Month: November 2024

वेतन न मिळाल्याने शासकीय सेवेतील कंत्राटी कामगारांची उपासमार – जगदीश खैरालिया

अनिल ठाणेकर ठाणे : प्रादेशिक मनोरूग्णालय, ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्यापही न मिळाल्याने कामगारांची आर्थिक कोंडी होऊन कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना दरमहा सात तारखेच्या आत किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेले असतांनाही रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार मे. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि, पुणे कामगारांची पिळवणूक करीत आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे  सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जेटिंग गाड्यांवरील सफाई कामगारांना मे. एक.एम रामचंदानी, उल्हासनगर यांनी ही अद्यापही वेतन अदा केले नाही. इतकेच नव्हे तर या ठेकेदाराने कामगारांच्या वेतनातून दरमहा बेकायदेशीर कपात करून कामगारांची फसवणूक केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घंटागाडी प्रकल्पातील ठेकेदार मे. सेक्यूर वन सेक्युरिटी सर्व्हिसेस यांनी देखील सफाई कामगार आणि वाहनचालक यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा केले नाही. हे सर्व ठेकेदार बिलाची रक्कम मिळाली नसल्याचे कारण पुढे करून कामगारांना दरमहा वेळेवर वेतन अदा करत नाही. खरं तर वेतन प्रदान अधिनियम नुसार ठेकेदाराने कामगारांना सात तारखेच्या आत वेतन अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे. करारनामा करतांना किमान दोन तीन महिने वेतन अदा करण्याची ठेकेदाराची क्षमता असल्याची अट असतांनाही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने सर्व कायदे गुंडाळून कंत्राटी कामगारांची पिळवणूक सर्रासपणे सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर देखील ठाणे मनोरूग्णालय प्रशासन यांनी कामगारांना वेतन अदा केले नाही. कंत्राटी कामगार कायद्याच्या कलम २१ (४) नुसार ठेकेदार यांनी कामगारांना वेळेत वेतन अदा केले नाही तर मूळ मालकाने कामगारांना वेळेत वेतन अदा करण्याची जबाबदारी बंधनकारक करण्यात आली आहे. कामगार उप आयुक्त ठाणे यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवली जात आहे. ठेकेदारांना राजाश्रय असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदार जुमानत नसल्याचा आरोप श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केला आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत भारतीय संविधानाचा मसुदा सादर करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषणात सांगितले होते की, आज समाजात सामाजिक, आर्थिक विषमतेची दरी प्रचंड असल्याने शोषण ही प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे भविष्यात या संविधानातील मुल्यांची विधायिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका कशी अंमलबजावणी करणार यावर संविधानाचे महत्व ठरेल. या संवैधानिक मुल्यांचे स्मरण राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा करेल का असा सवालही श्रमिक जनता संघाचे  सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी उपस्थित केला आहे.

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हाच आदर्श  – उमेश पाटील

अनिल ठाणेकर ठाणे : समाजवादी नेते दशरथ पाटील यांच्या वक्तव्यानुसार, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हाच आदर्श मी राजकारणात वावरताना ठेवला आहे, असे मत माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी आपल्या वाढदिवशी बोलताना व्यक्त केले. उमेश पाटील यांचा वाढदिवस, फटाक्यांच्या आतिषबाजीत  ढोलताशांच्या गजरात, भावभक्तिगीतांच्या वातावरणात आणि परिसरातील रहिवाशांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या माताभगिनिंनी व लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीत, केक कापून, अपूर्व उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवसेना उपनेते दशरथ पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, विभागप्रमुख शाम पाटील, विजय शिंदे, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक मनोहर साळवी, मनोहर डुंबरे, प्रकाश बर्डे, पवन कदम, रविंद्र पाटील, दिनेश कांबळे, मालती पाटील  प्रमिला केणी, मिनल संख्ये, राधिका फाटक, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार, अपोलो जिमचे कमलाकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, काॅग्रेसचे राजू शेट्टी, सम्राजसेवक राकेश पाटील, रचना पाटील, जयदिप पाटील, सुनील गौरी तसेच पारसिक नगर, सह्याद्री सोसायटी व खारेगाव परिसरातील सोसायटीतील अध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी व सभासद तसेच रहिवाशी  ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी व लाडक्या बहिणींनी उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशिर्वाद देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांचे  प्रशिक्षण

ठाणे : जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने काल जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. NSDL (Protean) कार्यालयात सहाय्यक प्रबंधक या पदावर कार्यरत असणारे सुर्यकांत तरे यांनी उपस्थित सर्वांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्यालय, ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील निवृत्तीवेतन योजना संदर्भांतील  कामकाज हाताळणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यावरील जमा रक्कमेतून गुंतवणूक करण्याबाबत विविध पर्यांय, अंशतः रक्कम आहारीत करणे, सेवा निवृत्ती वेतन योजनेचे विविध पर्याय, कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याचे कुटुंब निवृत्ती वेतन, राजीनामा, रुग्णतः निवृत्ती वेतन या सर्व योजनेबाबत सखोल मार्गदर्शन सुर्यकांत तरे यांनी केले.परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) ची योग्य पद्ध तीने अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी तसेच अनेक शंकाबाबत अधिकारी-कर्मचारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

शहापूर विधानसभा राष्ट्रवादी उमेदवार दौलत दरोडा यांच्यासाठी वाडा तालुक्यातील 3 हजार 946 मतांची आघाडी ठरली निर्णायक

