अल्पवयीन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे माथेरानमध्ये शोककळा
माथेरान : माथेरान मधून सहा अल्पवयीन युवक साजगाव यात्रेसाठी खोपोली येथे गेले होते. यात्रेवरून परत येत असताना महड जवळ उभ्या असलेल्या टेम्पोला यातील एका स्कुटीने जोरदार धडक दिली. यामध्ये माथेरान…
जितेंद्र आव्हाडांच्या पाठीमागे मुंब्र्यातील माथाडींच कणखर युवा नेतृत्व म्हणजेच सद्दाम शेख
राज भंडारी ठाणे : जीवनातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, प्रसंगी मिळेल ते काम करत जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर माथाडी कामगारांचे नेतृत्व करीत युवा वर्गाचे नेतृत्व करणारे सद्दाम शेख यांनी वेगळे विश्व निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची मुंब्रा शहरात मोठी प्रशंसा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून सद्दाम शेख यांची ख्याती असली तरी मुंब्रा परिसरात त्यांनी अनेक योजना अंमलात आणून आपले स्थान निर्माण केले आहे. उत्तम वक्तृत्व असलेला हसतमुख चेहरा सदा हसतमुख, उत्तम वक्तृत्व, शिकण्याची वृत्ती, भविष्याची नवी दृष्टी असणारा, क्रिएटिव्ह माईंड आणि कवीमनाचा माणूस म्हणून हे युवा नेतृत्व सध्या चर्चेत आहे, त्यांचा स्वभाव शांत असा आहे. कोणत्याही पाठबळाविना सद्दाम शेख यांनी घेतलेली भरारी नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांनी तरुणांना कष्टाने पुढे जाण्याचा एक मार्गच दाखविला आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट अवघड नाही, याचे हे जिवंत उदाहरण म्हणजे सद्दाम शेख हे आहेत. स्वतःच्या क्षमतांवर त्यांना मोठा विश्वास आहे. आपल्या साऱ्या यशाचे श्रेय ते आई-वडिलांचे संस्कार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या व्यक्तीची साथ यांनाच असल्याचे ते सांगतात. यावेळी ते सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाला राजकारणात मुस्लिमांचा पक्ष असे संबोधले जात असले तरी मी एक मुस्लिम म्हणून एव्हढेच सांगेन, की जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राहताना मी ना हिंदू, ना मुस्लिम, ना बौध्द, ना शीख आहे, त्यांच्या शिकवणीनुसार मी एक भारतीय आहे म्हणून आम्ही देशातील, सर्व प्रांतातील नागरिक हे एक भारतीय म्हणून त्यांच्यासोबत राहत आहोत. आज मुंब्रासारख्या भागात अनेक हिंदूंची, मुस्लिम बांधवांनी तसेच अनेक धर्मांच्या स्नेहबांधवांची प्रार्थनास्थळे उभी राहिली आहेत ती आमच्यासाठी आदरस्थान असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच आहेत. गेले अनेक वर्षे आम्ही याठिकाणी राहतोय तेही सर्व धर्म समभाव या वृत्तीने राहतोय याचे खरे श्रेय हे आम्ही जितेंद्र आव्हाड यांनाच देत असल्याचे त्यांनी सांगितले. खरं तर मुंब्र्यासारख्या विभागाला बदनाम करण्याचे कारस्थान करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे काम सद्दाम शेख यांच्या माध्यमातून दिसत आहे. ज्या ठिकाणी सर्व धर्म, प्रांत एकत्र नांदत असतात, त्याठिकाणी जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम जरी राजकीय पक्ष करीत असले तरी स्थानिक नेतृत्व करणारे युवा नेता सद्दाम शेख यांच्यासारखे कार्यकर्ते हे कदापी होवू न देता, आपला परिसर सुरक्षित कसा राहील याकडे लक्ष देत असतात. ऐन निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारे दंगलीचे प्रकार घडविले जातात, त्यातच मुंब्रा हा भाग अती संवेदनशील म्हणून मानला जात असला तरी सद्दाम शेख यांच्यासारख्या युवा नेतृत्वाने या महाभयंकर घटना घडू नये, म्हणून “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्था हमारा” चा नारा दिला असल्याचे आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे सद्दाम शेख या युवा नेतृत्वाला सलाम !!! ००००
धारावीतील एका मंदिरासंदर्भात खोटे सांप्रदायिक पोस्टर लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न -वर्षा गायकवाड
मुंबई : बटेंगे तो कटेंगे घोषणा देणारेच समाजात फूट पाडून विभाजन करण्याचे काम करत आहेत. प्रचार संपताच सत्ताधारी भाजपा युतीकडून फेक नेरेटीव्ह पसरवले जात आहे. धारावीतील एका मंदिरासंदर्भात खोटे सांप्रदायिक…
