Month: November 2024

संसाधानाचं शोषण आणि पर्यावरण

विकसनशील देश जागतिक आर्थिक गटांमध्ये मजबूत होत नाहीत, तोपर्यंत हवामानबदलाच्या समस्येचा ठोस मुकाबला करता येणार नाही. सर्वांना सोबत घेतल्याशिवाय हा लढा अशक्य आहे. हवामानबदलाविरुद्धच्या लढ्यामध्ये देशांचे अनेक स्तर गट आहेत;…

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन २०२४ स्पर्धा

प्रफुल, आर्याची 15 वर्षांखालील गटाच्या फायनलमध्ये धडक मुंबई: ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (GMBA) आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (MBA) संयुक्त विद्यमाने कोर्ट चॅम्पियन्स 24  आयोजित एनएससीआय- योनेक्स सनराईज-महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल मानांकित प्रफुल पार्डी आणि आर्या…

एमसीए कॉर्पोरेट ट्रॉफी बी डिव्हिजन

जीसीएसटी अँड सेंट्रल एक्साइज एससीला विजेतेपद मुंबई : सीजीएसटी अँड सेंट्रल एक्साइज एससी, मुंबई संघाने एमसीए कार्पोरेट ट्रॉफी बी डिव्हिजन 2024-2025  स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रविवारी एमसीए क्रिकेट ग्राउंड, बीकेसी येथे खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत रविवारी…

 मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा

ठाण्याच्या अनुज अग्रवालचा मुंबईच्या राहुल सचदेववर विजय मुंबई :– ठाण्याचा क्यूईस्ट अनुज अग्रवालने सातत्य राखताना मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात मुंबईच्या राहुल सचदेववर 4-2 असा विजय मिळवला.एमएचसी  बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत सोमवारी अग्रवालने 0-1 अशा पिछाडीवरून 31 गुण (तिसरी फ्रेम), 32 (चौथी फ्रेम) आणि 40 (पाचवी) अशा तीन सलग फ्रेम्समध्ये खेळ उंचावताना  61-62, 53-49, 62-22,…

बॉम्बे जिमखाना क्रिकेट निवडचाचणी २१ आणि २२ नोव्हेंबरला

 मुंबई : बॉम्बे जिमखान्याच्या बीजी केअर्स (BG Cares) या सीएसआर उपक्रमातर्गत जिमखाना मैदानावर २१ आणि २२ नोव्हेंबर २०२४ रोजी १९ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या १९ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट…

आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली

६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर, दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C Vigil) ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८…

निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्राची तीन हजार किमीपेक्षा जास्त सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा अशा सहा राज्यांसह दादरा, नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे. ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते पोलीस महासंचालक स्तरावर आंतरराज्यीय समन्वय, गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण बाबत आंतरराज्य समन्वय बैठका घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आंतरराज्यीय तपासणी नाक्यांवर मनुष्यबळ तैनात करून अवैध रोख रक्कम, दारू, अवैध अग्निशस्त्रे, अंमली पदार्थ, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, बोगस मतदार यांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरीता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक कालावधीत बंदोबस्ताकरीता सीएपीएफ/ एसएपी/ एसआरपीएफ कंपन्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेण्यात आलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सुद्धा पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. गुन्हेगार, असामाजिक घटक आणि निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित समस्या निर्माण करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. बीएनएसएस अंतर्गत 96,448 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, कलम 93 अंतर्गत 5727, पीआयटीएनडीपीएस अंतर्गत 1, एमपीडीए 1981 अंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेचे आदेश 104 तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत तडीपारीच्या 1343 कारवाया करण्यात आल्या आहेत. अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी, फरारी व पाहिजे आरोपी यांना अटक, बेकायदेशीर अग्निशस्त्रे, अवैध दारू, रोख रक्कम, अंमली पदार्थ, फ्रिबीज जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये जमा करण्यात आलेल्या परवानाकृत अग्निशस्त्रांची संख्या 56,631 असून 28,566 अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 396 अवैध अग्निशस्त्र तर 1856 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जप्तीच्या कारवाईमध्ये 74.89 कोटी रुपये, 36.07 कोटी रुपयांची 42.31 लाख लिटर दारू, 29.36 कोटी रुपये किमतीचे 14,224 किलो अंमली पदार्थ, 202.62 कोटी किमतीचे 16,254 किलो मौल्यवान धातू, 65.97 कोटी किमतीचे मोफत आणि इतर वस्तू असे 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 408.91 कोटी रुपये किमतीची जप्ती करण्यात आली आहे. व्हीआयपी बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कामासाठी सर्व घटकां‌द्वारे ड्रोनचा व्यापक वापर केला जात असून विधानसभा निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र पोलीस सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कलानी समर्थकांच्या घरावर ‘आयकर’चा छापा

