Month: November 2024

प्रितम म्हाञे यांचा जलवा, तरूणाई एकवटली

 राज भंडारी पनवेल :सिडकोच्या माध्यमातून उरण वेगाने विकसित होत असताना योग्य प्रशिक्षणाअभावी तरूणाच्या हाताला काम मिळत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या तरूणाचे भविष्य उद्थ्वस्त होवू नये यासाठी प्रितम म्हाञे यानी जे एम म्हाञे ट्रस्टच्या माध्यमातून युवकाना प्रशिक्षीत करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही महिन्याच्या परिश्रमानंतर येथून प्रशिक्षण घेतलेल्या 44 तरूण तरूणीना विमानतळात नोकऱ्या मिळाल्याने तरूणाईत आशादायी वातावरण निर्माण होवून सारी तरूणाई त्यांच्या मागे एकवटली असल्याचे चिञ पहायला मिळत आहे. उरण विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रितम म्हात्रे यांनी उरण तालुक्याचा दौरा केला. त्याप्रसंगी तरूणाईने एकच जल्तोष करून त्याच्या या अभूतपुर्व कार्याची पोच पावती दिली. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते जे एम म्हाञे, नारायणशेठ घरत, पांडूमामा घरत, अनिल ढवळे, रमाकांत घरत, जितेंद्र घरत, सचीन ताडफळे, माधव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तरूणाईला मार्गदर्शन करताना सचीन ताडफळे म्हणाले की आज युवकाना दिशा देण्यासाठी तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या युवा नेतृत्वाची गरज आहे. आपले दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार रिटायरमेटला आले असून त्याना मतदारानी पेन्शनवर पाठवून प्रितम म्हाञे याना आपले प्रतिनिधीत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवावे. अनिल ढवळे यानी निष्क्रीय विरोधकाचा समाचार घेताना स्थानिक आगरी, कोळी, कराडी याना अस्मिता दाखविण्याचे आवाहन केले. तसेच भुमी पुञाचा अवमान करण्याचे काम येथील आमदारानी केले असून त्याचा त्याना जबाब त्याना द्यावा लागेल.असे सागितले.

विकासासोबत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी संधी द्या-प्रितम म्हाञे

राज भंडारी पनवेल : पनवेल तालुक्यातील पोसरी, गिरवले, नारपोली सावळा या भागात आ. विवेक पाटील यानी भरीव विकासाची कामे केली असून त्यानंतर माञ आलेल्या लोकप्रतिनीधीचे या भागाकडे दुर्लक्ष झाले. हा विकासाचा गॅप आपल्याला भरून काढून तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी शिट्टीच्या चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला संधी द्यावी असे प्रतिपादन उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हाञे यानी केले. शेकाप उमेदवार प्रितम म्हात्रे यानी कष्टकरीनगर पोसरी, नारपोली, गिरवले, सावळा, देवळोली, कसळखंड, भाताण गावात निवडणूक दौरा केला. त्यावेळी गावागावातून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दौऱ्यात त्यांच्यासोबत नारायणशेठ घरत, मनोहर पाटील, जगदिश पवार, सचीन ताडफळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रितम म्हात्रे म्हणाले की युवकाच्या रोजगाराचा प्रश्न आज गंभीर आहे तो सोडविण्यासाठी आपण प्रशिक्षण सुरू केले असून विमानतळात 44 जणाना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. भविष्यात ही संख्या मोठी असेल हे काम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आपण मला संधी द्यावी. असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले. यावेळी आपच्या संघटन मंञी डा.शेख यानी प्रितम म्हाञे याना पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे पञ दिले.