सरस्वती मंदिर आयोजित आंतरशालेय खोखो व लंगडी स्पर्धेची घोषणा
सरस्वती मंदिरच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मुंबई: सरस्वती मंदिर, माहीम आयोजित आंतरशालेय खो-खो व लंगडी स्पर्धा सरस्वती मंदिर शाळेच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात सुरु होत आहेत. या स्पर्धेत ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धा फेडरेशनच्या नियमांनुसार खेळवली जाईल. स्पर्धा विभाग: मुंबई शहरातील शाळांमधील खो-खो व लंगडी या दोन खेळांसाठी ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, लंगडीसाठी अधिकतम ३५ किलो वजन असलेले विद्यार्थीच भाग घेऊ शकतील याची नोंद घावी. या स्पर्धेसाठी प्रथम प्रवेशका देणाऱ्या पहिल्या १२ शाळांचाच समावेश केला जाईल. स्पर्धेची तारीख व वेळ: प्रवेशका देण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२४ आहे. शाळांच्या क्रीडा प्रमुखांनी प्रवेशकाचे फॉर्म सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत द्यावेत. प्रवेशकासोबत शाळेच्या मुख्याध्यापकांचा शक्का व सही असलेली खेळाडूंची यादी संबंधित जमा करावी. यादीमध्ये खेळाडूंचे नाव, जन्मतारीख, इयत्ता ही माहिती शाळेच्या जी-आर नुसार बिनचुक भरावी. सामन्याची वेळ: दररोज सकाळी ८.०० वाजता सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणावर स्पर्धा होतील. संपर्क: अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख श्री. सिरिल सर (९९२२९३३६४७) किंवा श्री. बंडगर सर (९९६९०३३०६२) यांच्याशी संपर्क साधा.
रश्मी शुक्लांविरोधातील याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीला राजकीय रंग देऊ नका, उच्च न्यायालयाची टिप्पणी मुंबई: विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. मात्र, त्यांच्या जागी सरकारने संजय कुमार यांची नियुक्ती करताना ती केवळ निवडणूक कालावधीपुरती मर्यादित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच, याचिका करण्याच्या याचिककर्त्याच्या हेतुवर प्रश्न उपस्थित केला. सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन केले आहे. शिवाय, आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीला जनहित याचिकेद्वारे आव्हान कसे काय दिले जाऊ शकते ? या नियुक्तीने जनहित धोक्यात कसे आले आहे ? अशी विचारणा मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिककर्त्यांच्या वकिलाला केली. त्याचप्रमाणे, पोलीस महासंचालकपदी तात्पुरती नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याने सरकारच्या निर्णयाला आव्हान द्यायला हवे. तुम्ही का आव्हान देत आहात ? एखाद्या अधिकाऱ्याची तात्पुरती नियुक्ती केली जात असेल तर याचिककर्त्यांचे त्याने काय नुकसान होणार आहे ? असा प्रश्नही न्यायालयाने केला. त्यावर, याचिकाकर्ते हे लोकसेवक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असे न्यायालयाने सुनावले. तसेच, पोलीस महासंचालकपदाच्या नियुक्तीच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. शुक्ला यांची महासंचालकपदी फेब्रुवारीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती, मग त्यावेळी त्यांच्या नियुक्तीला आव्हान का देण्यात आले नाही, असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्यांना केला व याचिकेवर तातडीच्या सुनावणीची गरज नसल्याचे नमूद करून प्रकरण तातडीने ऐकण्यास नकार दिला. दरम्यान, पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ आणि निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणून निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाच्या या आदेशांचे उल्लंघन करून राज्य सरकारने वर्मा यांची नियुक्ती आचारसंहितेपर्यंत राहील, असे स्पष्ट करणारा आदेश काढला. निवडणूक आयोगाच्या आदेशात असा फेरफार करणे हे आयोगाच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे, असा आरोप करून त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या निवृत्त झाल्या असून त्यांना पुन्हा महासंचालकपदावर नियुक्त करणे नियबाह्य आहे. त्याचप्रमाणे, तात्पुरत्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीमुळे महासंचालकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलनाला बाधा पोहचून कायदेशीर अनिश्चितता उद््भवू शकते. त्यामुळे, सरकारची ही कार्यवाही नियमबाह्य जाहीर करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ०००