जयेश पाटील, पालघर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दौलत दरोडा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून यांच्यात चुरशीचीची लढत पाहायला मिळाली. यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दौलत दरोडा हे 1671 मतांनी निवडून आले आहेत. दौलत दरोडा यांच्या विजयात वाडा तालुक्यात येणाऱ्या 49 बुथवर मिळालेल्या 3 हजार 946 मतांची आघाडी निर्णायक ठरली असून या मतांच्या निर्णायक आघाडीने दौलत दरोडा यांना तारले आहे. लोकसभेतील आघाडी टिकवण्यात निलेश सांबरेना अपयश तर लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेतलेल्या निलेश सांबरे यांच्या रंजना उघडा या उमेदवार तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या असून त्यांना वाडा तालुक्यातील एकाही बुथवर मतांची आघाडी घेता आली नाही तर पांडुरंग बरोबर यांना फक्त 9 बुथवर किरकोळ आघाडी घेता आली आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 329 बूथ असून यात वाडा तालुक्यातील 49 बुथचाही समावेश आहे. शहापूर विधानसभेत येणाऱ्या वाडा तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटात अजित दादांचे राष्ट्रवादीच्या या विद्यमान सदस्य आहेत तर याच गटातील गारगाव गणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पूनम पथवा या पंचायत समिती सदस्य तर दुसऱ्या डाहे गणात रघुनाथ माळी हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य आहेत. मोज गटात शिवसेना (उबाठा)चे अरुण ठाकरे तर मोज पंचायत समिती गणात शिवसेना (शिंदे) चे सागर ठाकरे हे पंचायत समिती सदस्य आहेत. अबिटघर जिल्हा परिषद गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भक्ती वलटे या जिल्हा परिषद सदस्य असून अभिर गणात अजित दादांच्या राष्ट्रवादीचे जगदीश पाटील हे विद्यमान सभापती व पंचायत समिती सदस्य आहेत. तर कुडुस पंचायत समिती गणातील कोंढले ग्रामपंचायतमधील म्हसवल गाव व पाडे शहापूर विधानसभेत जोडलेले आहेत. वाडा तालुक्यातील 49 बूथमधील राजकीय परिस्थिती अशा प्रकारे असताना वाडा तालुक्यातील 49 बुध मध्ये 3 हजार 946 एवढी निर्णायक आघाडी देऊन आमदार दरोडा यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये राष्ट्रवादी (अप) चे उमेदवार दौलत दरोडा यांना 14069 राष्ट्रवादी (शप) चे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना 10153 तर निलेश सांबरे यांच्या उमेदवार रंजना उघडा यांना 4705 एवढी मते मिळाली असून त्या तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या आहेत.   कोट वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये येणाऱ्या गाव – पाड्यात आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असून मी स्वतः जिल्हा परिषद सभापती म्हणून केलेल्या कामांचाही आम्हाला फायदा झाला आहे. रोहिणी शेलार सभापती : महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पालघर कोट वाडा तालुक्यातील मताधिक्य मिळविण्यासाठी विरोधकांनी आमच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र वाडा तालुक्यातील 49 बूथ मधील सुज्ञ मतदार राजाने आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांची पोच पावती आमदार दौलत दरोडा यांना दिली आहे. जयेश शेलार अध्यक्ष : राष्ट्रवादी (अजितदादा) वाडा तालुका ००००

राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पुणे सर्वसाधरण विजेता;

पुणे क्रीडा प्रबोधिन उपविजेते अहिल्यानगर २७ नोव्हेंबर – सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनर डिस्ट्रीक्ट आयोजित ५व्या महाराष्ट्र राज्य रोड…

येत्या रविवारी 6 वी साकीब रिजवी मेमोरियल कॅन्सर जनजागृती मॅरेथॉन  

मुंबई : येत्या रविवारी 1 डिसेंबर 2024 रोजी रिजवी ग्रुपच्या हेल्प युवरसेल्फ फाऊंडेशन द्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्य (एम एम आर डी ए) ग्राउंड, बीकेसी येथे 6 वी साकीब…

मुरबाडचा ऐतिहासिक भाऊ गणपत वाचनालय मृत्यू शय्येवर

जीव चंदने मुरबाड :  शहरातील ब्रिटिश कालीन भाऊ गणपत वाचनालय गेली अनेक वर्षे नव्याने उभारणीच्या प्रतीक्षेत असून मुरबाड नगरपंचायत प्रशासनाचे स्थापने पासूनच याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. भारतीय स्वातंत्र्य…

साकिब रिझवीतर्फे रविवारी मॅरेथॉन

  मालाड : वांद्रे पूर्व बीकेसी येथे सहावी साकिब रिझवी मेमोरियल कॅन्सर अवेअरनेस मॅरेथॉन १ डिसेंबर रोजी जी-८ ग्राउंड येथे सकाळी साडेपाच वाजता आयोजन केले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर प्रसिद्ध ऑलिंपिक ॲथलीट अक्षय खोत यांच्यासह अनेक देशांचे राजकीय मान्यवर व अभिनेता अरबाज खानही उपस्थित राहणार आहेत. आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता आणि महिला सुरक्षितता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी व सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित केल्याचे रुबिना अख्तर हसन रिझवी यांनी पत्रकारांना सांगितले. 000

बदलापुरात गरजूंना मदतीचा हात

00000   बदलापूर : गरजू आणि दिव्यांगबांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट मागील अनेक महिन्यांपासून सेवा बजावत आहे. पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांच्या माध्यमातून मागील अनेक महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशीष दामले यांच्या हस्ते या नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांच्या माध्यमातून वर्षभर चालणाऱ्या सामाजिक उपक्रमातून प्रेरणा घेत राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांनी बदलापूर पूर्व शिरगाव आपटेवाडी परिसरातील गरजू आणि दिव्यांग नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य वाटपाचे काम त्यांनी हाती घेतले. या उपक्रमाला आशीष दामले यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते या नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले. या मदतीचा लाभ घेणाऱ्या या नागरिकांनी अनिल मराडे व दामले यांचे यावेळी विशेष आभार मानले.