Month: November 2024

संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन;

ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मागे घेतल्यानंतरही शिंदे सेनेचे संजय भोईर हे प्रचारापासून दूर असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. परंतू केळकर यांनी गुरुवारी सायंकाळी भोईर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असून या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीती बाबत चर्चा झाल्याने अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यासाठी शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे हे इच्छूक होते. परंतु हा मतदार संघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला गेला असून येथून भाजपने आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेले संजय भोईर आणि मिनाक्षी शिंदे यांनी अपक्ष निवडणुक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोघांनी अर्ज दाखल केले नव्हते. यामुळे या मतदार संघातील बंडखोरी टळली होती. असे असले तरी संजय भोईर, मिनाक्षी शिंदे हे दोघेही केळकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय केळकर यांच्या समक्ष मिनाक्षी शिंदे यांच्यासह स्वपक्षातील नाराजांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची नाराजी दूर केली होती. यानंतर मीनाक्षी या सुद्धा प्रचार सुरू केला होता. असे असले तरी संजय भोईर मात्र प्रचारापासून दूर होते. बाळकूम, माजीवडा, कोलशेत भागातुन भोईर यांचे सहा नगरसेवक निवडून येतात. या भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. ते प्रचारापासून दूर असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. भाजप उमेदवार संजय केळकर यांनी गुरुवारी सायंकाळी शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी केळकर यांनी भोईर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीती बाबत चर्चा झाल्याने अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. संजय केळकर आणि संजय भोईर यांनी विविध प्रश्नांबरोबरच प्रचाराच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली. भविष्यात बाळकूम-ढोकाळीतील नागरिकांना परिपूर्ण सुविधा मिळतील, यासाठी कटीबद्ध असल्याचे केळकर यांनी सांगितले. तसेच या भेटीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विक्रमी मताधिक्याने विजय साकारण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख सुभाष काळे, शिंदेच्या शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार, विद्याधर वैशंपायन, माजी नगरसेवक भुषण भोईर हे उपस्थित होते, अशी पोस्ट संजय भोईर यांनी समाजमाध्यमांवर करत भेटीचा फोटो शेअर केला आहे.

 बिग फाइट, तिथेच वातावरण टाइट!

मंत्री महाजन, भुसे, भुजबळ, पाटील अडकले मतदारसंघात हरिभाऊ लाखे नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीच्या लढती रंगत असून, महायुती सरकारमधील सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. या मंत्र्यांवर ३५ जागांची जबाबदारी असतानाच यंदाच्या निवडणुकीत बदलत्या राजकीय वातावरणामुळे बड्या नेत्यांच्या मतदारसंघांत महाविकास आघाडीकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे ‘बिग फाइट’ रंगणाऱ्या या नेत्यांच्या मतदारसंघांतील वातावरण ‘टाइट’ झाले आहे. लोकसभेला उत्तर महाराष्ट्रातील वातावरण ‘मविआ’च्या बाजूने फिरल्याने हे नेते स्वतःच्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांना स्वतःच्या जागा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्तर महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचा गड राहिला आहे. गेल्या वेळेस विधानसभेतील ३५ पैकी २८ जागा महायुतीकडे होत्या. परंतु, लोकसभा निवडणुकीत येथील सहापैकी चार जागांवर महायुतीचा पराभव झाला. राज्यातील बदललेल्या राजकारणाचा, तसेच घटनाबदलाच्या मुद्याने महायुतीची दाणादाण झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुती सरकारमधील सहा मंत्री असून, त्यात नाशिकमधून छगन भुजबळ, दादा भुसे, नंदुरबारमधून डॉ. विजयकुमार गावित, तर जळगावमधून गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली आहे. परंतु, हे सर्व मंत्री सध्या आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार, तसेच बंडखोर रिंगणात आल्याने सत्ताधारीविरोधात नकारात्मक वातावरण तयार होण्याची भीती लक्षात घेऊन सर्वजण कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीचे मातब्बर नेते असलेले अक्राणीचे माजी मंत्री के. सी. पाडवी, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासमोरही यंदा मतदारसंघात कडवे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे या आजी-माजी मंत्र्यांना आपल्या जागा टिकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. नंदुरबारमध्ये अटीतटी भाजपचे नेते तथा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित १९९४ पासून सलग सहा वेळा नंदुरबार मतदारसंघातून निवडून येत आहेत. आता सातव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांना यंदा प्रथमच काँग्रेसच्या किरण तडवींकडून कडवे आव्हान मिळाले आहे. लोकसभेत कन्येचा पराभव झाल्यानंतर, तसेच चारही मतदारसंघांत गावित कुटुंबातील व्यक्ती उभ्या असल्यामुळे त्यांच् विरोधात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. काँग्रेसला शिवसेना शिंदे गटानेही बळ पुरविल्याने नंदुरबारची लढाई आता अटीतटीची बनली आहे. ०००००

कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची नियुक्ती

कल्याण : कल्याण पूर्व शिंदे शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची तर, विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. कल्याण पूर्व शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करून महायुतीच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरुध्द उमेदवारी दाखल केला. त्यांना समज देऊनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नुकतीच शिंदे शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावरून महेश गायकवाड यांची हकालपट्टी केली होती. विधानसभा निवडणूक सुरू असल्याने स्थानिक पातळीवर पक्ष नेतृत्व करण्यासाठी शहरप्रमुखाची गरज असल्याने जिल्हाप्रमुख लांडगे यांनी नीलेश शिंदे यांना शहरप्रमुख पदी, प्रशांत काळे यांना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीची पत्रे दिली. शहरप्रमुख नीलेश शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशांत काळे राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाटयाला गेल्याने त्यांनी शांत राहणे पसंत केले. ‘माजी नगरसेवक असताना शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागात आपण अनेक विकास कामे केली. या माध्यमातून आपला लोकांशी थेट संपर्क आहे. नवीन जबाबदारी आपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याने पक्ष संघटना वाढविणे आणि ती अधिक मजूबत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत,’ असे शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी सांगितले.

कांद्याच्या वाढत्या दराची मुख्यमंत्र्यांकडून दखल, साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश

कांद्यासाठी राज्य सरकारने ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय ठाणे : सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच पणन विभागाला दिले आहेत.कांद्यासाठी राज्य सरकारने ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून अनुदानाचे वाटप सुरू आहे. त्यासाठी या वर्षात ८५१ कोटी ६७ लाख रुपये तरतूद देखील करण्यात आली आहे मोठ्या आणि लहान व्यापाऱ्यांना त्यांनी किती कांदा साठवणूक करावी ती मर्यादा दिली निश्चित केली आहे.  मात्र सध्या काही व्यापारी बेकायदेशीरपणे कांद्याची साठवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले असून पर्यायाने कांद्याचे दर वाढत आहेत. अशा कांदा व्यापाऱ्यांवर ‘जीवनावश्‍यक वस्‍तू अधिनियम १९५५’ व ‘काळा बाजार प्रतिबंध आणि जीवनावश्‍यक वस्‍तूंचा सुरळीत पुरवठा अधिनियम १९८०’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पुरवठा विभागाला दिले आहेत. राज्यात नागरिकांना कोठेही बेकायदेशीर कांद्याची साठेबाजी निदर्शनास आल्‍यास त्यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात माहिती द्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

जननायक बिरसा मुंडा जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

महान क्रांतीकारक, आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांच्या शुभहस्ते, महापालिका अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

वृत्तपत्र जिल्हा विक्रेता सेनेचा महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांना पाठींबा