वाल्मिकी आणि बुध्द समाजाचा मतदानावर बहिष्कार !
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान बौद्ध आणि वाल्मिकी समाजाचे प्रश्न मर्गिस लावू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं असल तरी समाजाच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला आहे. मग तो घराचा प्रश्न असो किंवा…
फ्लॅश मॉब, पथनाट्य, मॅस्कॉट, सायकलवरील फलक अशा विविध माध्यमांतून मतदान करण्याचा संदेश प्रसारण
नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात कुटुंबियांसमवेत फिरायला बाहेर पडतात किंवा मॉलमध्ये खरेदीसाठी जातात हे लक्षात घेत वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांसोबतच मॉल्समध्ये फ्लॅश मॉब सारख्या आधुनिक नृत्य प्रकारचाही प्रभावीपणे उपयोग करण्यात आला. यामध्ये सीवूड येथील नेक्सस मॉल तसेच वाशी येथील इनॉर्बिट मॉल याठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना आकर्षित करून घेणारी गाणी अचानक सुरू होऊन त्या तालावर मॉलच्या मध्यभागी युवक-युवतींचा समूह नृत्य सुरू करतो. मग आपसूकच त्यांच्याकडे सगळे लोक खेचले जातात आणि नृत्य पाहण्यासाठी भोवताली गर्दी जमू लागते. विविध लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नृत्य समुहाव्दारे नागरिकांना करण्यात आले, त्याला नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारे पथनाट्यासारख्या पारंपारिक प्रचार माध्यमांतूनही महापालिका क्षेत्रात बस डेपो, रेल्वे स्टेशन, मार्केट, वाणिज्य क्षेत्रे, मोठे चौक, नाके अशा वर्दळीच्या ठिकाणी सर्व आठही विभागांमध्ये मागील आठवडाभरात 60 हून अधिक ठिकाणी मतदान जनजागृतीपर पथनाट्ये करण्यात आली. त्यालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याशिवाय मतदान यंत्राचे मॅस्कॉट (शुभंकर) तयार करण्यात आले होते. या मतदान यंत्ररूपी 2 मॅस्कॉटनेही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी फिरून मतदान करा असा संदेश प्रसारित केला. या मॅस्कॉटसोबत अनेकांनी हौसेने सेल्फी छायाचित्रे काढली. मतदानाचा संदेश जनमानसात प्रसारित करण्यासाठी सायकलवर मतदानाचे आवाहन करणारे फलक लावून त्या सायकलीही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत छोट्या रस्त्यांवर फिरविण्यात आल्या व गल्लोगल्लीतील मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा विविध माध्यमांतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कलात्मक रितीने विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायं. 6 या वेळेत मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. ००००
डोंबिवलीत गावठी मद्य विक्रेत्यांवर पोलिसांच्या धाडी
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्व प्रकारच्या मद्य विक्रीला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे अधिकृत परवानाधारी मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. अनेक मद्यपींनी गावठी मद्याच्या अड्ड्यांवर धाव घेतली आहे.…
निवडणूकीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार- जत्रा बंद ठेवा – संदीप माने
अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी,.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ चे नियम ५ ग अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी, मतदानाचा दिवस असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता ठाणे जिल्ह्यातील, ठाणे: करावे गाव, गावदेवी मैदान, से.36, नवी मुंबई आणि मुंब्रा बाजारपेठ व कौसा बाजारपेठ, कल्याण: मांडा, भिवंडी: दुगाड, खारबाव, कोपर, वडवली तर्फे राहूर, राहणाळ, घोलगाव, शहापूर: पिवळी, शेणवे, मळेगाव, टेंभूर्ली (खराडे, चांग्याचा पाडा) या ठिकाणांवर भरणारा आठवडा बाजार किंवा जत्रा बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी डॉ.