Month: November 2024

 राज्यातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा जाहीर

 प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये   मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या बक्षीस रकमेच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक रु. १,००,०००/- (रुपये एक लाख) व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार), तृतीय पारितोषिक रु. ३०,०००/- (रुपये तीस हजार) अशी भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात येतील. तसेच, उत्कृष्ट कथेसाठी ०७ हजार रूपये, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक व उत्कृष्ट मुखपृष्ठ यांना प्रत्येकी ०५ हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास ७५०० रूपये अशी पारितोषिके आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणार्‍या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास ४० हजार रूपये, द्वितीय क्रमांकास २० हजार रूपये आणि तृतीय क्रमांकास १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ०५ हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे. गतवर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केल्याप्रमाणे या वर्षीपासून डिजिटल दिवाळी अंकांसाठीही विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या संपादक, प्रकाशकांनी दिवाळी अंकाच्या दोन प्रती व प्रवेश शुल्क रु.१००/- रोख, धनादेश अथवा डी.डी.द्वारे दिनांक २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि स्पर्धा समन्वयक शैलेंद्र शिर्के आणि दीपक म्हात्रे यांनी केले आहे. अंक पाठविण्याचा पत्ता :     अध्यक्ष/कार्यवाह मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, महापालिका मार्ग, सी.एस.टी., मुंबई – ४००००१. फोन : ०२२-२२६२०४५१/२२७००७१५ आपला, (शैलेंद्र दिनकर शिर्के) कार्यवाह आणि स्पर्धा समन्वयक मुंबई मराठी पत्रकार संघ ९९८७०६३६९९

विहंग प्रतिष्ठानतर्फे दिवाळी अंक प्रदर्शन

ठाणे : विहंग प्रतिष्ठान आणि नेहरुनगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ८ नोव्हेंबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत नेहरुनगर कुर्ला येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे…

पाणी नाही तर मत नाही

 अंबरनाथमध्ये पाण्यापासून वंचित मतदार बहिष्कारच्या भूमिकेत अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील पाण्याच्या समस्येला त्रासलेल्या मतदारांनी पाणी नाही तर मत नाही अशी भूमिका घेतली आहे अंबरनाथ पश्चिम येथील पटेल प्रयोशा योगिनिवास या गृह संकुलातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत मतदानावर बहिष्कारचा इशारा दिला आहे गेल्या आठ वर्षांपासून पाणी समस्यांनी त्रासलेले असून प्रशासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही आमची प्रश्न सुटले नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. अंबरनाथ पश्चिम भागात फुले नगर परिसरात पटेल प्रयोशा योगीनिवास हे गृहसंकुल असून तिथे १२ इमारतींमध्ये ४७० कुटुंब वास्तव्यास आहेत. सुमारे दीड हजार लोकवस्ती असलेल्या या गृह संकुलात गेल्या आठ वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. मुबलक पाणी येत नसल्याची तक्रार येथील नागरिक करतात. कधी एक दिवसाआड तर कधी दोन दिवसाआड येथील नागरिकांना पाणी मिळते. त्या पाण्याची वेळही अवघ्या दहा मिनिटाची आहे. त्यामुळे आठ वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागतो आहे. या समस्येबाबत येथील रहिवाशांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पालिका, स्थानिक आमदार आणि खासदार यांनाही निवेदन दिले असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र सर्व सोपस्कार करूनही पाण्याची समस्या सुटू शकली नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील रहिवाशांनी घेतला आहे. पाणी नाही तर मत नाही अशी भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे. त्यामुळे येथे प्रचारासाठी जाणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आम्हाला पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून आहे. या समस्येमुळे नातेवाईक ही आमच्या घरी येत नाहीत. ही समस्या सोडवण्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे, अशी प्रतिक्रिया येथील एका महिलेने दिली आहे. तर अवघ्या दहा मिनिटात पाणी जाते. पुरेसे पाणी नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे, अशी माहिती येथील एका रहिवाशांना दिली आहे. योजनांची घोषणा पाण्याचा मात्र पत्ता नाही अंबरनाथ शहरासाठी नव्याने वाढीव पाणी योजना मंजूर करण्यात आल्याचा गवगवा काही आठवड्यांपूर्वी झाला. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची वितरण व्यवस्था कमकुवत असून त्यामुळे शहरातील विविध भाग बारमाही टंचाईचा सामना करतात. पाणी प्रश्नावरून स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांना स्वतःच्या पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले होते. चिखलोली धरणाच्या उंची वाढीवरूनही स्थानिक आमदारांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र पाण्याची समस्या कायम आहे.

