Month: November 2024

अहिल्यानगर शहरात प्रथमच होणार सायकालिंग स्पर्धा

राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा अहमदनगर : सायकलिंगचे शहर अशी ओळख प्राप्त करत असलेल्या अहिल्यानगर शहरात सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कॅम) यांच्या मान्यतेने आणिअहमदनगर सायकलिंग क्लबच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनगर प्रथमच अहिल्यानगरीमध्ये ५व्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २५ आणि २६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान करत आहे. पाथर्डी – अहिल्यानगर मार्गावरील चांदबीबी महाल बायपास लिंक रोडवर (चांदबीबी महाल ते वाळुंज) सुमारे १० किमी मार्गावर या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेमधून पुरी (ओरिसा) येथे ७ ते १० डिसेंबर दरम्यान होत असलेल्या २९व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे. या ५व्या महाराष्ट्र राज्य राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा युथ (१२ ते १४ वर्षे), सब ज्युनिअर (१५ आणि १६ वर्षे), ज्युनिअर (१७ आणि १८ वर्षे) या वयोगट मुले आणि मुलींसाठी तसेच ईलीट पुरुष व महिला (१९ वर्ष आणि त्यापुढील) आणि २३ वर्षाखालील पुरुष (मेन अंडर२३ वयोगट) अशा एकूण नऊ वयोगटात होतील. इंडीव्युजल टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट / रोड रेस अशा दोन प्रकारात स्पर्धक आपले कसब पणाला लावतील. या राज्य आणि राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमधून खेळाडू नोक-यांसाठी पात्र ठरत असतात, शासनाच्या इतर सर्व सवलती केवळ या स्पर्धेमधील कामगिरीवरुनच सायकलपट्टूंना मिळत असतात, नोक-या असणा-या खेळाडूंना बढती / पगारवाढ या स्पर्धेमधील कामगिरीवरुन ठरत असते म्हणून सायकलपट्टूंच्या दृष्टीने या स्पर्धा अत्यंत महत्वपूर्ण आहेत. सूर्या थात्तू, प्रणव कांबळे,  मानसी महाजन, मणाली रत्नोजी, आभा सोमण (सर्व पुणे), तेजस धांडे (नागपूर), प्राजक्ता सुर्यवंशी, येगेश्वरी कदम (दोघी सांगली), मुस्तफा पत्रावाला (मुंबई), आकांक्षा म्हेत्रे (जळगांव), प्रणीता सोमण, राज कारंडे, अपूर्वा गोरे (अहिल्यानगर), पूजा दाणोले (कोल्हापूर), अदिती डोंगरे, वीरेंद्रसिंह पाटील, हरीश डोंबाळे, समरजीत थोरबोले, ऋतिका शेजुळ (सर्व पुणे क्रीडा प्रबोधिनी) आदी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपट्टूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी मा. गौरव फिरोदीया यांच्या अध्यक्षतेखाली सीएफआयचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, कॅमचे सचिव प्रा. संजय साठे, अहमदनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. साईनाथ थोरात, कॅमचे खजिनदार भिकन अंबे, मेहेर तिवारी यांची समिती काम करत असून तांत्रिक जबाबदारी आंतरराष्ट्रीय पंच सुदाम रोकडे, धरमेंदर लांबा आणि श्रीमती दीपाली पाटील सांभाळत आहेत.

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात मतांमध्ये हेराफेरी

मिरा-ईन्दर : 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मात्र याच दरम्यान काँग्रेसने 145 पैकी 5 बूथावर…

आमदार कोण? गावागावांत पैजांना ऊत

रोकड, वाहने, जमिनीही डावावर   सांगली : मतदान प्रक्रिया समाप्त होताच बुधवारी सायंकाळपासून आमदार कोण होणार यावरून चर्चा व पैजांना ऊत आला आहे. रोकड, वाहने, जमिनीही डावावर लावण्याचा खेळ रंगला. लोकसभेप्रमाणे विधानसभा निकालाबाबत असलेली उत्सुकता या पैजांमधून दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत अनेक प्रकारच्या पैजा लागल्या होत्या. जेवणावळ्यांपासून पैशापर्यंत अन् वाहनापासून जमिनीपर्यंतच्या पैजा लागल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही अशाच पैजा आता लावल्या जात आहेत. सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत चुरशीने मतदान झाले आहे. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागतील, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यातच पैजांमधूनही धक्कादायकरीत्या अंदाज वर्तविण्यात येत आहेत. सर्वाधिक पैजा सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ व जत मतदारसंघात लावल्या जात आहेत. निकाल लागताच ठरल्याप्रमाणे पैजांचा हिशेब केला जाणार आहे. तोंडी व लेखी पैजा काही गावांत तोंडी, तर काही ठिकाणी लेखी स्वरूपात पैजा लावण्यात आल्या आहेत. लेखी पैजांवर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. जेवणावळ्यांच्या पैजा सर्वाधिक आहेत. जिथे चुरस, तिथे पैजा जिथे सहजासहजी अंदाज व्यक्त करणे मुश्कील आहे, अशा ठिकाणच्या निकालावर अधिक प्रमाणावर पैजा लावण्यात येत आहेत. सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ व जत या मतदारसंघांत सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात पैजा अधिक दिसताहेत. त्याखालोखाल शिराळा, खानापूर या मतदारसंघात पैजा लावल्या जात आहेत. राजकीय कार्यकर्ते अधिक पैजा लावणाऱ्यांमध्ये राजकीय कार्यकर्ते, नेते यांचा समावेश अधिक आहे. दोन वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही पैजा लावल्या गेल्या आहेत. वादातूनही अनेकांनी डाव लावले आहेत.

दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?

दिंडोरी – दिंडोरी पेठ मतदारसंघाची निवडणूक असली तरी राज्यातील राजकारणाचा परिणाम या मतदारसंघावर होण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी या मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने कुणाला…

 निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड

कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळकेंसोबत २० जणांविरोधात गुन्हा दाखल   नागपूर : मध्य नागपूर मतदारसंघात बुधवारी रात्री निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड करणे कॉंग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी शेळकेंसोबत २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, सरकारी कामात अडथळा, तोडफोड, धमकावणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून काही आरोपींना अटकदेखील करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर अतिरिक्त ईव्हीएम नेणारे वाहन किल्ला परिसरातील बूथबाहेर निघाले. त्यावेळी अचानक काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबविली. त्यांनी शिवीगाळ करीत त्यावर हल्ला केला व तोडफोड केली. त्याचवेळी एमएच १९ बीयू ६०२७ ही गाडीदेखील निघाली. त्यात बसलेल्या कर्मचाऱ्यावरदेखील हल्ला करण्यात आला. तरुणांनी दगड व लोखंडी रॉड्सने कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागेवर नेले. तोडफोड करण्यात आलेली गाडी कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आली, तर ईव्हीएमला दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आले. ही बातमी पसरताच भाजप व काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आणि त्यानंतर रात्री तुफान राडा झाला. ईव्हीएमसोबत कुठलाही गैरप्रकार झाला नसतानादेखील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत झोन अधिकारी हुमैद नाजीर खान यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खान यांना नियमानुसार राखीव ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आले होते. त्यांच्या वाहनात ते ठेवण्यात आले होते. संध्याकाळी सात मतदानाचा अहवाल फॉर्मची झेरॉक्स प्रत घेण्यासाठी बुथवरून वाहनातून निघाले. कल्याणेश्वर मंदिर ते झेडा चौकादरम्यान झेरॉक्स सेंटर पाहून खान थांबले. तेथे हा प्रकार घडला. खान यांनी शेळके यांना नेमके तथ्यदेखील सांगितले. मात्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दरम्यान, महालातील निखीळ गाडगीळ हा तेथे उभा होता. त्याच्यावर गर्दीतीलच एका व्यक्तीने चाकूने वार केले. त्याला त्याच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. ००००

