Month: November 2024

भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ संवर्धन आणि अभ्यासासाठी विशेष उपक्रम

मुंबई : काही दिवसांपूर्वी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या कोल्ह्यांचा रेबीजची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. मुंबईमध्ये आतापर्यंत रेबीजची लागण होऊन दोन वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर वन विभागाने बीएआरसी, तसेच आसपासच्या परिसरात मंगळवारपासून ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ला सुरुवात केली. बीएआरसी परिसरात काही दिवसांपूर्वी जखमी कोल्हा आढळला होता. या कोल्ह्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोल्ह्याच्या हालचालींमधील फरक लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याची रेबीज चाचणी केली होती. चाचणीचा अहवाल प्राप्त होताच सदर कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी चेंबूर परिसरातही जखमी कोल्हा आढळला होता. त्यालादेखील रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, मुंबईत लागोपाठ दोन कोल्ह्यांचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे वनविभागाने भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसरात ‘कॅमेरा ट्रॅपिंग’, तसेच सर्वेक्षण करण्यासाठी संशोधन केंद्राची परवानगी मागितली होती. संशोधन केंद्राने परवानगी वनविभागाला संशोधन करण्याची परवानगी दिली असून मगंळवारपासून या भागात कॅमेरा ट्रॅपिंग सुरू करण्यात आले. याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या परिसरातही ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ करण्याचा वनविभागाचा मानस आहे. त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला वनविभागाने पत्र पाठवले आहे. मात्र त्याचे उत्तर अद्याप आलेले नाही. ‘कॅमेरा ट्रॅप’च्या माध्यमातून परिसरातील कोल्ह्यांची संख्या , भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसराच्या हद्दीत कोल्ह्यांचे अस्तित्व असल्याचा शास्त्रीय पुरावा वनविभागाला मिळण्यास मदत होईल, असे उप वनसंरक्षक, ठाणे वनविभागाचे अक्षय गजभिये यांनी सांगितले. शिवाय या माहितीमुळे कोल्ह्याच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सोपो होईल, असेही ते म्हणाले.

कल्याणमध्ये रविवारी मॅरेथॉनचे आयोजन

ठाणे : सर्व वयोगटातील नागरिक तंदुरुस्त राहण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे रोटरी दिव्यांग सेंटर आणि क्लबच्या माध्यमातून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. या मॅरेथॉनमध्ये दरवर्षी सरासरी दोन हजारांहून अधिक…

‘हुतात्मा स्मृती दिना’निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. प्रसंगी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता जप्तीची नोटीस

मालमत्ता कर न भरणऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये…

मतमोजणी निरीक्षक म्हणून संत कुमार यांची नियुक्ती

139 मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी ठाणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून संत कुमार (एस.सी.एस) यांची नियुक्ती केली आहे. 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्यानागरिकांच्या मतमोजणीविषयक काही तक्रारी असल्यास तक्रारदार हे दि.22 नोव्हेंबर 2024पासून 139conobservermurbad@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार करु शकतात अथवा संत कुमार (एस.सी.एस)…

कांद्याने गाठली शंभरी

वाशी  : कांद्याच्या भावाने किरकोळ बाजारात शंभरी गाठली आहे. ग्राहकांसाठी कांद्याची वाढलेली किमत चिंता वाढवणारी ठरली आहे. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत कांदा पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.…

आजी, माजी, भावी आमदारांचे भवितव्य टांगणीला

मतदारराजाचा वाढीव कौल कुणाच्या पथ्यावर : विजयाचे गणित बदलले. धाकधूक वाढली ठाणे,  : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा शांत झाला आणि मतदानाचा उत्सवही शांततेत पार पडला. त्यामुळे आता शनिवारी लागणाऱ्या निकालाची ओढ लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघात यंदा अंदाजे…

अंबरनाथमध्ये नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने उडाली खळबळ

दोन महिला ताब्यात उल्हासनगर  :  अंबरनाथ पश्चिम मधील शंकर हाईट्स या इमारतीच्या परिसरात  एका  नवजात अर्भक  मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीवरून अर्भकाला  फेकल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले…