अनिल ठाणेकर ठाणे : आमदार संजय केळकर हे ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून युतीचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.  ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेने संजय केळकर यांना जाहीर पाठींबा दिला आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत केळकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार करुन भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मदत करणार आहोत. असेही वृत्तपत्र विक्रेता सेनेने जाहीर केले आहे. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना अध्यक्ष विष्णू सावंत, सरचिटणीस संतोष विचारे, दीपक सोंडकर, चेतन चाळके, सचिन सावंत, दिनेश रौनक यांच्यसोबत ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. केळकरांचा प्रत्येक ठाणेकराला अभिमान आणि आत्मीयता आहे, ते आमदार असुन सुद्धा सर्वसामान्य माणसाला वेळ देणारे कुठलीही अडवणुक न करता त्याची समस्या मार्गी लावणारे आणि कुठलाही बडेजाव नसणारे असे आपले व्यक्तिमत्व आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही केळकरांनी अनेक वेळा सहकार्य केले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ व्हावे, याबबत केळकरांनी अनेकवेळा विधानसभेत आवाज उठवत ती मागणी महायुती सरकारने मान्य करुन घेतली, असे मत ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना अध्यक्ष विष्णू सावंत यांनी व्यक्त केले.

 शमीम खान यांच्या बदनामीकारक, खोट्या आणि तथ्यहीन आरोपांची चौकशी करा !

मुंब्रा कळवा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांची पोलीस उपायुक्तांकडे मागणी अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुंब्रा कळवा परिसरातील पदाधिकारी शमीम खान यांनी केलेल्या बदनामीकारक, खोट्या आणि तथ्यहीन आरोपाची चौकशी करण्याची मागणी १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी परिमंडळ १ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे एक निवेदन देऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुंब्रा कळवा परिसरातील पदाधिकारी शमीम खान यांनी बुधवारी, १३ नोव्हेंबर २०२४ रोजी, १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत शमीम खान यांनी माझ्यावर अनेक बदनामीकारक, खोटे व तथ्यहीन आरोप केले. यात, ‘नजीब मुल्ला मुझे दुबईसे फोन करवाता है, मुझे ईडी की धमकी देता है, तसेच मेरे साथ कोई हादसा होता है या मुझे मार दिया जाता है तो इसका जिम्मेदार नजीब मुल्ला होगा’ अशाप्रकारचे जाहीर वक्तव्य शमीम खान यांनी माध्यमांसमोर बोलताना केले. शमीम खान यांनी मुंब्रा कळवा परिसरातील मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने माझ्यावर बदनामीकारक, खोटे व तथ्यहीन आरोप केले असल्याची माझी तक्रार आहे.सदरचे प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असून संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करावी आणि शमीम खान यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने शमीम खान यांना आलेले फोन काॅल्स तसेच त्यांचे सर्व काॅल डिटेल्स तपासून याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नजीब मुल्ला यांनी परिमंडळ १ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे. महत्वाचे म्हणजे पुरावा म्हणून नजीब मुल्ला यांनी निवेदनासोबत शमीम खान यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ रेकॉर्डींग असलेला पेन ड्राईव्ह पोलीस उपायुक्त यांना सादर केला आहे.

नितीन गडकरी यांची ठाण्यात रविवारी सभा

ठाणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ठाण्यातील गावदेवी मैदानावर रविवारी (ता. १७) सायंकाळी ६ वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेनिमित्ताने ठाणेकरांना…

राहुल सचदेवचा अनंत मेहताविरुद्ध 3-1 असा विजय

 मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा   मुंबई, 15 नोव्हेंबर: राहुल सचदेवने सर्वोत्तम खेळ करताना मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेतील बेस्ट ऑफ फाईव्ह फ्रेम ’15-रेड’ स्नूकर राऊंड-रॉबिन…

हर्षित माहीमकरची वीर भदाणेवर सहज मात

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा २०२४   मुंबई, 15 नोव्हेंबर: दुसऱ्या मानांकित हर्षित माहीमकरने एनएससीआय आयोजित योनेक्स सनराइज-महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धेत 17 वर्षांखालील मुले एकेरीच्या राऊंड ऑफ 32 फेरीच्या…