 लाडकी बहीण झाली जागरूक

 नागपुरात महिलांच्या मतदानात आठ टक्क्यांनी वाढ   नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे अंतिम आकडे समोर आले असून, मागील वेळच्या तुलनेत नागपुरात ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात ६.३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाही नागपूरकरांना मतदानाचा ‘फर्स्ट क्लास’ गाठण्यात अपयश आले असले तरी महिला मात्र कमालीच्या जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. उपराजधानीत मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ७.९७ टक्क्यांनी महिलांचे मतदान वाढले आहे. आता या लाडक्या बहिणींच्या महायुतीला फायदा होणार की महाविकास आघाडीला महिलांचा कौल मिळणार याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. ‘लोकमत’ने नागपुरातील सहाही मतदारसंघातील २०१९ व २०२४ च्या केवळ ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानाची तुलना केली असता वरील बाब समोर आली आहे. २०१९ मध्ये नागपूर शहरात ईव्हीएमद्वारे मतदान करणारे २२ लाख ९ हजार १४५ मतदार होते. त्यातील ११ लाख १९ हजार ८२५ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले होते. पुरुषांच्या मतदानाचा टक्का ५३.१९ टक्के व महिलांच्या मतदानाची टक्केवारी ४८.११ टक्के इतकीच होती. मात्र यावेळेस महिलांनी नागपुरात कमाल केली आहे. यावेळेस नागपुरात ११ लाख ७९ हजार ८१४ पैकी ६ लाख ८४ हजार २३३ पुरुषांनी मतदान केले, तर १२ लाख २ हजार ९५६ महिलांपैकी ६ लाख ७४ हजार ६१८ जणींनी ईव्हीएमवर मतदानाचे कर्तव्य बजावले. यावेळी पुरुषांच्या मतदानाचा टक्का ५७.६० टक्के व महिलांचा टक्का ५६.०८ टक्के इतका आहे. २०१९ च्या तुलनेत पुरुषांचे मतदान ४.४१ टक्क्यांनी वाढले, तर महिलांचे मतदान ७.९७ टक्क्यांनी वाढले. महिलांचा सर्वाधिक प्रतिसाद जर नागपूर शहरातील सहाही मतदारसंघाच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर उत्तर नागपुरात २०१९ च्या तुलनेत महिलांच्या मतदानात सर्वाधिक ८.७७ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याखालोखाल मध्य नागपूर (८.४४ टक्के), दक्षिण नागपूर (८.१६ टक्के) या मतदारसंघात मोठी वाढ झाली आहे. दक्षिण-पश्चिममध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत महिलांचे मतदान ५.९६ टक्के वाढ आहे. याशिवाय पूर्वमध्ये महिलांचे मतदान ७.९३ टक्क्यांनी वाढले. ००००

 मतमोजणीसाठी साडेसातशे पोलिसांचा फौजफाटा

 पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज   पिंपरी : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ प्रक्रिया अंतिम टप्पात आली आहे. या प्रक्रियेत शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत तीन ठिकाणी स्टॉगरुम व मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ संचलित स्वर्गीय शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे होणार आहे. पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री. शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. स्ट्राँगरुम व मतमोजणीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. पोलिस आयुक्‍त विनय कुमार चौबे यांनी पोलिसांना सूचना केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमित गस्तीसह साध्यावेशातील पोलिस देखील मतमोजणी केंद्र परिसरात राहणार आहेत. उमेदवारांच्या घर तसेच कार्यालयासाठी देखील बंदोबस्त राहणार आहे. असा असेल पोलिस बंदोबस्त सह आयुक्त : १ अपर आयुक्‍त : १ उपायुक्त : ४ सहायक आयुक्‍त : ५ पोलिस निरीक्षक : २९ सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक : ६४ पोलीस अंमलदार : ६५६ राज्य राखीव दलाची कंपनी : १ केंद्र सुरक्षा दलाच्या कंपनी : ४ हरियाणा पोलिस कंपनी : १ ००००

मुंबई नाक्यावर वाहतुकीची कोंडी

 रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे ट्रॅफिक जाम   हरिभाऊ लाखे नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका ते इंदिरानगर बोगदा या दरम्यान उड्डाणपुलाखालील रस्त्याचे काँक्रिटीकरण्याचे काम सुरू आहे. यामुळे मुंबई नाका सर्कल याठिकाणी दररोज दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते आहे. गुरुवारी दिवसभर याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनचालकांना नाहक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक वळविण्यासाठी व कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आलेली असली तर कोंडीचा सर्वांना सामना करावा लागला. द्वारका ते इंदिरानगर बोगदा या दरम्यान उड्डाण पुलाखालील सर्व्हिसरोडचे काँक्रिटीकरण सुरू आहे. या काँक्रिटीकरणाचा सर्वाधिक ताण मुंबई नाका सर्कलवरील वाहतुकीवर पडला आहे. इंदिरानगर बोगद्याकडून मुंबई नाका सर्कलकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यामुळे येणारी वाहतूक प्रकाश पेट्रोल पंपासमोर सर्व्हिसरोडकडे वळविण्यात आलेली आहे. यामुळे मुंबई नाका सर्कलवर सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची जाम कोंडी होते आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांच्यासह वाहतूक पोलिसांचे पथक सतत प्रयत्नशील आहे. मात्र, सायंकाळच्या वेळीच वाहने मोठ्या संख्येने असल्याने वाहतूक कोंडी होते आहे. मुंबई नाका ते संदीप हॉटेलमध्ये वाहनांच्या रांगा लागतात. तर भाभानगर रस्त्यावर आणि इंदिरानगर रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरही वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीत सापडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार?

 पुण्यात लागलेल्या पोस्टरमुळे महायुतीमधील चढाओढ चर्चेत   पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून आज मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग…

बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने जवळपास २०० जागांवर उमेदवार उभे केले होते. यामध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे आदी अनेक मनसे नेत्यांना संधी देण्यात आली. यापैकी…