Month: November 2024

उल्हासनगरात मामानेच केला चिमुरडीचा खून

उल्हासनगर : गेल्या ४ दिवसापासून बेपत्ता असलेल्या सव्वा तीन वर्षाच्या चिमूरडीचा अर्धवट जळलेला मृतदेह मिळाल्यावर शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत कारवाईची मागणी केली. मात्र रात्री पोलीस चौकशीत मामा खुनी…

कडेकोट बंदोबस्तात पनवेलची मतमोजणी

पनवेल : पनवेल विधानसभा निवडणूकीच्या निकालाची मतमोजणी शनिवारी सकाळी आठ वाजता शहरातील कर्नाळा स्पोटर्स अकादमीसमोरील ए.आर. कालसेकर पॉलिटेक्नीक महाविद्यालयात केली जाणार आहे. याच महाविद्यालयात ६०४ इव्हीएम (मतदान) यंत्र पोलीस बंदोबस्तामध्ये…

मतमोजणीसाठी ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल

ठाणे:  आज वागळे इस्टेट आयटीआय काॅलेजजवळ काेपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघांची मतमाेजणी हाेणार आहे. त्यामुळे या भागात हाेणारी संभाव्य राजकीय कार्यकर्त्यांची, तसेच नागरिकांची गर्दी लक्षात घेता श्रीनगर वागळे इस्टेट या भागातील वाहतूक…

कल्याण पूर्वेत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी

कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी, खडेगोळवली, मलंगगड रस्ता, तिसगाव नाका, चक्की नाका भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर फेरीवाले हातगाड्या, ठेले लावून व्यवसाय करतात. हातगाड्या, ठेल्यांमुळे रस्ते अडून राहत असल्याने कल्याण पूर्व…

‘समृध्दी’ची शहापूर-आमणे महामार्गावरील कामे शेवटच्या टप्प्यात

कल्याण : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, ठाणे जिल्ह्यातील शहापूर ते आमणे (भिवंडी) या शेवटच्या ७५ किलोमीटरच्या टप्प्यातील कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. शहापूर शेरे-आमणे रस्त्यावरील बोगद्याचे काम…

 ठाणे जिल्ह्यात लाडक्या बहिणी मतदानात आघाडीवर

 पुरुषाच्या तुलनेत एक टक्क्याने पुढे   ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार संख्येच्या तुलनेत ५६ टक्के पुरुषांनी तर ५७ टक्के महिलांनी मतदान केले असून यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानामध्ये एक टक्क्याने पुढे असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात लाडक्या बहिणी मतदानात आघाडीवर असल्याचे चित्र असून महिलांचे वाढलेले मतदान कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, हे आज स्पष्ट होईल. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामधून २४४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान यंत्रामध्ये बंदिस्त झाले आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. काही ठिकाणी मनसे उमेदवार, बंडखोर अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढती झाल्या आहेत. महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना राबविली. या योजनेतील अनुदान आणखी वाढविण्यात येणार असल्याचा प्रचार महायुतीने केला होता. तर, महाविकास आघाडीनेही याच योजनेचा आधार घेत त्यातील अनुदान वाढवून देऊ असा मुद्दा प्रचारात मांडला होता. या योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीने केल्याचे चित्र दिसून आले होते. असे असतानाच, जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण ७२ लाख २९ हजार ३३९ मतदारांपैकी ४१ लाख १५ हजार ७५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ३८ लाख ४५ हजार ४२ पुरुष मतदारांपैकी २१ लाख ८३ हजार ५११ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ५६ टक्के इतकी आहे. तर, ३३ लाख ८२ हजार ८८२ महिला मतदारांपैकी १९ लाख ३१ हजार ९७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ५७ टक्के इतकी आहे. १ हजार ४१५ इतर मतदारांपैकी २७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या तुलनेत ५६ टक्के पुरुषांनी तर ५७ टक्के महिलांनी मतदान केले असून यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानामध्ये एक टक्क्याने पुढे असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. पाच मतदारसंघात महिला आघाडीवर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिममध्ये पुरुषांचे मतदान ५२ टक्के तर महिलांचे मतदान ५६ टक्के इतके झाले आहे. भिवंडी पूर्वमध्ये पुरुषांचे मतदान ४९ टक्के तर, महिलांचे मतदान ५४ टक्के इतके झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये पुरुषांचे मतदान ५९ टक्के तर महिलांचे मतदान ६० टक्के इतके झाले आहे. ऐरोलीमध्ये पुरुषांचे मतदान ५४ टक्के तर महिलांचे मतदान ५५ टक्के आणि बेलापूरमध्ये पुरुषांचे मतदान ५४ टक्के तर महिलांचे मतदान ५५ टक्के इतके मतदान झाले आहे. यामुळे १८ पैकी ५ मतदार संघात महिलांची मतदान टक्केवारी सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 0000

