Month: November 2024

‘प्रचारात मागे राहाल, पालिकेच्या तिकिटाला मुकाल’

एकनाथ शिंदे यांच्याकडून बदलापुरात सर्व पक्षियांची कान उघाडणी बदलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडला आणि तुमच्या प्रभागात जर आपल्या उमेदवाराला कमी मते मिळाली तर लक्षात ठेवा पालिका निवडणुका तोंडावर आहेत. तुम्हाला तिकीटाला मुकावं लागेल, अशी स्पष्ट कान उघाडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापुरात महायुतीच्या मेळाव्यात केली. भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी शिंदे बदलापुरात आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कथोरे यांच्याविरुद्ध प्रचार सुरू केल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दात सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. तुम्ही वामन म्हात्रे यांची कळ काढली असेल तर दुरुस्त करा. तुमच्यातील वाद स्थानिक पातळीवर मिटवा आणि राज्याचा विचार करून महायुतीचा उमेदवार जिंकवा असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना महायुतीतील घटक पक्षांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र मुरबाडमध्ये होते. शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्याविरुद्ध जाहीर आघाडी उघडली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार किसन कथोरे यांच्यासाठी बदलापुरात महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना शिंदे यांनी आमदार किसन कथोरे यांच्यासह वामन म्हात्रे आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कान उघाडणी केली. आपण महायुतीमध्ये काम करत आहोत. असे असताना आपापसातील मतभेद मिटवा. कथोरे आपण म्हात्रे यांची काही कळ काढली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा. शिवसेनेच्या तसेच महायुतीतील सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी सोबत काम करा, अशा सूचना शिंदे यांनी यावेळी केल्या. ज्या प्रभागात कथोरे यांना कमी मतं मिळतील, त्या प्रभागातील नगरसेवकाचे पालिका निवडणुकीचे तिकीट कापले जाईल असाही स्पष्ट इशारा यावेळी शिंदे यांनी बोलताना दिला. शिवसेनेच्याच नाही तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांचे तिकीटही कापले जाईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यासोबतच वामन म्हात्रे याच्या केसालाही धक्का लागणार नाही असे वक्तव्य करत म्हात्रे यांना अडचणीत आणणाऱ्यांना शिंदे यांनी इशारा दिला. या समेट भाषणानंतर महायुतीचे आणि विशेषतः शिवसेनेचे पदाधिकारी अखेरच्या टप्प्यात प्रचारात सक्रिय होतील अशी आशा भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. बेईमानी खपून घेणार नाही तुम्हाला आम्ही मोठे केलं, तुम्हाला सत्ता दिली, तुम्हाला जिल्हा परिषदेचा कारभार दिला असे असताना पण तुम्ही बेइमानी केली. हा एकनाथ शिंदे ही बेइमानी खपवून घेणार नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांचा समाचार घेतला. पवार हे शिवसेनेचे उपजिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली होती.

दिघे साहेबांची प्रतिमा फाडण्याचे धाडस होते कसे ?

 केदार दिघे यांचा सवाल ठाणे : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे केदार दिघे हे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात काही पत्रके चिटकविण्यात आली होती. या पत्रकांवर आनंद दिघे यांचेसुद्धा छायाचित्र होते. परंतु ही पत्रके फाटलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत. या फाटलेल्या पत्रकांवरून केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला. दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावलेली होती ती फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचे होते तर माझा फोटो काढायचा होता? निवडणुकीत तुम्हाला दिघे साहेब अडचणीचे ठरू लागले का असा प्रश्न त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून केदार दिघे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवित आहेत. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील निवडणूक लढवित आहेत. केदार दिघे यांनी त्यांच्या ‘एक्स’ समाजमाध्यमावरून एक ट्वीट प्रसारित केले आहे. त्यामध्ये त्यांचे पत्रक फाडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी एक संदेश देखील त्यामध्ये लिहिला आहे. ‘दिघे साहेबांवरचे प्रेम फक्त चित्रपटापुरतेच का? दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावली आहे. ती प्रतिमा फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचेच होते तर माझा फोटा काढायचा होता. निवडणुकीत तुम्हाला साहेब अडचणीचे ठरू लागलेत का? मिंधे उत्तर द्या.’ असे त्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

इथे फक्त डॉ. जितेंद्र आव्हाड यांनाच समर्थन

कौसा येथील सोसायट्यांनी लावले फलक ! अनिल ठाणेकर ठाणे : कौसा येथील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ..जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या सोसायट्यांनी आपल्या आवारात इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ…

बंडाचे तण माजले जोमाने!

सहा प्रमुख पक्ष, अनेक आघाड्या यामधून महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटलेल्या सगळ्यांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. त्यातच सहा प्रमुख पक्षांच्या आघाड्यांमध्ये जागावाटप करण्याची वेळ आल्याने जागा मर्यादित आणि इच्छुक अमर्यादित असे चित्र तयार…

विद्यार्थ्यांसाठी समाज-माध्यमे घातकच

काहीतरी नवीन… श्याम तारे मुलांच्या हाती मोबाईल देणे हे आता सामान्य झाले असले तरीही त्याचे दुष्परिणाम मुलांवर होतात की नाही यावर सध्या वाद-विवाद सुरु आहेत. काहींच्या मते हे नवे तंत्रज्ञान…

स्वस्त कर्जाची शक्यता मावळली…

ऑक्टोबर 2024 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर सहा टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर भारतीय शेअर बाजारात निराशा आहे तर दुसरीकडे स्वस्त ईएमआयची अपेक्षा मावळली आहे. किरकोळ चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या सहिष्णुता बँडच्या 6.21…

सुनिता विल्यम्सचे आरोग्य ढासळतेय…

लक्षवेधी शंतनु चिंचाळकर गेले पाच महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीर महिलेचे अलीकडेच प्रसिध्द झालेले फोटो चिंताअ वाढवणारे आहेत. चेहरा आणि शरीरयष्टी पाहता कॅलरीजच्या कमतरतेमुळे एकूणच तिचे…

एमसीए कॉर्पोरेट ट्रॉफी ए अँड ‘बी’ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा

 एमआयजी सीसीला जेतेपद; जठार, जैस्वाल चमकले मुंबई:गौरव जठारचे (55 धावा) दमदार अर्धशतक आणि अंकुश जैस्वालच्या (5/11) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनचा (केएसए) चार विकेट राखून पराभव करताना एमआयजी क्रिकेट क्लबने एमसीए प्रेसिडेंट चषक ए आणि बी डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत जेतेपद पटकावले. बीकेसी येथील एमसीए स्टेडियम खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत रविवारी कर्नाटक एसएने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तरी आघाडी फळीने निराशा केली. मात्र, मधल्या फळीतील ऐश्वर्य सुर्वेने 47, अजिंक्य पाटीलने 31 आणि वैभव माळीने 27 धावांची भर घातल्याने त्यांनी 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या. अंकुशने 11 धावांत निम्मा संघ गारद केला. त्याला हर्ष तन्नाची (2/33) चांगली साथ लाभली. एमआयजी क्रिकेट क्लबने 19.1 षटकांत 6 विकेटच्या बदल्यात विजयी लक्ष्य पूर्ण केले. गौरवने 55 धावा करताना त्यात मोलाचे योगदान दिले. अथर्व अंकोलेकरने नाबाद 29 आणि ओम केशकामतने 25 धावा काढताना विजयाला हातभार लावला. कर्नाटक एसएकडून भव्य अत्रेने 2 विकेट घेतल्या. संक्षिप्त धावफलक – एमसीए प्रेसिडेंट चषक: कर्नाटक एसए – 20 षटकांत 9 बाद 147 (ऐश्वर्य सुर्वे 47, अजिंक्य पाटील 31, वैभव…

शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेला २४ नोव्हेंबरपासून मुंबईत प्रारंभ

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी (मुंबई केंद्र १) साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नीरोड येथे सुरू होत आहे. २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२४ दरम्यान हि स्पर्धा होईल. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.   सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण १८ संघांचा सहभाग आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.