Month: November 2024

उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच

मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली उल्हासनगर : मतदानाची प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा,सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्याकरिता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी कंबर कसली आहे.त्यासाठी…

रश्मी शुक्लांविरोधातील याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार

पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीला राजकीय रंग देऊ नका, उच्च न्यायालयाची टिप्पणी मुंबई: विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. मात्र, त्यांच्या जागी सरकारने संजय कुमार यांची नियुक्ती करताना ती केवळ निवडणूक कालावधीपुरती मर्यादित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच, याचिका करण्याच्या याचिककर्त्याच्या हेतुवर प्रश्न उपस्थित केला. सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन केले आहे. शिवाय, आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीला जनहित याचिकेद्वारे आव्हान कसे काय दिले जाऊ शकते ? या नियुक्तीने जनहित धोक्यात कसे आले आहे ? अशी विचारणा मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिककर्त्यांच्या वकिलाला केली. त्याचप्रमाणे, पोलीस महासंचालकपदी तात्पुरती नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याने सरकारच्या निर्णयाला आव्हान द्यायला हवे. तुम्ही का आव्हान देत आहात ? एखाद्या अधिकाऱ्याची तात्पुरती नियुक्ती केली जात असेल तर याचिककर्त्यांचे त्याने काय नुकसान होणार आहे ? असा प्रश्नही न्यायालयाने केला. त्यावर, याचिकाकर्ते हे लोकसेवक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असे न्यायालयाने सुनावले. तसेच, पोलीस महासंचालकपदाच्या नियुक्तीच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. शुक्ला यांची महासंचालकपदी फेब्रुवारीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती, मग त्यावेळी त्यांच्या नियुक्तीला आव्हान का देण्यात आले नाही, असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्यांना केला व याचिकेवर तातडीच्या सुनावणीची गरज नसल्याचे नमूद करून प्रकरण तातडीने ऐकण्यास नकार दिला. दरम्यान, पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ आणि निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणून निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाच्या या आदेशांचे उल्लंघन करून राज्य सरकारने वर्मा यांची नियुक्ती आचारसंहितेपर्यंत राहील, असे स्पष्ट करणारा आदेश काढला. निवडणूक आयोगाच्या आदेशात असा फेरफार करणे हे आयोगाच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे, असा आरोप करून त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या निवृत्त झाल्या असून त्यांना पुन्हा महासंचालकपदावर नियुक्त करणे नियबाह्य आहे. त्याचप्रमाणे, तात्पुरत्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीमुळे महासंचालकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलनाला बाधा पोहचून कायदेशीर अनिश्चितता उद््भवू शकते. त्यामुळे, सरकारची ही कार्यवाही नियमबाह्य जाहीर करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट

फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले कल्याण : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता.  त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारावर भर देत होता. कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. पण काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह हा नेत्यांच्या अंगलट येताना दिसला. कल्याण पश्चिम विधानसभेतील जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांच्या जीवावर बेतला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या दुर्घटनेतून राकेश मुथा थोडक्यात बचावले असले तरी सदर दुर्घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकले असते. नेमके काय झाले? राकेश मुथा रविवारी रात्री उशिरा प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी दीडशे किलो वजनाचा भव्य हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. मात्र, हारासोबत लावलेल्या इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्याला लागली. या कारणाने त्यांच्या केसांनी पेट घेतला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आग विझवली. यानंतरही राकेश मुथा कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहिले. त्यांच्या हावभावामुळे त्यांना अधिक दुखापत झालेली नसल्याचे दिसून आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा अतिरेकी उत्साह हा धोका निर्माण करू शकतो, हेच या घटनेवरून दिसून आले. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. महापालिका अधिकारी जाणूनबुजून बॅनर फाडत असल्याचा आरोप करून मुथा यांनी निषेध आंदोलन करत दोन तास ठिय्या दिला होता. गेल्या काही दिवसांपासून राकेश मुथा यांचे बॅनर वारंवार फाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळेच त्यांच्याकडून हे कृत्य केले जात असल्याचा आरोप मुथा यांनी केला. तसेच महापालिका अधिकारी कुणाच्यातरी दबावात काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

११० पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे

अवैध व्यवसायांविरोधात व्यापक कारवाई  मद्य, गुटखा, शस्त्रास्त्रे जप्त हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीसांकडून अवैध व्यवसायांविरोधात जिल्ह्यात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाकडून निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ११० पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४८ सराईत गुन्हेगार हद्दपार करण्यात आले असून एमपीडीए कायद्यान्वये दोन सराईत स्थानबध्द आहेत. १४ देशी बंदुका, ३७ जिवंत काडतुस, ४३ तलवारी, नऊ कोयते चॉपर,…

महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे कबड्‌डी व खो-खो स्पर्धेची घोषणामहर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे कबड्‌डी व खो-खो स्पर्धेची घोषणा

मुंबई: महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ व कनिष्ठ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन कबड्‌डी व खो खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा कौशल्य गुणांना वाव…

पुरुषत्तोम इरनकला ‘आनंद श्री’ किताब

ठाणे  : ठाण्याच्या आद्य श्री आनंद भरती व्यायामशाळेच्या विद्यमाने ११४ व्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ४२ व्या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पहिल्या शॉर्ट गटातील देवा जिमच्या पुरुषोत्तम इरनकची ५८ स्पर्धामधून…

म्हाडाचा कारभार लवकरच कागदविरहीत

 ई -ऑफिस प्रणालीअंतर्गत सर्व सेवांचे संगणकीकरण होणार मुंबई : म्हाडाचा संपूर्ण कारभार संगणकीय, कागदविरहित (पेपरलेस) करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार ई ऑफिस प्रणालीअंतर्गत म्हाडातील सर्व सेवांचे लवकरच संगणकीकरण केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने हे संगणकीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावास मुदतवाढ देण्याची वा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबविली जाणार आहे. तर मुंबई मंडळातील भूखंडांच्या भाडेपट्टा करारनाम्यांचे नूतनीकरण संगणकीय पद्धतीने केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांचे संगणकीकरण करण्याच्या कामाला लवकरच म्हाडाच्या संबंधित विभागाकडून सुरुवात केली जाणार आहे. एकूणच या संगणकीकरणामुळे लवकरच म्हाडाचा कारभार कागदविरहीत होणार आहे. म्हाडाकडून गृहप्रकल्प राबविण्यासह सोडतीद्वारे सर्वसामान्यांना घरांचे वितरण केले जाते. तर जुन्या इमारतींचा, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास केला जातो. तर इतर अनेक सेवा पुरविल्या जातात. या सर्व कामांसाठी म्हाडा लाभार्थ्यांसह इतर नागरिकांना म्हाडा भवनासह राज्यभरातील विविध विभागीय मंडळामध्ये यावे लागते. काळानुरूप कारभार संगणकीय करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. त्यानुसार आधी सोडतपूर्व आणि सोडत प्रक्रिया संगणकीय करण्यात आली, तर दीड वर्षांपूर्वीच सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रियाही संगणकीय करण्यात आली आहे. संपूर्ण सोडत प्रक्रिया संगणकीय झाल्याने मानवी हस्तक्षेप दूर झाला असून सोडतीत पारदर्शकता आल्याचे म्हटले जात आहे. सर्वसाधारण सोडतीसह बृहतसूचीवरील घरांची सोडतही आता संगणकीय करण्यात आली आहे. आता म्हाडातील सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांच्या संगणकीकरणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाअंतर्गत जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांना मुदतवाढ देण्याची, तसेच प्रस्तावांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. तर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रस्तावांनाही यापुढे संगणकीय पद्धतीनेच मान्यता दिली जाणार आहे. तसेच भूखंड भाडेपट्टा करारनामा, काररानाम्यांचे नूतनीकरणही ई ऑफिस प्रणालीद्वारे केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. एकूण येत्या काही महिन्यात म्हाडाचा कारभार कागदविरहीत आणि संगणकीय होणार आहे.

