मतदारयादीतील घोळामुळे दिव्यांग मतदारांना नाहक त्रास
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बुधवारी धावपळ सुरू होती. तर दुसरीकडे बहुसंख्य मतदारांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठी पोहोचली नसल्यामुळे मतदान केंद्रात पोहोचल्यानंतर अनेकांना…
नाशिक-बोरिवली विद्युत बससेवा प्रारंभ
हरिभाऊ लाखे नाशिक : महाराष्ट्र ई वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक-बोरिवली मार्गावर १२ मीटरच्या ई बस चालविण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या सेवेस प्रवाशांचा प्रतिसाद लाभला. मतदानाचा दिवस असल्याने अनेकांनी मतदानानंतर बाहेर प्रवास करण्यास पसंती दिली. राज्य परिवहन महामंडळाकडून ई वाहन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक, बोरिवली, कसारा, सप्तश्रृंगी गड या मार्गांवर ई बससेवा सुरू आहे. सद्यस्थितीत नाशिक-बोरिवली मार्गावर धावणाऱ्या नऊ मीटर ई बस या सप्तश्रृंगी गड, नाशिक- कसारा आणि नाशिक- पिंपळगाव मार्गावर धावत आहेत. त्यामुळे नाशिक -सप्तश्रृंगी गड मार्गावर सहा तर नाशिक कसारा मार्गावर दोन अतिरिक्त फेऱ्या बुधवारपासून सुरू झाल्या. मुंबई नाका परिसरातील महामार्ग ब स्थानकात ज्येष्ठ नागरिक सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, आगार व्यवस्थापक रोहिणी ठाकरे, प्रताप राजपूत आणि पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत नाशिक- बोरिवली शिवाई बसचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रवाशांना पेढे तसेच गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या साधारण बस या मतदान प्रक्रियेत कार्यरत होत्या. यामुळे शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बससेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. प्रवाशांचा या बससेवेस चांगला प्रतिसाद राहिला. 0000
राज ठाकरेंच्या बनावट पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा, आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबईः वरळीतील तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचे बनावटपत्र वायरल झाले असून त्यात राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात धनुष्यबाणाला समर्थन दिल्याचे नमुद करण्यात आले…
“काल भिजलेल्या कोंबडीप्रमाणे, आज कंठ फुटला”
विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल वसई: मंगळवारच्या नोटा वाटप नाट्य प्रकरणानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘काल विनोद तावडे भिजलेल्या कोंबडीप्रमाणे बसले होते आणि मुंबईला गेल्यावर त्यांना कंठफूटला असे ठाकूर म्हणाले. मतदारसंघात कोणी दिसलं तर त्यांना पुन्हा फटकवणार असा इशारा त्यांनी ‘दिखेंगे तो पिटिंगे’ अशा शब्दात दिला. मंगळवारी संध्याकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये नोटा वाटप नाट्य घडले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले होते. तब्बल साडेचार तास त्यांनी भाजप नेत्यांची कोंडी केली होती. या प्रकरणात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या ३६ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पैशांचे वाटप करून मतदारांना लाज दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विनोद तावडे यांनी मात्र आता बविआवर आरोप केले आहेत. हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपचे नव्हते तसेच हॉटेल ठाकुरांच्या मालकीचे होते असाही आरोप तावडे यांनी केला आहे. बुधवारी हितेंद्र ठाकूर यांनी तावडे यांचा आरोपाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणामुळे भाजपाला फायदा होईल असे भाजप नेते सांगत आहेत. याचा अर्थ हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपने