Month: November 2024

विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली

सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई   मुंबई : विनातिकीट प्रवाशांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत ८० कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे. त्यातही दसरा, दिवाळीच्या काळात अनेक प्रवाशांनी गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिकीट तपासनीसांनी विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून एकट्या ऑक्टोबर महिन्यात १२ कोटी रुपयांची दंडवसुली केली. पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. लोकल, रेल्वेगाड्या, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाड्यांमधून तिकीट नसलेल्या प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथक सज्ज केले आहेत. तिकीट तपासनीसांच्या पथकांनी गेल्या सात महिन्यांत विनातिकीट प्रवाशांकडून ८०.५६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये मुंबई उपनगरीय लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २६.६० कोटी रुपयांची दंडवसुली केली. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह २.०९ लाख विनातिकीट प्रवाशांचा शोध घेऊन, त्यांच्याकडून १२.१० कोटी रुपये वसूल केले. याशिवाय, ऑक्टोबरमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये, फलाटावर ९३ हजार विनातिकीट प्रवाशांना शोधून ३.९० कोटी रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या सात महिन्यात धावत्या वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी करून, ३४,८०० विनातिकीट आणि सामान्य लोकलचे तिकीट असलेल्या प्रवाशांना पकडून सुमारे १.१५ कोटींचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, प्रवाशांनी कायम योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का?

उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा   मुंबई : विकास आराखडा (डीपी) नियोजित रस्ता संरेखित करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर मग पालिका अधिकारी नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करतात, अशी विचारणा नुकतीच उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासानाला केली. महापालिका अधिकाऱ्यांना कशाचीच भीती राहिली नाही का ? अशी विचारणाही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असतानाही त्याचे पालन करण्याकडे उघडपणे दुर्लक्ष करण्यात येते, त्यांचे आदेश मनमानी पद्धतीने धुडकावून लावले जातात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची ही अशी वागणूक खपवून घेतली जावी का ? असा प्रश्न करून याबाबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी सविस्तर प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करावी, असे आदेशही खंडपीठाने दिले. विलेपार्ले (पश्चिम) येथील विकास आराखडा (डीपी) नियोजित रस्ता संरेखन प्रस्तावित आहे. परंतु, या रस्त्याच्या कामामुळे एका चर्चचे बांधकाम बाधित होणार असल्यामुळे रस्त्यांच्या संरेखनात बदल करण्याची मागणी ‘पेंटेकोस्टल मिशन सोसायटी’सह अन्य रहिवाशांनी केली होती. सुरुवातीला महापालिकेने लगतचा भूखंड याचिकाकर्त्यांना देऊ केला होता. परंतु, नंतर भूखंड वाटप करण्याची कायद्यात तरतूद नसल्याने पालिका प्रशानाने निर्णय फिरवला. त्या विरोधात याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी १६ मे रोजी महापालिका आयुक्तांना या प्रकरणाची योग्य ती तपासणी करून तात्काळ प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर, याचिकाकर्त्यानी १० ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांना आणखी एक निवेदन दिले. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग-१ च्या प्रधान सचिवांना प्रस्ताव-अ सादर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या प्राथमिक आदेशानंतर १४ महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या संबंधित आदेशाबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा दावा महापालिकेच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. परंतु, याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे पुरावे न्यायालयात सादर केल्याकडे न्यायालयाने पालिकेच्या वकिलांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभाग-१ च्या प्रधान सचिवांना प्रस्ताव-अ सादर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या प्राथमिक आदेशानंतर १४ महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही.

 वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४’ लस घ्या!

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश   मुंबई : हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) ही लस देण्याचे निर्देश दिले आहेत. ही लस चार प्रकारच्या इन्फ्लूएंझापासून संरक्षण करत असल्याने या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ही लस उपलब्ध नसल्यास सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. भारतात ऑगस्टपर्यंत १५ हजार जणांना इन्फ्लूएंझाची लागण झाली असून, यातील २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवाळ्यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. साधारणपणे इन्फ्लूएंझाचा सर्वाधिक त्रास हा ६५ वर्षे व त्यावरील नागरिकांना होतो. वृद्ध आणि आजारी लोकांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस घेणे आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो. हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा प्रसार अधिक होतो. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ही लस घेण्याची शिफारस केली आहे. फेब्रुवारीपासून भारत, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये एच१एन१ इन्फ्लूएंझा विषाणू वाढत असल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. लस कधी घ्यावी? इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने उत्तर गोलार्धातील नागरिकांना फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांना सप्टेंबरमध्ये लस देण्यात यावी, असेही डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. भारतामध्ये या लशीची किंमत नियंत्रित नसल्याने प्रति डोस १८०० ते २००० रुपये नागरिकांना मोजावे लागतात.