स्ट्राँग रुम भोवती त्रिस्तरीय सुरक्षेचे कडे

 केंद्रीय शसस्त्र दलासह स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त   ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. या मतपेट्या विविध स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्राँग रुम भोवती सुरक्षा यंत्रणांचे त्रिस्तरीय बंदोबस्त नेमण्यात आला आहे. बंदूकधारी पोलीस अधिकारी आणि जवानांकडून या स्ट्राँग रुमची देखरेख करण्यात येत आहे. तसेच स्ट्राँग रुमच्या आवारात सीसीटीव्हीचे जाळेही बसविण्यात आले आहे. मतमोजणीच्या कालावधीत अधिकृत व्यक्ती वगळता इतरांना मतमोजणी केंद्रावर प्रवेशबंदी असणार आहे. विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी महावितरणचे कर्मचारी देखील सावध आहेत. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आज, शनिवारी होणार आहे. बुधवारी मतदान झाल्यानंतर या मतपेट्या विविध ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या स्ट्राँग रुम भोवती त्रिस्तरीय सुरक्षा कड्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच, ज्या ठिकाणी स्ट्राँग रुम आहेत. त्याठिकाणी पहिल्या कड्यामध्ये केंद्रीय शसस्त्र पोलीस दलाचे जवान, दुसऱ्या कड्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तर, तिसऱ्या आणि शेवटच्या कड्यामध्ये स्थानिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. तसेच स्ट्राँग रुममध्ये कोणीही घुसखोरी केली नसल्याची माहिती उमेदवार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्ट्राँग रुमच्या आवारात तसेच बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने महावितरण कंपनीने विद्युत बिघाड होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. मतमोजणीच्या दिवशी कार्यकर्त्यांची मतमोजणी केंद्राजवळ गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत व्यक्तीवगळता इतरांना मतमोजणी केंद्राच्या काही मीटर अंतरापर्यंत प्रवेशबंदी राहणार आहे. मतमोजणीची माहिती कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी देखील आसन तसेच इतर व्यवस्था करण्यात आलेली आहे. 00000

ठाण्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची  मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सुरळीत पार पडली असून जिल्हा प्रशासन मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी प्रक्रिया ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी फरहान खान हॉल, मिल्लत नगर, ममता हॉस्पिटलच्या मागे, पहिला मजला भिवंडी येथे होणार आहे. शहापूर अ.ज. विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ.शिवाजीराव जोंधळे कॉलेज, आसनगांव, ता.शहापूर येथे, भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी वऱ्हाळदेवी मंगमाता भवन हॉल, कामतघर, भिवंडी येथे, भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी स्व.संपदा सिताराम नाईक, मंगल भवन, पहिला मजला, भादवड, ता.भिवंडी येथे, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोणी मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, तळमजला, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज, गांधारनगर, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे, मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती गोडाऊन, मुरबाड, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महात्मा गांधी  विद्यालय व ताई कोळकर कनिष्ठ महाविद्यालय, के.बी. रोड, अंबरनाथ प. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारत, पवई चौक, हिराघाट, उल्हासनगर ३ येथे होणार आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ‍ महिला उद्योग केंद्र रॉयल रेजेन्सीच्या पाठीमागे, राजाराम जाधव मार्ग, साईनाथ, विठ्ठलवाडी स्टेशन समोर, कल्याण येथे  डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आय.ई.एस चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्टचे पाटकर विद्यालय, राजाजी रोड, डोंबिवली, पूर्व, ता.कल्याण येथे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, तळमजला, के.डी.एम.सी ग्राऊंड, जलतरण तलाव बिल्डींग डोंबिवली पूर्व येथे,  मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तळमजला, स्व. प्रमोद महाजन हॉल, फेस ११, गोडदेव, भाईंदर, पूर्व येथे, ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल, पहिला मजला, आनंदनगर, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे येथे, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाची मतमोजणी वर्कशॉप क्र १ आयटीआय, रोड क्र.२८, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथे, ठाणे विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटी, सी इमारत, रोडास सोसायटी जवळ हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, ठाणे येथे, मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी श्री.मोलाना अबुल कलाम क्रिडा संकुल कौसा, मुंब्रा येथे,  ऐरोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सरस्वती विद्यालय, सेक्टर ५ ऐरोली नवी मुंबई येथे तर  बेलापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आगरी कोळी सांस्कृतिक भवन, सेंक्टर २४ नेरुळ, नवी मुंबई येथे होणार आहे. ००००

अमेरिकेत अदाणींविरोधात अटक वॉरंट

सौर ऊर्जा वितरणाचे कंत्राट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना २ हजार कोटी रूपयांची लाच दिल्याचा आरोप न्युयॉर्क : भारताच्या उद्योगजगतात भुकंप झाला आहे. भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणींच्याविरोधात भ्रष्ट्राचार प्रकरणात अमेरिकेत अटक वॉरंट…