Month: November 2024

शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक;

५० लाखांची मागितली होती खंडणी मुंबई : गेल्या महिन्यात माजी मंत्री बाब सिद्दिकी यांची हत्या झाल्यापासून अभिनेता सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशात काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खानलादेखील जीवे मारण्याची धमकी आली होती. आता या प्रकरणात कारवाई करत मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. गेल्या आठवड्यात वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करत शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी आरोपीने ५० लाखांची खंडणीही मागितली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुंबई पोलीसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रायपूरला रवाना झाले होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीबाबतीची अधिकची कोणतीही माहिती उघड केलेली नाही. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी येण्यापूर्वी अभिनेता सलमान खानलदेखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशात २४ ऑक्टोबर रोजी बिश्नोई टोळीच्या नावाखाली सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी जमशेदपूरमधून अटक केली होती. या आरोपीने सलमानकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सलमान-शाहरुखची सुरुक्षा वाढवली या सर्व घडामोडींनंतर मुंबई पोलिसांनी दोन्ही अभिनेत्यांची सुरक्षा वाढवली आहे. एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमानच्या गॅलेक्सी या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले होते की, “ही सर्व योजना लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने आखली होती. १५ मार्च २०२४ रोजी पनवेलयेथे हत्यारं आल्यानंतर अनमोलने हल्लेखोरांना सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यास सांगितले होते. त्यानंतर अनमोलच्या सांगितल्याप्रमाणे सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या घटनेच्या कालावधीत हल्लेखोरांना तीन लाख रुपये देण्यात आले होते.”

ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात हजारो कोट्यवधी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सार्वजनिक वाहतुकीचे राष्ट्रीय प्रकल्प उभारले जात असले तरी जिल्ह्यातील प्रामुख्याने कल्याण ग्रामीण आणि पश्चिम, डोंबिवली, ठाणे शहर, भिवंडी ग्रामीण आणि पश्चिम याचबरोबर शहापूर या विधानसभा मतदारसंघांमधील अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या जटील आहे. परंतु विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेले आणि स्वतःला भावी आमदार म्हणून भूषण मिरवणाऱ्या सर्व उमेदवारांनी वाहतूक कोंडीच्या मुद्द्याला प्रचारात पूर्णपणे बगल दिली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांकडून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. यंदा जवळपास सर्वच पक्षातील उमेदवारांकडून मोठी विकासकामे, आर्थिक मदतीची घोषणा, महापुरुषांची स्मारके तर विविध समाजासाठी भव्य वास्तू यांसारख्या अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रश्न असलेल्या आणि दिवसेंदिवस अधिक त्रासदायक होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या विषयाला सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचार मुद्द्यातून बगल दिली असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जिल्ह्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई – बडोदा राष्ट्रीय महामार्ग, मालवाहतुक विशेष रेल्वे मार्ग, ऐरोली – काटई उन्नत मार्ग, कल्याण रिंग रोड यांसारखे काही हजार कोटी…

शंभराव्या आयडियल बुध्दिबळ स्पर्धेचे सर्वत्र कौतुक

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ग्रुपतर्फे बालदिनाचे औचित्य साधून परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात झालेल्या शंभराव्या यशस्वी बुध्दिबळ स्पर्धेचे महाराष्ट्रातून सर्वत्र कौतुक होत आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत…

नवी मुंबईत घरोघरी मतदान जागृतीची माहितीपत्रके वितरीत करून मतदान करण्याचे आवाहन

नवी मुंबई : मतदानाविषयी आवश्यक माहिती उपलब्ध होऊन एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजन केले असून मतदानाविषयी आवश्यक माहिती देणारे माहितीपत्रक घरोघरी वाटप करण्यात येत आहे. या माहिती पत्रकाचे अनावरण नुकतेच महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, 150 ऐरोली विधानसभा स्वीप नोडल अधिकारी उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे पाटील, 151 बेलापूर विधानसभा स्वीप नोडल अधिकारी सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या माहितीपत्रकावर तरुणाईला तसेच सर्वच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून मतदान करण्याचे महत्वही सांगण्यात आले आहे. तसेच या पत्रकावर वोटर हेल्पलाईन ॲपचे क्यूआर कोड प्रसिध्द करण्यात आले असून ॲन्ड्रॉइड व ॲपल अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल फोनसाठी स्वतंत्र क्यूआर कोड प्रसिध्द करण्यात आले आहेत. हा क्यूआर कोड स्कॅन करुन कोणताही मतदार आपले मतदार यादीतील नाव, आपला भाग क्रमांक, मतदार क्रमांक तसेच मतदार केंद्राचे ठिकाण ही माहिती अगदी सहजगत्या उपलब्ध करुन घेऊ शकतो. सदरची माहितीपत्रके आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी वितरीत केली जात असून प्रत्येकाने 20 नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले जात आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत प्रत्येक मतदारापर्यंत त्याचा भाग क्रमांक, मतदार क्रमांक आणि त्याचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे अशी संपूर्ण माहिती असलेली मतदार चिठ्ठी पोहचविली जात आहे. या माध्यमातून विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही मतदारांपर्यंत थेट पोहचून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या जमिनी वाचवायच्या असतील तर नरेश मणेरा यांनाच विजयी करा- सुरेश म्हात्रे

