Month: November 2024

 मुलुंडमध्ये पाच वर्षात होणार पाच मोठे प्रकल्प

 मुलुंडचा चेहरामोहरा बदलण्याचा भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांना विश्वास रेल्वे टर्मिनस, पक्षी उद्यान, केबल कार, क्रिडा पार्क आणि डीपी रोड हे पाच प्रकल्प लवकरच होणार मुंबई : पुढच्या काही वर्षात मुलुंडमध्ये पाच माेठे प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे मुलुंड उपनगराचा पूर्ण कायापालट होईल, असा विश्वास स्थानिक आमदार व भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे मुलुंड विधानसभा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला. या पाच प्रकल्पांमध्ये रेल्वे टर्मिनस, क्रिडा पार्क, पक्षी उद्यान, तीन डीपी रोड आणि रोपवे (केबल कार) प्रकल्पांचा समावेश आहे. यासदंर्भात माहिती देताना आमदार कोटेचा म्हणाले की, मुलुंडमध्ये तीन डीपी रोड मंजूर झाले आहेत. या नव्या रोडमुळे शहरातील वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे. मुलुंडमध्ये साडेचार एकरावर पक्षी उद्यान होत असून सिंगापूरच्या धर्तीवर होणाऱ्या या पक्षी उद्यानामुळे मुंबईच्या पर्यटनस्थळात नव्या स्थळाची भर पडणार आहे. सरदार प्रतापसिंह गार्डच्या टेकडीवर केबल कार बनवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुलसी तलावाच्या विहंगम दृश्याचा आनंद घेता येणार आहे. मुलुंडला क्रिडा कॉम्प्लेक्स बनवण्यात येत असून सर्व आऊटडोअर खेळांची सुविधा येथे असणार आहे. कोटेचा पुढे म्हणाले की, स्वतंत्र मुलुंड रेल्वे टर्मिनसच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलुंडच्या या स्वतंत्र टर्मिनसमुळे मध्य रेल्वेचा ताण कमी होईल. तसेच कच्छ, उत्तर प्रदेश आणि कोकणमध्ये जाणाऱ्यांना मुलुंडमधूनच एक्सप्रेस रेल्वेगाड्या पकडता येणार असल्याचे मिहीर कोटेचा यांनी सांगितले. मुलुंडमध्ये आज बहुसंख्येने मॉल्स आहेत. पण, पुढच्या पाच वर्षाच्या आत सदर पाच प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे मुलुंड हे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनेल. मुलुंडमधील रहिवाशांना विकएंडला दूर जाण्याची गरज लागणार नाही. येथील वाहतुक कोंडी संपुष्टात येईल. स्थानिक खेळाडूंना येथे सुविधा मिळेल आणि येथील पर्यटनाच्या वाढीला चालना मिळेल, असे आमदार मिहीर कोटेचा यांनी स्पष्ट केले. आमदार मिहीर कोटेचा यांना भाजपच्या पहिल्या यादीत मुलुंडमधून महायुतीची विधानसभा उमेदवारी जाहीर झाली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत मिहीर कोटेचा यांनी मुलुंडमधून ५६ टक्के मते मिळवत तब्बल ५७ हजार ३४८ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. कोटेचा हे भाजपमध्ये तीन दशके सक्रीय असून ते भाजपचे प्रदेश खजिनदार आहेत. मुलुंडमध्ये होणारे ५ प्रकल्प : १. साडेचार एकर क्षेत्रावर सिंगापूरच्या धर्तीवर पक्षी उद्यान. २. सरदार प्रतापसिंह गार्डन पासून रोपवे. ३. मुलुंड पूर्व येथे स्पोर्ट कॉम्प्लेक्स. ४. स्वतंत्र मुलुंड रेल्वे टर्मिनस. ५. तीन नवे डीपी रोड.

रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी

मुंबई :रिझर्व बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला असून हा दूरध्वनी रिझर्व बँकेच्या ग्राहक महत क्रमांकावर आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर – ए – तैयब’चा विशेष कार्यकारी…

५१,७६,००० रुपये किंमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिरारोड येथून जप्त

मिरा भाईन्दर : पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार मध्यवर्ती गुन्हे कक्षाने आर्यन या इसमाला ५०० रुपयाच्या बनावट नोटा घेवून जाताना डॉन बास्को स्कुल जवळ, मुन्शी कपाऊन्ड व प्रेझेन्ट पार्क रोडकडे जाणारे…

पुण्याचे क्यूईस्ट गौरव देशमुख, आरव संचेती बाद फेरीत

मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा मुंबई : पुण्याच्या गौरव देशमुख आणि  आरव संचेती यांनी लीग सामने जिंकताना मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बाद फेरी गाठली. मलबार हिल…

आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ या दिवशी होईल. त्यासाठी अर्ज पाठवण्याचा शेवटचा दिवस २८ नोव्हेंबर २०२४ असा आ्रहे. हे अर्ज संस्थेच्या फेसबुक आणि dadarmatungaculturalcentre.org या वेबसाईट वर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः ०२२-२४३०४१५०.

अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाचा काँग्रेसला पाठिंबा.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल असून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला असून या संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अनिल चौगुले यांनी पाठिंब्याचे पत्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना दिले आहे. मुंबई शहरात नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे लाखो रहिवासी आहेत, हा समाज काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे चौगुले यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल खासदार वर्षा गायकवाड यांनी नाथपंथी डवरी समाजाचे आभार व्यक्त केले आहेत.

काँग्रेस व डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या राजनाथसिंह यांनी माफी मागावी

 डॉ. बाबासाहेबांचे संविधान रामलीला मैदानावर जाळून भाजपाकडूनच संविधाननिर्मात्यांचा अपमान – वर्षा गायकवाड मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय जनता पक्ष व आरएसएस यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वात पवित्र ग्रंथ संविधान दिले त्या संविधानाला भाजपा व आरएसएस मानत नाहीत. मनुवादी प्रवृत्तींनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान रामलीला मैदानावर जाळून संविधान व संविधाननिर्माते बाबासाहेब यांचा अपमान केला आहे, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षला खोटे बोलण्याचे प्रशिक्षण दिलेले असते त्यामुळे ते सातत्याने खोटे व अपप्रचार करणारी माहिती पसरवत असतात. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही तेच केले असून काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केल्याचे सांगत आहेत. राजनाथसिंह यांना माहित असायसा हवे की संविधानाला विरोध त्यांच्या मातृसंस्थेनेच केलेला आहे. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा भाजपा व आरएसएस खुलेआम करत आहे. ४०० पार चा नारा कशासाठी दिला होता, हे देशाची जनता विसरलेली नाही. भाजपाच्या राज्यात आजही दलित व मागासवर्गीय समाजावर सर्वात जास्त अत्याचार होत आहेत. काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच आदर व सन्मान केला आहे. तत्कालीन मुंबई प्रांतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले व संविधानाची जबाबदारी दिली. पंडित नेहरु यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. राजनाथसिंह सवयीप्रमाणे खोटे बोलले असून काँग्रेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटी व माहिती पसरवल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

जागर निष्ठेचा

कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे यांनी वाहिली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांना आदरांजली कल्याण : शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, कल्याण पश्चिमचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे यांनी आज सकाळी काळा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले. बासरे यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. हे स्मारक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रतीक म्हणून उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, भारतातील बाळासाहेबांचे पहिले स्मारक म्हणून याचे महत्त्व अधिक आहे. बासरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्मारक उभारले गेले…

AB फॉर्मसाठी शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवलं;

आता पक्षानं वाऱ्यावर सोडलं; उमेदवाराला जबर धक्का हरिभाऊ लाखे नाशिक: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघ्या काही तासांचा कालावधी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईहून दोन एबी फॉर्म पाठवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांविरोधात शिंदेंनी दोघांना तिकीट देत बंडखोरीला हवा दिली. देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे रिंगणात असताना शिंदेंनी राजश्री अहिरराव यांना तिकीट दिलं. त्यांची उमेदवारी कायम असताना आता शिंदेंनी सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राजश्री अहिरराव यांना शिंदेसेनेनं वाऱ्यावर सोडल्याची चर्चा आहे. महायुतीत सीटिंग गेटिंगचा फॉर्म्युला ठरलेला असल्यानं देवळालीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पक्षानं विद्यमान खासदार सरोज अहिरे यांना तिकीट दिलं. पण या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून राजश्री अहिररावदेखील…

हर्षित बोबडेची शतकी खेळी व्यर्थ

ठाणे : हर्षित बोबडेच्या दमदार शतकी खेळीनंतरही पहिल्या डावात अवघ्या एका धावेने पिछाडीवर पडल्यामुळे यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीला १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या दुसऱ्या शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पर्धेतील प्रवास आटोपता घ्यावा लागला. सनराईझ क्रिकेट क्लबच्या पहिल्या डावातील २३५ धावांना उत्तर देताना स्पोर्टिंग क्लब कमिटीने २३४ धावापर्यत मजल मारली होती. प्रथम फलंदाजी करताना अर्णव मिरगेच्या ७६ धावांच्या अर्धशतकी खेळीने सनराईझ क्रिकेट क्लबने द्विशतकी धावसंख्या उभारली. तन्मय मालुसरेने चार आणि आर्यन राजने तीन बळी मिळवले. उत्तरादाखल हर्षितने १२३ आणि स्पर्धेत फलंदाजीत छाप पाडणाऱ्या विवान हजारेच्या ४६ धावांच्या खेळीनंतरही स्पोर्टिंग क्लब कमिटीला पहिल्या डावात आघाडी घेता आली नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या शौर्य नवलेने चार फलंदाज बाद केले. दुसऱ्या डावात सनराईझ क्रिकेट क्लबने २ बाद १०७ धावापर्यत मजल मारली होती. संक्षिप्त धावफलक : सनराईझ क्रिकेट क्लब : (पहिला डाव) : सर्वबाद २३५ ( अर्णव मिरगे ७६,तन्मय मालुसरे २०-६-६६-४,आर्यन राज १४-६-२२-३). दुसरा डाव : ३६ षटकात २ बाद १०७.…