समाजवादी विचारधारेचे पाईक मुलायमसिंग यादव
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंग यादव यांची आज जयंती. मुलायमसिंग यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तर प्रदेशातील सैफई या…
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंग यादव यांची आज जयंती. मुलायमसिंग यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तर प्रदेशातील सैफई या…
निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत सरकारची तिजोरी रिकामी होते आणि कल्याणकारी योजनांना पैसेच उरत नाही. सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसे उरत नाही. हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य…
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची कळवण आगाराची बस गुरूवारी कळवण-नाशिक मार्गावर धावत असताना वाहक सुनीता पवार यांना बसमधील महिला प्रवाशाचे पाकिट चोरीस गेल्याचे कळले. त्यांनी सतर्कता बाळगत बस पोलीस ठाण्यात नेत चोरांना पकडून दिले. त्यांच्या या सतर्कतेचा सन्मान महामंडळाच्या वतीने करण्यात आला. कळवण-नाशिक बसमधून दोन महिला लहान मुलांसह प्रवास करत होत्या. बसमध्ये ७० ते ८० प्रवासी होते. वाहक सुनीता पवार यांना सदर महिला संशयास्पद हालचाल करत असल्याचे जाणवले. संबंधित महिला दिंडोरी स्थानकात उतरल्या. वाहक पवार यांनी पाठीमागून नाशिक मार्गावर धावणाऱ्या कळवण आगाराच्या बसवरील वाहक वैशाली सहारेयांना दिंडोरी स्थानकात दोन संशयित महिला लहान मुलांसह असल्याचे कळविले. त्या बसमध्ये बसल्यास नजर ठेवण्याची सूचना केली. दिंडोरी बस स्थानकात संशयित महिला आणि त्यांच्या बरोबर असलेली लहान मुले वाहक सहारे यांच्या बसमध्ये बसल्या. बस सुरु झाल्यानंतर एका महिला प्रवाशाने पाकीट चोरीला गेल्याची तक्रार केली. वाहक सहारे यांनी पवार यांना बसमध्ये चोरी झाल्याचे कळविले असता पवार यांनी बस पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सुचविले. त्यानुसार वाहक सहारे या बस म्हसरूळ पोलीस ठाण्यात घेऊन गेल्या. पोलिसांनी गाडीतील प्रवाशांची तपासणी केली असता संशयित महिलांकडे चोरी झालेले पाकीट आढळून आले. पवार आणि सहारे या कळवण आगाराच्या दोन्ही महिला वाहकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे महिला प्रवाशाचे चोरी झालेले पाकीट परत मिळाले. दोन महिला चोर पोलिसांना सापडले. दोन्ही महिला वाहकांनी आपल्या कामात दाखविलेल्या तत्परतेबद्दल नाशिक विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी पवार यांचा सत्कार केला.
