Month: November 2024

मतमोजणी निरीक्षक म्हणून अम्रिता सिंह यांची नियुक्ती

 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी ठाणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी केंद्रिय निवडणूक निर्वाचन आयोगाने 143 डोंबिवली या विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून अम्रिता सिंह (एस.सी.एस) यांची नियुक्ती केलेली आहे. 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या/नागरिकांच्या मतमोजणी विषयक काही तक्रारी असल्यास तक्रारदार हे 22 नोव्हेंबर 2024 पासून conobserver143@gmail.com या ई मेल आयडीवर तक्रार करु शकतात अथवा 9137335604 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करु शकतात. अम्रिता सिंह (एस.सी.एस) यांचे संपर्क ठिकाण: बंगलो नंबर 5, सेंच्युरी रेयॉन कॉलनी, ए-टाईप, कल्याण मुरबाड रोड, शहाड, जिल्हा ठाणे या ठिकाणी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत प्रत्यक्ष भेटून तक्रार करु शकतात, याची नोंद घ्यावी, असे आवाहन 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी केले आहे.

मतमोजणी निरीक्षक म्हणून कमलेश कुमार भादू यांची नियुक्ती

 149 मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघासाठी ठाणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी केंद्रीय निवडणूक निर्वाचन आयोगाने 149 मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून कमलेश कुमार भादू (एस.सी.एस) यांची नियुक्ती केलेली…

मुस्लीम दाम्पत्यास मतदान करण्यास अनिता गौरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला विरोध – डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : मुस्लीम दाम्पत्यास मतदान करण्यास माजी नगरसेविका अनिता गौरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला विरोध केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. खारीगांवमधील गणेश विद्यालयात एका मुस्लीम दाम्पत्याचे मतदान आले होते. ते राहणारे मुंब्रा येथील आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे त्यांचे मतदान खारीगांवातील गणेश विद्यालयात आले होते. हे दोघेही पती…

बीडमध्ये अपक्ष उमेदवाराच मतदान केंद्रातच मृत्यू

बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मतदान केंद्रावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक निधनाने बीडमध्ये शोककळा पसरली आहे. बीड विधानसभा…

सोलापुरात शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून ठाकरेंना दगा

सोलापुर – विधानसभेच्या निवडणूकीत शेवटच्या दिवशी सोलापूर, रामटेक मतदारसंघात ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराऐवजी काँग्रेसकडून अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसनं घेतलेल्या यू टर्नमुळे ठाकरेंना दगाफटका बसला आहे. रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विशाल बरबटे…

‘धारावी प्रोजेक्ट’मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता- शरद पवार

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अदानींच्या नावाचा उल्लेख करून भाजपा महायुतीवर निशाणा साधला गेला. प्रचारात उद्धव ठाकरेंकडून वारंवार धारावी प्रकल्पाचा उल्लेख करून, मुंबई अदानींना विकायला काढल्याचा आरोप करण्यात आला. परंतु अदानींना धारावी प्रकल्पात इंटरेस्टच नव्हता, असा दावा शरद पवारांनी एका मुलाखतीत…

‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन स्कॅमचा पर्दापाश करताना सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमधिल आवाज हा सुप्रीया सुळेंचाच असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिटकॉइन स्कॅमबाबत ही…

नाना पटोले, सुप्रीया सुळेंवर बिटकॉईन स्कॅमचा आरोप

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाजपाने काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉइन स्कॅम केल्याचा तसेच परदेशी चलन निवडणुकीत वापरल्याचा मोठा आरोप केला आहे. मतदान सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला माजी…

जगात भारत सर्वांधिक प्रदूषित

 पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरे मुंबई : जगातील सर्वांधिक प्रदुषित शहरात भारताने अव्वल क्रमांक पटकावला आहे. जगातील पहिल्या दहा प्रदुषित शहरांपैकी तब्बल आठ शहरे भारतातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची…