Month: November 2024

 बदलापूरची बदनामी केल्यानंतर फडणवीसांकडून बंदूक घेऊन फोटो

सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांवर टीकास्त्र, सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी बदलापूरात सभा   बदलापूर : राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात बदलापूर शहराची बदनामी झाली. मात्र, एवढी गलिच्छ घटना घडल्यानंतरही फडणवीस बदलापूरकडे फिरकले नाहीत. उलट बंदूक घेऊन बदलापूर असे बोर्ड लावले गेले, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. बदनामी झालेल्या बदलापूर शहराला आगामी सहा महिन्यांत पुन्हा नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहनही खासदार सुळे यांनी केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांची बदलापूरमधील कात्रप येथे भव्य जाहीर सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार निलेश लंके, लोकनेते गोटीरामभाऊ पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या ज्योती ठाकरे, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड,  महेश तपासे, विद्या वेखंडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आप, आरपीआय सेक्युलर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच बदलापूर येथील महिला व नागरिकांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. बदलापूरच्या लेकीबाबत झालेले चुकीचे वर्तन हे बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन केल्यामुळेच जगाला समजले. या आंदोलनामुळे ही घटना समजली. अन्यथा या भयंकर प्रकाराची जगाला माहिती मिळाली नसती, असे नमूद करीत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. बदलापूर शहरात पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, अपुरी लोकल सेवा आदी अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, बदलापूरकर गर्दीत प्रवास करीत आहेत. बुलेट ट्रेनऐवजी बदलापूर ते चर्चगेटपर्यत ट्रेन लिंक करायला हवी. स्वच्छ स्वच्छतागृहे उभारायला हवीत, असे भाषणात म्हटल्यावर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला पसंती दिली. नगरहून मुंबईला येताना माळशेज घाटात खड्डे लागल्यानंतर आम्हाला मुरबाड मतदारसंघ सुरू झाल्याचे समजते. गेल्या २० वर्षांत या भागाचा विकास झाला नाही. काचेच्या पुलाची १० वर्षांपासून घोषणा केली जात आहे, ही काय भानगड आहे. केवळ निवडणूक आली की दिशाभूल करण्याचा उद्योग केला जात आहे, अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली. बदलापूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी सांगितले. महिला लोकलसह  रेल्वे प्रश्नांसाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, असे आश्वासन म्हात्रे यांनी दिले. बदलापूर शहरात २० वर्षांत महाविकास आघाडीची प्रथमच भव्य सभा झाली. आतापर्यंत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, मुरबाड मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. मुरबाडला गेल्यानंतर बदलापूरमध्ये विकास केला, तर बदलापूरला आल्यावर मुरबाडमध्ये विकास केल्याचे सांगितले जाते. लोकल प्रवाशांचे हाल सुरु असून, महिला लोकलची आवश्यकता आहे. पाणीपुरवठ्याचे हेतूपुरस्सर नियोजन झाले नसून, बगलबच्च्यांचे टँकर सुरू झाले आहेत. २० वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत बदलापूरच्या सुसज्ज हॉस्पिटलचे आश्वासन दिले जाते, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले. चौकट टोपी घालून श्रेयासाठी धाव वडोदरा एक्सप्रेस हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून, या महामार्गाचे श्रेय घेण्यासाठी ते टोपी घालून धावले.पण रेल्वे हा विषय माझा नाही, असे म्हणतात. एखादे काम झाले की ते मी केले, तर रखडलेली कामे दाखविली की ते माझे काम नाही, अशी त्यांच्या कामाची स्टाईल आहे, असा टोला सुभाष पवार यांनी कोणाचेही नाव न घेता मारला. 00000

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणेकरांनी घेतली मतदान करण्याची सामूहिक शपथ

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी निवडणूकीत मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी तथा…

शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या १५ वर्षातील विकासकामांच्या वचननाम्याचे प्रकाशन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने विकासाकामांना गती – प्रताप सरनाईक   अनिल ठाणेकर ठाणे : शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी १५ वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला. यावेळी १५ वर्षात केलेल्या विविध विकासकामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हॉगकाँग, मलेशिया व सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ १२० एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. पाळीव प्राण्यांसाठी अद्यावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले आहे. विहिरींचे संवर्धन, म्युझिकल फाऊंटन, उपवन तलावाचे सुशोभिकरण, कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकामकामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली. याबद्दल मुख्यमंत्र्याचे  प्रताप सरनाईक यांनी आभार मानले. भविष्यात रोप वे, जलवाहतूक, आणखी कॅशलेस रुग्णालय आदी विविध प्रकल्प साकारण्यात येणार आहेत असे प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली. घोडबंदर व लोकमान्य नगरमधील पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी  मुंबई महानगरपालिकेकडे ५० एमएलडी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती. ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली. मुंबई महानगरपालिकेकडून ५० एमएलडी पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी २५ एमएलडी पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे. मिरा – भाईंदर शहारला सूर्या प्रकल्पातून २१८ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मी दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचे मला अत्यंत समाधान आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले. कापूरबावडी ते गायमुख ६० मीटर आणि गायमुख ते फाऊंटन ३० मीटर रस्त्याचे ६० मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून त्या कामास सुरुवात झाली आहे. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ०००

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 47 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर

मुंबई : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती जपणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली…

फोटो सर्कल सोसायटीच्या छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : फोटो सर्कल सोसायटीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त 10 ते  17 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन – `आविष्कार – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन आणि या निमित्त…

महाराष्ट्राचे लाडके भावेजी बांदेकरांची बासरेंच्या विजयासाठी वहीनींना साद

कल्याण : होम मिनिस्टर या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले आदेश बांदेकर आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन बासरेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. सचिन बासरे हे कल्याण पश्चिमधून महाविकास आघाडी आणि शिवसेना…

देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा डाव होता

 न्या. चांदीवाल यांचा गौप्यस्फोट मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही…

घड्याळ चिन्ह गोठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली: शरद पवार गटाने अजितदादा गटाचे घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. या परिपत्रकात तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना…

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार- अमित शाहा

जिंतूर : महाराष्ट्रातील सर्व विभागात जाऊन आलो.  येत्या २३ तारखेला महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीचे सरकार बनणार आहे”, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते परभणीत भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. अमित…