मतदानाच्या वाढीव टक्क्याने कल्याण-डोंबिवलीतील उमेदवारांमध्ये हुरहुर

कल्याण : लोकसभा निवडणुकीनंतर स्थानिक प्रशासन यंत्रणांनी राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे कल्याण, डोंबिवली मतदारसंघातील मतदार संख्या विधानसभा निवडणुकीपर्यंत २५ ते ५५ हजारापर्यंत वाढली. जुन्या आणि नवोदित मतदारांनी केलेल्या उत्स्फूर्त मतदानामुळे कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का ११ ते १५ टक्क्यापर्यंत वाढला. चारही मतदारसंघातील मतदानाची एकूण टक्केवारी १३.७३ टक्के आहे. मागील दहा वर्षाच्या कालावधीपेक्षा यंदा प्रथमच विधानसभा निवडणुकीतील टक्केवारी वाढल्याने कल्याण, डोंबिवलीतील चारही मतदारसंघातील उमेदवारांमध्ये हे वाढीव मतदान कोणाला पडणार याविषयी हुरहुर लागली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक पक्षीय उमेदवाराबरोबर, सग्यासोयऱ्यांचे राजकारण, बंडखोरी, प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर लढवली गेली. डोंबिवली मतदारसंघ डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मागील दहा वर्षाच्या कालावधीत ४४ ते ४६.५८ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत हे मतदान ५६.१९ टक्के झाले. १५.४७ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. मतदार नोंदणी अभियानामुळे डोंबिवलीतील मतदार सुमारे २७ हजाराने वाढला. या मतदारसंघात एकूण तीन लाख १३ हजार मतदान आहे. यंदा एक लाख १७ हजार मतदान झाले. या वाढीव टक्क्याची विभागणी भाजपचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण, ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात किती होते. म्हात्रे यांना किती मतदान होते आणि मंत्री चव्हाण यांना किती मताधिक्य मिळेल याविषयीची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. कल्याण पूर्व कल्याण पूर्व मतदारसंघात मागील दहा वर्षात ४०.८२ ते ४५ टक्के मतदान झाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदान ५८.५० म्हणजे १४.९७ टक्क्यांनी वाढले. एकूण तीन लाख २९ हजार मतदारांपैकी एक लाख ९२ हजार ५६६ मतदारांनी येथे मतदानाचा हक्का बजावला. महायुतीच्या सुलभा गायकवाड, ठाकरे गटाचे धनंजय बोडारे, अपक्ष महेश गायकवाड आणि वंचितचे विशाल पावशे हे येथे रिंगणात आहेत. खरी लढत सुलभा, बोडारे आणि महेश यांच्यात आहे. मतवाढीचा लाभ सुलभा गायकवाड, बोडारे आणि महेश यांना किती होतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कल्याण ग्रामीण कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दहा वर्षात मतदानाचा आकडा ४७ ते ४८ टक्क्यांपर्यंत स्थिरावला होता. यंदा या मतदारसंघात ५७.८१ मतदान झाले. ही वाढ मागच्या तुलनेत ११.४५ टक्के आहे. या मतदारसंघात पाच लाख १० हजार मतदार आहेत. यापैकी दोन लाख ९४ हजार मतदारांनी यंदा मतदान केले. या मतदारसंघात मागच्या पाच महिन्यात सुमारे ५५ हजार नवमतदार वाढले. ठाकरे गटाचे सुभाष भोईर, मनसेचे राजू पाटील, शिंदेसेनेचे राजेश मोरे यांच्यात येथे चुरशीची लढत आहे. कल्याण पश्चिम कल्याण पश्चिम मतदारसंघात यापूर्वीच्या दहा वर्षात ४१.९१ ते ४४.९६ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघातील चार लाख ४० हजार मतदारांपैकी यंदा दोन लाख ४३ हजार मतदारांनी मतदान केले. यंदा या मतदारसंघात ५४.७५ म्हणजे ११.१७ टक्के वाढीव मतदान झाले. शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर, ठाकरे गटाचे सचिन बासरे यांना या वाढीव टक्क्याचा किती लाभ होतो यावर त्यांचे भवितव्य आहे.

 कोणाला बसणार धक्का? कोणाला होणार फायदा ?

नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. त्यात निफाड आणि नाशिक पश्चिम वगळता सर्वच तालुक्यात मतदानाच्या टक्केवारीत…