कळवा मुंब्र्यात लोकच बदल घडविणार- आनंद परांजपे

पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणार- नजीब मुल्ला ठाणे : १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नजीब मुल्ला यांनी कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि अभिवादन करून कळवा…

रविवारच्या दिवशी रायगड गल्ली परिसरात केळकरांच्या झंझावाताला जोरदार प्रतिसाद

अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची रविवारी सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा श्रीगणेशा रायगड गल्ली परिसरातील गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला. रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. याचदरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. पाचपाखाडी, चंदनवाडी , नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या झंझावात रॅली रायगड गल्ली भागातुन सुरू झाली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक (भाऊ) राऊळ,…

ओवळा माजिवड्यात प्रताप सरनाईक यांचा झंझावात

अनिल ठाणेकर ठाणे : प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत आगरी कोळी बांधवांनी त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन प्रचाराचा उत्साह द्विगुणीत केला. त्यांनी प्रताप सरनाईक यांना देखील पारंपारिक वेशभूषा परिधान करण्याचा आग्रह…

गुजरात उच्च न्यायालयाचा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश देशभरात लागू करा !

अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : गुजरात उच्च न्यायालयाचा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना वर्ग ३ व ४ चे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश संपूर्ण देशात ताबडतोब लागू करा, अशी मागणी अखिल भारतीय…

उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे तपासणीकरिता सादर करावीत -मुकेश चव्हाण

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये १९२ अलिबाग विधानसभा मतदारसंघात एकूण १४ अधिकृत उमेदवार असून अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्च नोंदवही, निवडणूक खर्चासाठी उघडलेली स्वतंत्र बँक खाते पासबुक, निवडणूक…

अभिषेक बजाज, राहुल सचदेवची आगेकूच

मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धा मुंबई, 10 नोव्हेंबर: मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेत सिक्स रेड तिसर्‍या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत मुंबईच्या अभिषेक बजाज आणि राहुल सचदेवने आगेकूच कायम ठेवली. एमएचसी बिलियर्ड्स…

ई रिक्षा वाढत्या पर्यटनाचा केंद्रबिंदू

माथेरान : माथेरानच्या पर्यटन वाढी सोबतच राजकारणाचा एक अविभाज्य भाग बनलेल्या ई रिक्षामुळे इथल्या गल्लीबोळातले राजकारण सुध्दा रंगताना दिसत आहे.काही राजकीय पक्षांनी या ई रिक्षाचा मुद्दा घेऊन पतसंस्था निवडणुकीत विजय मिळवला होता तर काही गावाचे हित पाहणाऱ्या राजकीय लोकांनी राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक विचार करून गावात सुविधा उपलब्ध व्हायलाच हव्यात याकामी ई रिक्षा साठी आपली प्रतिष्ठा पणाला लावून परिणामाची चिंता न करता पतसंस्था निवडणुकीत पराभवाला सामोरे गेले आहेत.मुळात ज्यांनी ज्यांनी ई रिक्षाला प्रखर विरोध दर्शवून राजकारण करून सर्वसामान्य लोकांची मते घेऊन पतसंस्थेत सत्ता स्थापन केली तीच राजकीय पक्षांची मंडळी या ई रिक्षाचा आपल्या घरापर्यंत वापर करताना दिसत आहेत. ह्याच ई रिक्षा यापुढेही प्रत्येक राजकीय वातावरणात महत्वाचा विषय ठरणार आहेत. एकीकडे ई रिक्षाला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूने याचा वापर सुध्दा तितक्याच जोमाने करायचा अशी दुहेरी भूमिका विरोधक मंडळी बजावत आहेत. सध्या ह्या रिक्षांची संख्या वीस असून अद्यापही उर्वरित ७४ रिक्षा येणार आहेत. आणि याच येणाऱ्या रिक्षांची संख्या कमी व्हावी यासाठी राजकीय पक्षांना हाताशी धरून कुणी या पक्षातून दुसऱ्या पक्षात बेडूक उड्या मारत आहेत.आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकी मध्ये ई रिक्षा समर्थक आणि विरोधक असाच सामना पहावयास मिळणार आहे. ई रिक्षामुळे खऱ्या अर्थाने पर्यटन क्रांती घडत आहे हेही विरोधात असणाऱ्या लोकांना माहीत आहे परंतु केवळ राजकारण करून लोकांची दिशाभूल करून सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय मंडळी अग्रेसर दिसत आहेत. लवकरच ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर महिन्यात पूर्ण होऊन उर्वरित ७४ रिक्षा डेरेदाखल होणार आहेत यात शंकाच नाही. या सर्व मिळून ९४ ई रिक्षा सुध्दा पर्यटकांना कमी पडणार आहेत. गावाच्या इतिहासात प्रथमच एक नाविन्यपूर्ण बदल ई रिक्षाच्या माध्यमातून समस्त नागरिक अनुभवत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळी बरोबरच रुग्णांना सुध्दा या सेवेचा लाभ मोठया प्रमाणावर होत आहे. स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने पर्यटकांना ही एक पर्वणीच ठरली आहे. आजवर हजारो पर्यटकांसह स्थानिक लोक सुध्दा याचा उपभोग घेत आहेत.अधिकारी वर्गाला सुध्दा आपल्या कार्यालयापर्यंत सध्या तरी मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुळात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी सहकार्याची भूमिका बजावली नव्हती त्यांनी आपले हात झटकले होते.कारण हा एक संवेदनशील विषय असल्यामुळे सुप्रीम कोर्टाशिवाय परवानगी मिळणे कठीण होते. त्यासाठी रिक्षा संघटनेने जवळपास बारा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सनियंत्रण समितीच्या परवानगीने पायलट प्रोजेक्ट म्हणून या रिक्षा कार्यरत आहेत.पर्यटकांची वाढती संख्या पाहता वीस रिक्षा अपुऱ्या पडत आहेत त्यासाठी सनियंत्रण समितीने लवकरच उर्वरीत ७४ रिक्षांना परवानगी देऊन इथे पर्यटन क्रांती घडवून आणावी अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. या ई रिक्षांची संख्या कमी आहे इथे आल्यावर खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते. एक सोयीस्कर आणि स्वस्त प्रवास उपलब्ध झाला आहे हे खूपच छान आहे.रिक्षात मोठया बॅगा घेत नाहीत त्यासाठी हमाल करावा लागतो हा खर्च परवडत नाही त्यासाठी सामान सुध्दा घ्यायला हवे. लोचन पानसरे—-पर्यटक मुंबई

