Month: November 2024

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टीएमटीची बसव्यवस्था

ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) बस व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या…

प्रीतम जे एम म्हात्रे यांचा विजय निश्चित राज भंडारी

उरण :  उरण तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याचा दावा शेकापच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे. 20 नोव्हेंबर रोजी उरण विधानसभेची मतदान प्रक्रिया पडणार आहे. त्यांच्या प्रचाराला, रॅलीला सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकापने तालुक्यातील गावागावात केलेल्या विकास कामांच्या जोरावर प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. विकासाचे काम करणारे दमदार आमदार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या रूपाने पाहिले जाते. प्रीतम म्हात्रे हे सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. उरण मतदार संघात तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात, नौदलाच्या सेफ्टी झोन, जेएनपीए विस्थापित हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन आदी प्रश्न स्थानिक व भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवारांपेक्षा प्रीतम जे म्हात्रे यांचे सामाजिक काम मोठे असून ते प्रचंड मतांनी निवडून येतील असे शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल शिंदे यांनी सांगितले. ते उमेदवार म्हणून नव्हे तर गेली काही वर्षे या परिसरात सामाजिक काम करत असल्याने त्यांचा विजय नक्की असल्याचे गिरीश माळी यांनी सांगितले. धार्मिक कार्य ते सामाजिक, शैक्षणिक कार्यात प्रीतम जे एम म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रीतम म्हात्रे यांचे सामाजिक कार्य उरण, पनवेल, खालापूर, रायगड परिसरातील नागरिकांना माहिती आहे. कोरोना काळात केलेली मदत तसेच इरसाळवाडी दुर्घटनाग्रस्त जनतेला दिलेला दिलासा हे येथील जनतेने पाहिलेले आहे. प्रीतम जे एम म्हात्रे यांची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून आली. त्यांनी येथील बेरोजगारीचा प्रश्न हाती घेतला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिट्टीचा आवाज जोरदार होईल आणि प्रीतम म्हात्रे प्रचंड मतांनी निवडून येतील असे जेष्ठ कार्यकर्ते तरुण वर्ग सांगत आहे. यानिमित्ताने शेकाप आपला बालेकिल्ला राखेल असे बोलले जात आहे. शांत, शिस्तप्रिय आणि नम्र स्वभावाचा सुशिक्षित उमेदवार म्हणून प्रीतम दादा म्हात्रे यांची छबी निर्माण होत आहे. आज पर्यंत त्यांनी अनेकांना आधार दिला आहे. 20 नोव्हेंबर रोजी प्रीतम दादा म्हात्रे यांना बहुमताने निवडून द्या असे तालुका सहचिटणीस सुरेश पाटील यांनी आवाहन केले आहे.…

म्हाडाचा कारभार लवकरच कागदविरहीत

ई -ऑफिस प्रणालीअंतर्गत सर्व सेवांचे संगणकीकरण होणार   मुंबई : म्हाडाचा संपूर्ण कारभार संगणकीय, कागदविरहित (पेपरलेस) करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार ई ऑफिस प्रणालीअंतर्गत म्हाडातील सर्व सेवांचे लवकरच संगणकीकरण केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने हे संगणकीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावास मुदतवाढ देण्याची वा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबविली जाणार आहे. तर मुंबई मंडळातील भूखंडांच्या भाडेपट्टा करारनाम्यांचे नूतनीकरण संगणकीय पद्धतीने केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांचे संगणकीकरण करण्याच्या कामाला लवकरच म्हाडाच्या संबंधित विभागाकडून सुरुवात केली जाणार आहे. एकूणच या संगणकीकरणामुळे लवकरच म्हाडाचा कारभार कागदविरहीत होणार आहे. म्हाडाकडून गृहप्रकल्प राबविण्यासह सोडतीद्वारे सर्वसामान्यांना घरांचे वितरण केले जाते. तर जुन्या इमारतींचा, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास केला जातो. तर इतर अनेक सेवा पुरविल्या जातात. या सर्व कामांसाठी म्हाडा लाभार्थ्यांसह इतर नागरिकांना म्हाडा भवनासह राज्यभरातील विविध विभागीय मंडळामध्ये यावे लागते. काळानुरूप कारभार संगणकीय करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. त्यानुसार आधी सोडतपूर्व आणि सोडत प्रक्रिया संगणकीय करण्यात आली, तर दीड वर्षांपूर्वीच सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रियाही संगणकीय करण्यात आली आहे. संपूर्ण सोडत प्रक्रिया संगणकीय झाल्याने मानवी हस्तक्षेप दूर झाला असून सोडतीत पारदर्शकता आल्याचे म्हटले जात आहे. सर्वसाधारण सोडतीसह बृहतसूचीवरील घरांची सोडतही आता संगणकीय करण्यात आली आहे. आता म्हाडातील सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांच्या संगणकीकरणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाअंतर्गत जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांना मुदतवाढ देण्याची, तसेच प्रस्तावांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. तर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रस्तावांनाही यापुढे संगणकीय पद्धतीनेच मान्यता दिली जाणार आहे. तसेच भूखंड भाडेपट्टा करारनामा, काररानाम्यांचे नूतनीकरणही ई ऑफिस प्रणालीद्वारे केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. एकूण येत्या काही महिन्यात म्हाडाचा कारभार कागदविरहीत आणि संगणकीय होणार आहे. 0000 000

खरा गद्दार उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा शिवडीतून हल्लाप गरजले

मुंबई : सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे, असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेकजण पक्ष सोडून गेले, त्यांना ते गद्दार बोलताय. खरा गद्दार तर…

मैदानावरची लढाई संपली ‘कागदा’वरची लढाई सुरु

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ‘गांधी’जींच्या दर्शनाकडे कार्यकर्त्यांचे डोळे स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच पक्षांनी दणकून प्रचार केला. सभा, प्रचार फेरी, रॅलींच्या मैदानातून गेले महीनाभर सुरु असलेली मैदानावरची लढाई…

अनिल देशमुख रक्तबंबाळ गाडीवरील दगडफेकीत गंभीर जखमी

नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभेच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी अखेर हिंसेचे गालबोट लागलेच. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली असून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. अनिल देशमुख हे या हल्ल्यात…

अनिल अंबानींच्या कंपन्यांची बोगस खाती

कॅनरा बँकेने अनिल अंबानी यांच्या ‌‘रिलायन्स कम्युनिकेशन्स‌’ला आणखी एक धक्का दिला आहे. कॅनरा बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स इन्फ्राटेल आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड ही फसवणूक खाती असल्याचे घोषित केले आहे. कॅनरा…

भारतात पुढच्या महिन्यात धावणार हायड्रोजनवर ट्रेन

भारतात पुढील महिन्यात दळणवळण क्षेत्रात क्रांती येणार आहे. देशात रस्त्यांचे जाळे घट्ट आहे. आता रेल्वेचे जाळेही दाट करण्यावर मोदी सरकारने भर दिला आहे. त्यातच पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन…

मतदानापुर्वीची उजळणी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपला जाहीरनामा जनतेसमोर मांडला आहे. लाडकी बहीण आणि महालक्ष्मी योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बसमधून फुकट प्रवास, मुलींना आणि मुलांना शिक्षण फुकट या आणि यासारख्या फुकट योजनांची आश्वासने…