसने एसएसई/इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, कॅरेज आणि वॅगन, इलेक्ट्रिक लोको शेड, सेल्फ प्रोपेल्ड इन्स्पेक्शन कॅरेज, ऑपरेटिंग, नॉर्थ यार्ड, चीफ यार्ड मास्टर ऑफिस, लिनेन आणि यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. इतर त्यांनी युनियनच्या यशाबद्दल चर्चा केली आणि निवडणुकीत व्यापक पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मोहीम भायखळा येथे हलवली, जिथे जीएसने कर्मचाऱ्यांना संबोधित केले, त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी युनियनच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. कर्जत येथे, वेणू नायर यांनी पी डब्ल्यू आय, एस एन टी, ओ एच इ आणि ऑपरेटिंग कर्मचाऱ्यांना संबोधित केले आणि नोकरीची सुरक्षा आणि रेल्वेमध्ये नवीन भरती सुनिश्चित करण्यासाठी युनियन बळकटीच्या गरजेवर भर दिला. महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला हजेरी लावली आणि एनआरएमयूच्या कारणासाठी त्यांचा पाठिंबा अधोरेखित केला. पेण येथे, त्यांनी खाजगीकरणाला विरोध करण्यावर आणि एन आर एम यु साठी मजबूत बहुमत सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करून पी डब्ल्यू आय, ऑपरेटिंग आणि इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना संबोधित केले.  या कार्यक्रमाची सांगता युनियनच्या विजयासाठी मोठ्या जल्लोषात करण्यात आली. भिवंडी येथे, त्यांनी ट्रॅकमनसाठी युनियनच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाची रूपरेषा सांगितली, ज्यात सेवानिवृत्त ट्रॅकमनसाठी ग्रेड पे ४२०० प्राप्त करण्याच्या वचनबद्धतेचा समावेश आहे.  त्यांनी कर्मचाऱ्यांना युनियन आणि तिच्या यशाचे रक्षण करण्यासाठी निर्णायकपणे मतदान करण्याचे आवाहन केले. माटुंगा कार्यशाळेच्या नेत्यांसोबतच्या बैठकीत, जीएसने सदस्यांमध्ये पुन्हा उत्साह वाढवला, त्यांना “एक उद्योग, एक युनियन” या संकल्पनेने प्रेरित केले आणि मोहिमेशी त्यांची बांधिलकी सुनिश्चित केली.. ही मोहीम कल्याणपर्यंत पोहोचली, तिथे त्यांनी शाखाप्रमुख व कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी युनियनचे अस्तित्व आणि रेल्वेचे भवितव्य यांच्यातील महत्त्वाच्या दुव्यावर भर दिला आणि एनआरएमयूला जबरदस्त विजयाचे आवाहन केले. इगतपुरी येथे, कॉ. वेणू नायर यांनी एनआरएमयूच्या विजयामुळे रेल्वेचे अस्तित्व, जुनी पेन्शन योजना (ओ पी एस) पुन्हा सुरू करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी मिळतील यावर भर दिला.  या सभेत मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला आणि एकजुटीच्या आवाहनाने समारोप झाला.त्यांनी वाडीबंदर कॅरेज आणि वॅगन डेपोमधील कर्मचाऱ्यांना संबोधित केले, त्यांच्या कल्याणासाठी एनआरएमयूच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि निवडणुकीत पाठिंबा देण्यास प्रोत्साहन दिले.दादर पी डब्ल्यू आय येथे त्यांनी ट्रॅकमन आणि पी डब्ल्यू आय कॉम्रेड्सना संबोधित केले, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, मादक पदार्थांपासून दूर राहणे आणि एन आर एम यु च्या विजयासाठी सामूहिक कृती यावर जोर दिला. जीएस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करणार आहेत.  एनआरएमयूचा संघर्षांचा इतिहास रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी त्याच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे.  कॉम.  वेणू पी. नायर यांचे नेतृत्व कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवत आहे, त्यांना आगामी निवडणुकीत निर्णायक विजय मिळवून देण्यासाठी आणि ‘एक उद्योग, एक युनियन’ हे उद्दिष्ट साध्य करत आहे. ०००००

जिल्हा बँकेला यावर्षीचा ‘ सर्वोत्कृष्ट कोर बँकिंग सिस्टीम अंमलबजावणी’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

सिंधुदुर्गनगरी :’ बँकिंग सिस्टिम्स इंटेलिजन्स ‘ या जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमार्फत दिला जाणारा ‘ ग्लोबल फिनटेक  परस्पेक्टिव्ह ‘अंतर्गत बँकींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा  सर्वोत्कृष्ट ‘कोर बँकिंग सिस्टीम अंमलबजावणी ‘…

अलिबागमध्ये महेंद्र दळवी यांचा ऐतिहासिक विजय

अलिबागः शिवसेनेचे आमदार महेद्र दळवी अलिबाग विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजयी मिळवला. त्यांनी शेकाच्या चित्रलेखा पाटील यांचा 29 हजार 488 मतांनी   पराभव केला.  शेकापचा बालेकिल्ल समजल्या जाणारा अलिबाग विधानसभा मतदारसंघांत सलग दोन वेळा…