मतदारांपर्यंत वाटले असा होतो. पैसे तुमचे, वाटले तुम्ही आणि फायदा देखील तुम्हाला होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. विवांता हॉटेल हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीचे होते असा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. त्याला ठाकूर यांनी जोरदार उत्तर दिले. जर हॉटेल माझ्या मालकीचे होते तर भाजपने का बुक केले? विनोद तावडे यांनी ते हॉटेल माझ्या नावावर करून द्यावे असेही ते म्हणाले. विनोद विनोद तावडे काल विरार मध्ये असताना भिजलेला कोंबडीप्रमाणे बसले होते. मला सारखे फोन करता होते. आता मुंबईत गेल्यावर त्यांना कंठ फुटला असून ते आरोप करत आहेत. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपाची प्रवृत्ती आहे असे ते म्हणाले. ‘आज दिखेंगे तो पिटेंगे’ आज सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. मतदारसंघामध्ये बाहेरची लोकं आल्याने हा वाद निर्माण झाला होता. आज जर पुन्हा कोणी बाहेरून आलेले दिसले तर त्याला पुन्हा फटकावणार असा इशाराही ठाकूर यांनी ‘दिखेंगे तो पिटेंगे’ या धर्तीवर दिला. 00000
तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई ः तृतीयपंथी समाजाला मोठ्या संघर्षातून मतदानाचा हक्क मिळाला आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी बुधवारी (ता. २०) विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. तृतीयपंथी समाजाला मतदानाच्या हक्कापासून कित्येक वर्षे वंचित राहावे लागते होते. आपल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात लढा द्यावा लागला होता. मुंबई व उपनगरात मोठ्या संख्येने तृतीयपंथी समाजाचे वास्तव्य आहे. त्यात उपनगरात १,०७६ पेक्षा अधिक तृतीयपंथी राहतात. घाटकोपर, मानखुर्द, मानखुर्द, शिवाजीनगर, सायन कोळीवाडा, धारावी, माहीम, दहिसर, विलेपार्ले, अंधेरी पश्चिम, विक्रोळी, वडाळा, वर्सोवा व अन्य मतदान केंद्रांवर जाऊन तृतीयपंथींनी मतदान केले. कागदपत्राच्या अपुऱ्या अभावामुळे कित्येक तृतीयपंथींना मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित रहावे लागले आहे. लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद आपल्या बोटात आहे. आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदान केल्याची भावना किन्नर माँ संस्थेच्या अध्यक्षा सलाम खान यांनी व्यक्त केली आहे. ०००
आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश…
मुंबई …लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन जिम्नॅस्टिक्स केंद्रात सराव करणाऱ्या विविध शाळेतील एकूण १३ खेळाडूंनी बालेवाडी , पुणे या ठिकाणी झालेल्या शालेय राज्यस्तरीय ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व…
भिवंडीत तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा अधिकार
शासकीय यंत्रणांबरोबरच उमेदवारांचेही आमच्याकडे दुर्लक्ष भिवंडी : भिवंडी शहरा व ग्रामीण भागात सर्वत्र मतदान शांततेत पार पडत असून शहरातील दांडेकर विद्यालय येथील मतदान केंद्रावर तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात एकूण 179 तृतीयपंथी मतदार नोंदवण्यात आले असून त्यापैकी 119 तृतीयपंथीयांनी मतदान केलं आहे. तृतीय पंथीयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.मात्र आजपर्यंत शासकीय यंत्रणेतील अधिकारी आमच्या घरापर्यंत पोहोचले नसून आम्हाला ओळखपत्र मिळाले नसल्याने अनेक तृतीयपंथीय मतदानापासून वंचित राहिले आहेत.विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी देखील आपल्या घोषणा पत्रात तृतीयपंथी समाजाबाबत आश्वासक भूमिका कोणी मांडली नसल्या बद्दल ची खंत तृतीयपंथीय समाजासाठी काम करणाऱ्या ख्वाईश फाउंडेशनच्या तमन्ना मंसूरी यांनी बोलून दाखवली आहे.