संदीप माने दृकश्राव्य माध्यमांनी (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया) अशा बातम्या प्रदर्शित करु नयेत. तसेच राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निर्भयपणे, मुक्त वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस यंत्रणा व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सज्ज आहेत. मतदानादिवशी मतदान केंद्रांवर कोणतीही गर्दी होणार नाही व सर्व मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी सर्व केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक पोलीस यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना मतदान केंद्रात मार्गदर्शन करून त्यांचे मतदान जलदगतीने होईल, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणावरील विषयाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडली. या बैठकीस संबंधित सर्व केंद्रीय निवडणूक निरीक्षक, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांच्यासह सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, गुजरात पोलीस, गोवा पोलीस, छत्तीसगड पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पोलीस दलाबरोबरच मतमोजणी केंद्रांवर तसेच मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांनी मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. सर्व नागरिकांना तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदान खोलीमधील व्यवस्थापन सुरळीत होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी रांगेचे व्यवस्थापन तसेच गर्दीचे व्यवस्थापन करताना स्थानिक पोलीस यंत्रणांबरोबरच केंद्रीय सुरक्षा यंत्रणाची मदत होईल. तसेच संवेदनशील व गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आले असल्याचे श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.ईव्हीएमची वाहतूक तसेच स्ट्रॉंगरुमची सुरक्षा व्यवस्थाही चोखपणे ठेवण्यात आली असून केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना अर्लट मोडवर राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.मतदान केंद्राच्या परिसरात अपुरी जागा असेल तेथे विशेष काळजी घेण्याचे निर्देश यावेळी केंद्रीय निरीक्षकांनी दिले. तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी, जेथे मतदारांची जास्त रांगा लागतात अशा परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात यावेत. मतदान प्रक्रियेसंदर्भात अथवा मतदानास उशीर होत असल्यासंदर्भात कोणतीही अफवा पसरवू नये, यासाठी सोशल माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिले. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुढील तास महत्त्वाचे असून अवैध मद्य वाहतूक, अवैध रोकड वाहतूक आदींवर भरारी पथकाने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिल्या. ठाणे शहर व जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा यंत्रणांची तैनात करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणीही योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर तसेच मतदानाच्या रांगेत गर्दी होऊ नये, मतदारांना लवकरात लवकर मत देता यावे, यासाठी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस यंत्रणाही सर्वतोपरी मदत करणार आहे. संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे तसेच अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी ड्रोन, सीसीटीव्ही, विशेष पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त डुंबरे यांनी यावेळी सांगितले. चौकट ठाणे जिल्ह्यात २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून एकूण २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १६ कोटी ५९ लाख ४ हजार रोख रक्कम, ३ कोटी ३२ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा,१ कोटी ८० लाख ३२ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, २३ लाख २६ हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू – दागिने आणि ७ कोटी १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे मोफत वाटपाचे / इतर साहित्य ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.