ठाणे : स्थानिक आगरी, कोळी, मुस्लिम समाजाला आपल्या जमिनी वाचवायच्या असतील तर नरेश मणेरा यांनाच मते देऊन विजयी करा, असे आवासन  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केले. यावेळी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा हे ही उपस्थित होते. महाआघाडीच्या वचननाम्यात घरातील सर्व मताभगिनी असलेल्या भाग्यलक्ष्मींना तीन हजार रुपये दर महिन्याला मानधन दिले जाणार आहे, २५ लाखाचा विमा देण्याचे आमचे वचन आहे.,  तीन लाखांपर्यंतचे शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले जाणार आह,जातीय निहाय जनगणना केली जाणार आहे. कंपन्या बंद पडल्याने स्थानिकांच रोजगार बुडाला, स्थानिकांचे रेतीचे व्यवसाय बंद पाडून आमच्या रेतीच्या प्लाॅटवर चौपाटी करुन आमच्या पोटावर बुलडोझर चालवले जात आहेत. क्लस्टरचे डेव्हलपमेंट करताना हजार दोन हजार फुटाच्या घराला साडेतीनशे फूटाचे घर देणार असाल तर हा कुठला न्याय ? अश्या डेव्हलपमेंटला आमचा विरोध आहे. शहराचा विकास होताना विकास कामात स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. ज्याच्यामुळे स्थानिक तरुण तरुणींच्या हाताला काम मिळेल असा १५ वर्षात असा एकही प्रकल्प या मतदारसंघात आला नाही. ४० वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्या पस्तीस वर्ष नगरसेवक राहिलेल्या नरेश मणेरा या स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिल्याबद्दल मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे. नरेश मणेरा यांच्याविषयी लोकांचा उत्सर्त प्रतिसाद पहावयास मिळाली.स्थानिक आगरी, कोळी, मुस्लिम समाजाला आवाहन करेन की आपल्या जमिनी वाचवायच्या असतील तर नरेश मणेरा यांनाच मते देऊन विजयी करा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त केले.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना  पाठींबा

अनिल ठाणेकर ठाणे : निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मात्र खुद्द शिंदे कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले…

उरण विधानसभेमध्ये १५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग,ज्येष्ठांचे गृहमतदान – जनार्दन कासार

अशोक गायकवाड रायगड :१९०-उरण विधानसभा मतदार संघामध्ये पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ६८ व दिव्यांग मतदार १६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार १९०-उरण विधानसभा मतदार…

दिल्लीची शर्मा आणि बत्रा जोडी अव्वल स्थानी

राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धा 2024 मुंबई : आशा शर्मा आणि पूजा बत्रा या दिल्लीच्या जोडीने ब्रिज फेडरेशन ऑफ इंडियाच्या (बीएफआय) संयुक्त विद्यमाने बॉम्बे जिमखाना आयोजित प्राइम सिक्युरिटीज – राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धेत (2024) महिला जोडी (पेअर) स्पर्धेत  पहिल्या दिवशी एलिमिनेशन राऊंडनंतर अव्वल स्थान पटकावले. अर्जेंटिनामधील ब्रिज ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिला संघाचा भाग असलेल्या शर्मा आणि बत्रा जोडीने एलिमिनेशनच्या तीन सत्रांच्या शेवटी प्रभावी 81 आयएमपी (IMP) मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. मुंबईची मारियान करमरकर आणि अदिती झवेरी जोडी ७६ आयएमपीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत गुजरातच्या विद्या पटेल आणि कल्पना गुर्जर या युवा जोडीने ७२ आयएमपीसह तिसरे स्थान मिळवले आहे. राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण 35 जोड्या एलिमिनेशन राऊंडमध्ये सहभागी झाल्या. त्यातील 18 जोड्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. या स्पर्धेमध्ये महिला दुहेरीसह मिश्र संघ (मिक्स्ड टीम) आणि मिश्र जोडी (मिक्स्ड पेअर) गटाच्या स्पर्धांचा समावेश असून या स्पर्धा आठवड्याच्या शेवटी (वीकेंड) सुरू होतील.

२०२८ पर्यंत पिकलबॉलचे एक दशलक्ष सक्रिय खेळाडू  होतील

रमेश औताडे मुंबई : ८४ देशांमधील ५ दशलक्षाहून अधिक खेळाडू आणि उल्लेखनीय ४० टक्के महिला सहभागासह  पिकलबॉलची लोकप्रियता वाढत आहे. भारतात गेल्या तीन वर्षांत या खेळात सक्रिय खेळाडूंमध्ये २७५ टक्के…