पनवेल – विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीचा मुहूर्त साधत सिडको महामंडळाने नवी मुंबई पोलीसांच्या सहकार्याने पनवेल तालुक्यातील पारगाव येथील टेकडीवर सिडको महामंडळाकडून विना परवानगी घेता बांधलेले बांधकाम गुरुवारी पहाटेपासून जमिनदोस्त करण्याची…
उरण – उरण परिसरात नोव्हेंबर महिन्यात पारा घसरू लागल्याने रात्रीच्या व पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवणे सुरू झाले आहे. सध्या तालुक्यात गुलाबी थंडीचे रूपांतर बोचऱ्या थंडीमध्ये झाल्यामुळे उरणकरांना हुडहुडी भरत…
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षेच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीच्या लेखी परीक्षा ११ फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंत होणार आहे. तर, दहावीची लेखी…
जव्हार : जव्हार तालुका हा ग्रामीण आणि दुर्गम भाग आहे. येथे आरोग्य सेवा हा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. जव्हार शहरातील १०० खाटांचे पतंग शाह उपजिल्हा रुग्णालयावर मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके; तसेच डहाणू तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. शिवाय, याच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांची वर्णी पालघर येथील जिल्हा शल्यचिकित्सक पदी लागल्याने येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षकसह २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर रुग्ण सेवा देताना अतिरिक्त कामाचा ताण येऊन आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे. पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज चालवताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच या रुग्णालयात प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, सर्जन, फिजीशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ; तसेच भूलतज्ज्ञ आणि दंतरोग तज्ज्ञ ही पदे रिक्त असल्याने रुग्ण सेवा देताना मर्यादा येत आहेत. परिणामी, रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक, सेलवास, ठाणे येथे पाठवले जाते. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना सेवा देण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे असताना वर्षाहून अधिक काळापासून पुरेसे कर्मचारी उपलब्ध होऊ शकलेले नाही. सध्या उपजिल्हा रुग्णालयाकडे १०७ मंजूर पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. त्याचा रुणसेवेवरही परिणाम होऊ लागला आहे. दर महिन्याला अहवाल अलीकडच्या काही वर्षांत आरोग्य विभागाने उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अहवाल दर महिन्याला उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवला जातो. मध्यंतरी काही पदे भरली आहेत. गेल्या काही वर्षांत रिक्त पदे पूर्णपणे भरलेलीच नाहीत. त्याचबरोबर वयोमानानुसार कर्मचारीही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन पदे तातडीने भरली जात नाहीत. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची घडी विस्कटण्याच्या मार्गावर आली आहे. अनेक वर्षे पदे रिक्तच सरकारकडून आरोग्य सेवेतील पदांची भरती केली जात नाही. मध्यंतरी भरती प्रक्रिया पार पडली; मात्र त्यात पुरेसी पदे भरली नाहीत. अनेक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने यापूर्वी कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर व काही कर्मचारी सेवेसाठी घेतले होते. मात्र, तरी अतिरिक्त कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याचा विचार करून पदे भरती करणे गरजेचे आहे. कोट जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १०७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २७ पदे रिक्त आहेत. या पदांचा अहवाल दर महिन्याला वरिष्ठ कार्यालयाला पाठवला जातो. मंजूर असलेली पूर्ण पदे भरलेली नाहीत. उपलब्ध कर्मचारी आणि काही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. – डॉ. भरतकुमार महाले, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय जव्हार
मुंबई : सिगारेट देण्यास नकार दिल्याने २९ वर्षीय तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. उशेल रामलु निली असे जखमी तरूणाचे नाव असून या हल्ल्यात उशेल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी चेंबूरमधील आरसीएफ पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली. सचिन ऊर्फ राहुल कनोजिया आणि अजय दीपक बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. चेंबूरमधील चेंबूर कॅम्प, गुरू सिंह सभा गुरुद्वारासमोर ही घटना घडली. उशेल निली हा रामटेकडी, नानक भोजवाणी गार्डन परिसरात वास्तव्यास असून तिथेच तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. तो दोन्ही आरोपीना ओळखत असून या परिसरात त्यांची प्रचंड दहशत होती. या दोघांनी मंगळवारी उशेलकडे सिगारेटची मागणी केली, त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. याच कारणावरून त्यांनी त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला ठार मारण्याची धमकी देत