डबेवाल्यांच्या व्यवसायाला उतरती कळा

 मुंबई डबेवाला असोसिएशनची शासन दरबारी याचना मुंबई : करोना काळानंतर मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली असून डबेवाले आर्थिक संकटात सापडले आहेत. झोमॅटो, स्विगी यांसारख्या ऑनलाईन ॲपचा फटकाही डबेवाल्यांना बसत आहे. वर्षानुवर्षे मुंबईकरांना कार्यालयात जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या संघटनेने शासनाचा मदतीचा हात मिळावा अशी याचना केली आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनने डबेवाल्यांसाठी महामंडळ, हक्काची घरे, मेट्रोमध्ये स्वतंत्र मालडब्याची व्यवस्था आदी विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत. मुंबईतील डबेवाले विविध समस्यांचा सामना करत पारंपरिक व्यवसाय जपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मदतीची अपेक्षा करत डबेवाल्यांच्या संघटनेने शासनाचे दार ठोठावले आहे. शासन वेगवेगळ्या समाज घटकांसाठी विविध योजना, महामंडळांची घोषणा करत आहे. मात्र, मुंबईच्या डबेवाल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे. डबोवाल्यांची सेवा मंदावल्यामुळे घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक डबेवाल्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच, डबेवाल्यांना भक्कम आधार देण्यासाठी शासनाने डबेवाल्यांसाठी महामंडळ तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विविध योजनांमध्ये डबेवाल्यांचा समावेश करावा, त्यांना स्वतंत्र घटक म्हणून ओळख मिळावी. जेणेकरून त्यांना स्वतंत्रपणे योजनांचा लाभ घेता येईल. तसेच, मुंबईत सुरू झालेल्या मेट्रोतून डब्बेवाल्यांना सामान घेऊन जाण्यास मनाई आहे. त्यामुळे मेट्रोमध्येही मालडब्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी डबेवाल्यांनी केली आहे. डबेवाल्यांनी मुंबईत परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी गृहनिर्माण प्रकल्पात आरक्षण देण्यात यावे. गिरणी कामगार, माथाडी कामगारांना ज्याप्रमाणे मुंबईत घरे दिली, त्याप्रमाणे डबेवाला कामगाराला मुंबईत घरे द्यावी, यासाठी धोरण आखावे, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे.

कॉ. जे. पी. गावीत यांच्या प्रचारासाठी कळवणमध्ये शरद पवार मैदानात

कळवण : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सात वेळा आमदार राहिलेले कॉम्रेड जे पी गावित यांच्या निवडणूक प्रचारासाठी नुकतीच कळवण विधानसभा मतदारसंघात मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली.  या बैठकीला राजकीय नेते आणि सामान्य जनतेने मोठा प्रतिसाद दिला.या सभेचे प्रमुख वक्ते राष्ट्रवादीचे (शप गट) अध्यक्ष शरद पवार होते. त्यांनी जे पी गावीत यांच्या विजयाचे ठोस आवाहन करत जमावाला संबोधित केले. त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आणि आगामी निवडणुकीत शेतकरी नेते जे.पी.गावित विजयी होणे का गरजेचे आहे हे सांगितले. महाविकास आघाडी सरकार निवडून आल्यास, शेतकऱ्यांचे कल्याण, महिला सुरक्षा, रोजगार हा मुख्य धोरणाच्या अजेंडा असेल,असे शरद पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील इतर अनेक प्रमुख नेत्यांनीही सभेला संबोधित केले. सीपीआय(एम) चे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी राज्याची राजकीय व आर्थिक चौकट मजबूत करण्याच्या पक्षाच्या बांधिलकीबद्दल सांगितले. स्थानिक मविआ खासदार भास्कर भगरे, शिवसेना (उबाठा) नेते मोहन गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) नेते रविबाबा देवरे आणि काँग्रेस नेते शैलेश पवार या सर्वांनी गावित यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीचे ऐक्य आणि राज्यासाठीचे सामायिक धोरण अधोरेखित केले.या मेळाव्यात माकपचे प्रमुख नेते राज्य सचिवमंडळ सदस्य सुनील मालुसरे, सुभाष चौधरी व इतर राज्य समिती सदस्य, मविआ नेते आणि समर्थक उपस्थित होते. या सर्वांनी गावित यांच्यासोबत एकजूट व्यक्त केली. सर्व स्थानिक मतदार आणि प्रादेशिक नेत्यांच्या अतुलनीय पाठिंब्याने, या सभेने निवडणूक प्रचारासाठी जोरदार वातावरण तयार केले. मविआच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील, सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा स्पष्ट संदेश या सभेने दिला.

कोपरीत शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने

दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण ठाणे : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी येथील अष्टविनायक चौकात दुचाकी रॅलीदरम्यान शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले.…