 बालदिनी क्रिएटीव्ह टच चित्रकला स्पर्धेचे आयोजन

टच संस्थेच्या वतीने राजेंद्र साळसकर मुंबई : ‘टच'(टर्निंग अपॉर्चुनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाईल्ड हेल्प) ही स्वयंसेवी संस्था १९९३- ९४ पासून ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या विकासासाठी महाराष्ट्रभर कार्यरत आहे. दुर्गम, डोंगराळ,…

विधानसभा निवडणुकीत मद्याचा महापूर

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य तस्करी, मद्यसाठ्याविरोधात मोहीम हाती घेतले होते. यामध्ये अवघ्या २३ दिवसांत पाच हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली असून साडेचार…

विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

डोंबिवली : उन्हाळा, पावसाळा असो सण उत्सव असो डोंबिवलीकर आवाज उठवून उठवून शांत झाले पण रस्त्यांवरील खड्डे काही बुजले नाही. मात्र विधानसभा निवडणूका लागताच अनेक रस्त्यांची कामे एमएमआरडीएने हाती घेत…

ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

ठाणे : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने ठाणे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. यंदाही हे सर्वेक्षण पार पडले…

सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा

राज भंडारी पनवेल : करंजाडे येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापचे प्रीतम जे एम म्हात्रे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना विविध संघटनांचा, पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. प्रीतम म्हात्रे हे उरणचे आमदार व्हावे ही काळाची गरज आहे. ते तरुण उमेदवार असल्याने आणि उरणचा विकास व्हावा यासाठी नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन विनोद साबळे यांनी केले.

नजीब मुल्ला हे नक्कीच निवडून येतील – भाऊ कदम

अनिल ठाणेकर ठाणे : अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली त्यामुळे बहिणींनी मला ओवाळले. या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीब मुल्ला हे नक्कीच निवडणूक येतील अशीआशा मला वाटते असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला जिल्हाप्रमुख लता पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, गणेश साळवी, गणेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अजितदादा पवार यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. लोकांचे विकासकामे होण्यासाठी लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी  महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला निवडून येणे गरजेचे आहे. नजीब मुल्ला यांच्या विरोधात माजी मंत्री असलेले उमेदवार उभे असले आणि सामना अटीतटीचा असला तरी अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली त्यामुळे बहिणींनी मला ओवाळले. या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीब मुल्ला हे नक्कीच निवडणूक येतील अशीआशा मला वाटते असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले.१४९ – मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे (शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांची  गुरुवारी प्रभाग क्रमांक २३, शिवसेना मध्यवर्ती शाखा, कळवा नाका येथून प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. या प्रचार रॅलीत प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारकभाऊ कदम यांची विशेष उपस्थिती होती. नजीब मुल्ला यांची प्रचार रॅली शिवसेना मध्यवर्ती शाखा, कळवा नाका येथून सुरु होऊन मनिषा नगर, सह्याद्री सोसायटी, सुदामा सोसायटी, साईबाबा नगर, गीतांजली सोसायटीमार्गे, गावदेवी मंदिर-शंकर मंदिर, आईनगर, घड्याळ चौक , शिवसेना मध्यवर्ती शाखा,कळवा नाका येथे समारोप करण्यात आला.

पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात अत्यंत मार्गदर्शक – किशन जावळे

रायगड : अशोक गायकवाड* प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित रायगड-अलिबाग पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही पुस्तिका तयार केल्याबद्दल प्रसिध्दी माध्यम कक्षाचे कौतुक केले.* यावेळी निवडणूक निरीक्षक संतोष कुमार राय, दुनीचंद राणा, सतीश कुमार एस, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, नवी मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रविकिरण कोले यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.