कल्याण-डोंबिवलीत स्वयंस्फूर्तीने नागरिक मतदानासाठी रांगेत
बाचाबाचीच्या घटना, पोलिसांच्या तात्काळ मध्यस्थीने वादावर पडदा कल्याण: कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीसाठी या चारही मतदारसंघातील नागरिकांनी बुधवारी सकाळपासून मतदान केंद्रांबाहेर स्वयंस्फूर्तीने रांगा लावल्या होत्या. या रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिक, वृध्द, कामावर जाणाऱ्या नोकरदारांचा सर्वाधिक सहभाग होता. महिला वर्गाची रांगेतील हजेरी लक्षणीय होती. मतदान केंद्र परिसर, उमेदवारांचे मतचिठ्ठी देण्याचे मंच याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदारांना आपल्या बाजुने वळविण्यासाठीच्या प्रकारांना आळा बसला होता. कल्याण पश्चिमेत उंबर्डे भागातील पुण्योदय पार्क परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मतचिठ्ठी देण्यासाठी मंच लावला होता. या भागात महायुतीचा वरचष्मा आहे. आपल्या भागात आघाडीच्या उमेदवाराचा मंच कसा लागला, असा प्रश्न महायुतीच्या एका कार्यकर्त्याने करून आघाडीच्या कार्यकर्त्याला मंच लावण्यास विरोध करून त्याला शिवीगाळ केली. यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीने हा विषय तात्काळ मिटविण्यात आला. आघाडीच्या उमेदवाराला तेथे मंच लावण्यास परवानगी देण्यात आली. डोंबिवली पश्चिमेत राजूनगर परिसरात एक माजी नगरसेवक आणि एक स्थानिक कार्यकर्ता यांच्यात बाचाबाची झाली. भाजपच्या वरिष्ठाने या प्रकरणात मध्यस्थी करून या प्रकरणावर पडदा टाकला. ग्रामीणमधील दातिवली भागात दोन गटात बाचाबाची झाल्याची चर्चा होती. राजकीय चढाओढीतील हे किरकोळ प्रकार वगळता कल्याण, डोंबिवली परिसरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्र परिसरात मतदारांना कोणी कसलेही आमिष दाखविणार नाही याची विशेष काळजी पोलिसांनी घेतली होती. ज्येष्ठांचे सकाळीच मतदान मतदानाच्या पाच दिवस अगोदर भारतीय निवडणूक आयोग, पक्षीय उमेदवारांकडून मतदारांना घरपोच आपल्या मतदान केंद्राचे ठिकाणाची माहिती व्हाॅटसप, मतचिठ्यांमधून दिली होती. त्यामुळे मतदार स्वयंस्फूर्तीने घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावर येत होते. सकाळी सात वाजल्यापासून वृध्द, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे नोकरदार मतदानासाठी रांगेत होते. मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मतदान केल्यानंतर मतदार केंद्राजवळील सेल्फी केंद्रात सेल्फी काढत होते. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती तरी अनेक जण मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रांबाहेर वृध्द, ज्येष्ठ नागरिक यांना पाणी, आसन व्यवस्थेची सोय करण्यात आली होती. अमेरिकन कॉर्पोरेट मतदान नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत असलेल्या काॅर्पोरेट अपूर्वा पांडे दोन दिवसापूर्वी डोंबिवलीत दाखल झाल्या आहेत. डोंबिवली पूर्वेतील मतदार यादीत नाव असल्याने अपूर्वा यांनी सावरकर रस्त्यावरील संगीता विद्यामंदिरात मतदान केले. गस्तीमुळे शांतता मतदानासाठी सुट्टी असल्याने बहुतांशी नोकरदार रांगेत तिष्ठत राहून मतदान करण्यास लागू नये म्हणून सकाळीच मतदानासाठी कुटुंबीयांसह बाहेर पडला होता. काही मतदार कौतुकाने आपली लहान मुले, पाळीव श्वान घेऊन मतदान केंद्र परिसरात आले होते. दुपारनंतर मतदान केंद्रावरील मतदान यंत्र संथगतीने काम करत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून वाढल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्रांबाहेरील रांगाचे प्रमाण वाढले होते. मतदान केंद्रांवर महिला, वृध्द, ज्येष्ठ यांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून दिले जात होते. कल्याण ग्रामीणमधील लोकग्राम भागात रस्त्यावर एका उमेदवाराचा चार आकडा लिहून प्रचार करण्यात येत होता. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तो क्रमांक पुसून काढला.मतदान केंद्रात येणाऱ्या मतदाराकडील मतचिठ्ठीवर कोणत्याही पक्षाचे चिन्हे नाही याची खात्री करून मगच पोलीस त्यांना मतदानासाठी केंद्रात प्रवेश देत होते. उमेदवार मतदारसंघात कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण, डोंबिवलीतील उमेदवार मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे ना. मतदार कार्यकर्त्यांकडून मतदानासाठी घराबाहेर काढले जात आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी आपल्या मतदारसंघात समर्थकांसह फिरत होते. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे भोजन, त्यांच्या पाण्यासाठी यावेळी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. लोकसभेसारखी परिस्थिती यावेळी निर्माण होऊ नये याची विशेष काळजी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली होती.