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार

 चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे राज भंडारी पनवेल : सर्व गटई कामगार महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास कांबळे यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजातील गटई कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, कामगारनेते व प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, जगदीश ठाकूर, युवक अध्यक्ष नेरूळकर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष सुनिल मोहोड, माजी नगरसेवक सुनिल नाईक, कारंडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गटई कामगार उपस्थित होते. शिवदास कांबळे यांनी पुढे बोलताना सांगितले कि, चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी सरकार काम करीत आहे. त्या अनुषंगाने विविध योजना प्रत्येक कामगाराला मिळाली पाहिजे यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने लोकांच्या हिताचे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना सर्व कामगारांचा पाठिंबा, असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. रोहिदास चर्मकार समाज देशभर पसरलेला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाचे कौतुक केले आहे. देशाशी एकरूप असलेला या समाजाचा देशाच्या योगदानात वाटा आहे. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मविश्वासाने काम होत आहे. सरकार संविधानाच्या विरोधात आहे असा खोटा प्रचार आणि दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असतात. मात्र सर्वप्रथम २६ नोव्हेंबर २०१५ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान दिन झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा करून लोकशाहीच्या मंदिरात नतमस्तक झाले होते. सोयीनुसार संविधान बदलण्याचे काम काँग्रेस पक्षाने स्वार्थासाठी केले असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. पीएम आवास, उज्वला गॅस, शौचालय, मातृवंदन योजना, जलजीवन मिशन, लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, पीएम किसान, शेतकरी सन्मान, पीक विमा, आरोग्य योजना, अशा अनेक लोकहिताच्या योजना राबवल्या आहेत, त्यामुळे लोकांचे काम करणारे हे सरकार पुन्हा येण्यासाठी मला विजयी करा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.