३९ जणांना तडीपारीच्या नोटिसा उल्हासनगर : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना ओमी कलानी यांच्या दोघा समर्थकांच्या घरी आयकर विभागाने रविवारी छापे टाकले. कमलेश निकम यांच्यासह ३९ जणांवर सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत निवडणूक काळात पोलिसांनी तडीपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत. ओमी यांचे कट्टर समर्थक असलेल्या दोन स्थानिक नेत्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकल्याची चर्चा होती. याबाबत निकम यांना विचारले असता, त्यांच्यासह एका समर्थकाच्या घरावर छापा टाकल्याची कबुली दिली. ‘राजकीय हेतूने कारवाई’ कल्याण ग्रामीणमधून पालांडे, अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर कलानी समर्थक सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आले आहेत. राजकीय हेतूने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप कमलेश निकम यांनी…

भव्य प्रचार रॅलीने डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचाराची सांगता

शेवटच्या रॅलीत हजारो अबालवृद्धांचा जोशपूर्ण सहभाग अनिल ठाणेकर ठाणे : महाविकास आघाडीचे  अधिकृत उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचाराचा समारोप  सोमवारी प्रचंड गर्दीच्या रॅलीने मुंब्र्यात केला . या शेवटच्या भव्य प्रचार रॅलीत हजारो नागरिक , महिला आणि…

रक्तदात्यांना भेटवस्तू द्याल तर खबरदार!

रक्तपेढ्या केंद्रांना सक्त ताकीद; ऐच्छिक रक्तदानावर भर मुंबई : रक्तदान शिबिरात हेल्मेट, हेडफोन आणि ब्लूटूथ यांसारखी उपकरणे व इतर वस्तू देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले जाते. हे ऐच्छिक रक्तदानाच्या मूलभूत तत्त्वांना मूठमाती देणारे असल्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) कठोर निर्देश देताना सर्व रक्तपेढ्या आणि रक्तदान शिबिर आयोजकांना भेटवस्तू देण्यास मनाई केली आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास कडक कारवाईचा इशाराही परिषदेने दिला आहे. रक्त शिबिरांची माहिती देण्यासाठी सर्रास होर्डिंग, बॅनर उभारले जातात. त्यावर भेटवस्तू देण्याचे प्रलोभन दिले जाते. रक्तदात्यांची गर्दी जमवण्यासाठी हे सर्रास केले जात असल्याचा आरोप केला जात होता. या पार्श्वभूमीवर परिषदेने हे आदेश जारी केले आहेत. वाढदिवस, स्मृतिदिनांसह काही प्रसंगी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, मंडळांकडून ऐच्छिक रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. शिबिरांत रक्तदानासाठी रक्तपेढ्या आणि रक्त संकलन केंद्रांशी संपर्क साधला जातो. या रक्तदान शिबिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्तदात्यांची संख्या वाढवण्यासाठी पिशव्या, कूपन, छोटे मोबाईल, ब्लूटूथ हेडसेट, ब्लूटूथ स्पीकर, स्वयंपाकघरातील भांडी, क्रोकरी सेट, घड्याळे, पेन, थर्मास, बाटल्या आदी भेटवस्तूंचे वाटप केले जाते, हे अनेकदा निदर्शनास आले आहे. दरम्यान, भेटवस्तूंच्या आशेने अनेक रक्तदाते रक्तदानासाठी येत होते, मात्र आता भेटवस्तूंचे वाटप करण्यास मनाई करण्यात आल्यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी होण्याची भीती सामाजिक संस्था व्यक्त करत आहेत. हमीपत्र द्यावे लागणार जारी केलेल्या नव्‍या परिपत्रकानुसार रक्त केंद्रे आणि रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या संस्थांना शिबिरापूर्वी भेटवस्तू देणार नाहीत, असे हमीपत्र द्यावे लागणार आहे.  रक्तदान शिबिरांच्या नोंदी पाच…