सचिनने त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. यावेळी उशेलने आरडाओरड केल्यानंतर तेथे नागरिक जमले. या घटनेनंतर सचिन आणि राहुल पळून गेले. स्थानिक रहिवाशांनी जखमी उशेलला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. घटनेचे वृत्त समजताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उशेलच्या जबाबावरून पोलिसांनी सचिन कनोजिया आणि अजय बनसोडे या दोघांविरूद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. सचिन आणि अजय हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. सचिनविरूद्ध मारामारीसह खंडणी, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हत्येचा प्रयत्न, अपहरणासह आठ गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर एक वर्षासाठी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. अजयविरूद्ध हत्येच्या प्रयत्नासह अपहरण, लैगिंक अत्याचार व विनयभंगाच्या तीन गुन्ह्यांची नोंद आहे. अजयने दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहेत. 0000
– घरकाम करणाऱ्या महिलेला अटक मुंबई : चोरीच्या दागिने घातलेले छायाचित्र समाज माध्यमांवर अपलोड केल्यामुळे चोरीची उकल करण्यात खार पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलेने खार परिसरातील एका व्यावसायिक महिलेच्या घरात सुमारे ३४ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिमा नागेंद्र निशादला (२०) खार पोलिसांनी अटक केली. पांचाली ठाकूर (५७) या भावासोबत खार परिसरात राहातात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर तिचे वयोवृद्ध आई-वडिल राहत असून त्यांच्याकडे पाच नोकर आहेत. तिच्या आईच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी महिमा निशाद हिला ठेवले होते. महिमा ही मुळची उत्तर प्रदेशमधील गोरखपूरची रहिवाशी असून सध्या ती सांताक्रुज येथील वाकोला, आनंदनगर परिसरात राहत होती. एप्रिल २०२३ पासून ती त्यांच्याकडे कामाला होती. तिच्या आईच्या खोलीत एक लॉकर असून तो उघडण्यासाठी पासवर्डचा वापर करावा लागतो. गरजेच्या वेळी पासवर्ड आठवत नसल्याने तिला एक चावी देण्यात आली होती. या लॉकरमध्ये तिने तिचे सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवली होते. या चावीसह पासवर्डची महिमाला माहिती होती. लक्ष्मीपूजनच्या दिवशी १ नोव्हेंबर रोजी पांचाली आईकडे दागिने घेण्यासाठी गेली होती. मात्र तिला लॉकर उघडता आला नाही. तिला लॉकरची चावीही सापडली नाही. अखेर तिने दुसऱ्या चावीने लॉकर उघडले असता तेथील ३४ लाख २३ हजार रुपयांचे विविध सोन्याचे, चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रोख असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. महिमाने ८ नोव्हेंबर रोजी व्हॉटस् ॲपवर अपलोड केलेले एक छायाचित्र पांचालीच्या निदर्शनास आले. त्यात महिमाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि उजव्या हातातील अंगठी पांचालीच्या आईची असल्याचे दिसले. तिच्या घरी महिमानेच चोरी केल्याची खात्री पटताच ८ नोव्हेंबर रोजी पांचालीने खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीनंतर महिमाविरोधात पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी महिमाला अटक केली.
25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबई : मा. न्यायालयाने दि. 9 ऑक्टोबर रोजीच्या जनहित याचिका क्र. 155/20211 बाबत दिलेल्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स / होर्डींग्ज हटविण्याची विशेष मोहीम 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. ही मोहीम सर्वच आठही विभागांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून यामध्ये परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स / होर्डिंग्ज हटविण्यात येणार आहेत. या मोहीमेंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील परवानगी न घेतलेले तसेच परवानगी संपुष्टात आलेले अनधिकृत बॅनर्स / होर्डिंग्ज हटविण्यात येणार असून निष्कासन खर्चासाठी आलेली दंडात्मक रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 अन्वये अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी विनापरवागी अनधिकृतरित्या होर्डींग / बॅनर लावणे हे शहर सौंदर्यीकरणाला बाधा पोहचविणारे असून या मोहीमेनंतरच्या कालावधीत विनापरवानगी होर्डींग / बॅनर लावण्यात येऊ नयेत असे सूचित करण्यात येत आहे. अन्यथा सदर अधिनियमाव्दारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी. याविषयी कोणत्याही नागरिकास सूचना / तक्रार करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरील ग्रिव्हेन्स रिड्रेसल पोर्टलवर अथवा My NMMC या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ॲपवर अथवा 8422955912 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर नागरिक आपली तक्रार / सूचना नोंदवू शकतात. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या शहराचा स्वच्छ व सुंदर शहर हा नावलौकिक टिकविण्यासाठी व वृध्दींगत करण्यासाठी शहर विद्रुपीकरणाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.