रायगडमध्ये दोन टक्के मतदान वाढले
अलिबागमध्ये सर्वाधिक 77. 15 टक्के मतदान पनवेलमध्ये मतदान करण्यात महिला आघाडीवर अलिबागः रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क् बजावला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत 2024 मध्ये 2 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. 2024 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीपेक्षा 10 टक्के मतदान वाढले आहे. पनवेल मतदारसंघात सर्वात कमी 58.70 टक्के तर सर्वात जास्त अलिबाग मतदारसंघात 77.15 टक्के मतदान झाले आहे. पनवेल मतदारसंघात मतदान करण्यात पुरूषांपेक्षा महिलांची टक्केवारी जास्त आहे. पनवेल मतदारसंघात 59.28 टक्के पुरूषांनी तर 59.19 टक्के महिला मतदारांनी मतदान केले, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गुरूवरी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपनिवडणूक अधिकारी नितीन वाघमारे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदरसंघ आहेत. या सात मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. त्यापैकी 17 लाख 16 हजार 403 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. 69.80 टक्के पुरूष मतदारांनी मतदान केले. 68. 12 टक्के महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पनवेल मतदारसंघांत मतदान करण्यात पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त आहे. 58.28 टक्के पुरूष तर 59.19 टक्के महिलांनी मतदान केले. पनवेल मतदारसंघात सर्वात कमी 58.70 टक्के मतदान झाले. कर्जतमध्ये 74.29, परणमध्ये 76.80, पेणमध्ये 73.02 , अलिबागमध्ये 77.15, श्रीवर्धनमध्ये 61.37 तर…