महेश गायकवाड यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख कल्याण :- कल्याण पूर्व शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह एकूण नऊ जणांची शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिवसेना पक्षातून हकालपट्टी केली. शिवसेना पक्ष, महायुतीच्या विरोधात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुक लढणार नव्हते

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची माहिती ठाणे : राज्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून निवडणुक लढविण्यास तयार नव्हते. परंतु मी आणि…

ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्याचा निरीक्षकांकडून आढावा

नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात होणा या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेच्या निरीक्षणासाठी निवडणूक आयोगामार्फत नियुक्त…

माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिक, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज भंडारी पनवेल : महविकास आघडीचे लाडके उमेदवार मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांचा पनवेल शहर (प्रभाग क्रमांक १४,१८,१९) प्रचार दौरा दिनांक ६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.या…

महाराष्ट्र कुनीति आणि कुकर्माचे मॉडेल बनत आहे –  योगेंद्र यादव

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्राने नेहमीच देशाच्या राजकरणाला दिशा दाखवली आहे. इथे सुरु केलेल्या रोजगार हमी, महिला आरक्षण सारख्या योजना केंद्र सरकारने देशभरात चालवल्या. बळाने नाही तर नीतीने सरकार चालवण्याचा वस्तुपाठ महाराष्ट्राने देशाला घालून दिला याबद्दल देशभरात महाराष्ट्राचे नाव आदराने घेतलं जायचं पण गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा राजकारणाने अशी काय पलटी मारली की आज महाराष्ट्र कुनीति आणि कुकर्माचे मॉडेल बनत आहे हे फार चिंताजनक आणि दुःखदायी आहे, असे घणाघाती आरोप भारत जोडो अभियान चे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी ठाण्यात भारत जोडो अभियानातर्फे आयोजित केलेल्या लोकशाही, संविधान आणि मताधिकार संमेलनात बोलताना केले. खोट्या राष्ट्रवादाचा आव आणणारे आणि धर्माच्या, जातीच्या नावावर दंगली घडवून आणणारे खरे देशद्रोही आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला चपराक लगावून त्यांना कुबड्यांचा आधार घेऊन सत्तेवर येण्यास भाग पाडण्यात महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली होती. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुजाण मतदारांनी या देशद्रोही आणि सत्तेचा गैरवापर करुन आलेल्या सरकारला धडा शिकवावा आणि त्यांना सत्तेतून पायउतार व्हायला भाग पाडावे, असे आवाहन योगेंद्र यादव यांनी केले. भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्र राज्य संयोजक उल्का महाजन यांनी आपल्या भाषणात सरकारच्या लाडकी बहीण या योजनेवर जोरदार टीका करत म्हटलं की महिलांना पैशाचं आमिष निवडणुकीसाठी दाखवणारे सरकार महिलांच्या सुरक्षितते बाबत निकामी ठरले आहे हे राज्यात सतत घडणाऱ्या महिलावरील अत्याचार आणि त्यात सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा हात आणि त्यांना आरोप मुक्त करण्यात सरकारचा पुढाकार यावरुन स्पष्ट दिसून येतं. शिवाजी महाराजांचा पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारे हे सरकार सामाजिक, आर्थिक बाबतीत संपूर्णपणे पराभूत झाले आहे. भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय सचिव डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सरकारच्या सर्रास खोटेपणावर झोड उठवताना म्हटले की सरकारवर टीका करणाऱ्या आणि भारत जोडो अभियानात सामील असलेल्यांना अर्बन नक्षल, अराजक माजवणारे असे ठरवून संविधानाने दिलेल्या विचार आणि भाषण स्वातंत्र्याचा अपमान करण्याचे काम फडणवीस करत आहेत. सर्रास खोटे आरोप दाबून करा हीच शिकवण भाजप आणि संघातून मिळते आणि त्याच्याच आधारे हे बेईमानी सरकार चालवले जात आहे. या निवडणुकीत त्यांना पाडून लोकशाहीचा सन्मान करण्याचा पण मतदारांनी केला आहे. या संमेलनात शाहीर संभाजी भगत आणि सहकाऱ्यांनी संविधानाचा जलसा जोशात सादर केला. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास ठाणेकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संसोजक राजेंद्र चव्हाण, मुक्ता श्रीवास्तव, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, विशाल जाधव, रवि घुले, अजय भोसले आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

भारतातील नाविक कामगारांचा एकता दिन संपन्न

मुंबई : भारतातील जहाजावरील नाविक कामगारांचा ६  नोव्हेंबरला दरवर्षी एकता दिन साजरा केला जातो. त्याप्रमाणे नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेच्या वतीने मस्जिद बंदर येथील सिमेंनस् हॉस्टेलच्या आगाशीवर…

 फोटो सर्कल सोसायटीचे १० नोव्हेंबर  ते १७ नोव्हेंबरपर्यंत २५ वे राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन

भारतातील छायाचित्रकारांनी काढलेली निवडक २६४ छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार ! अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील नामवंत फोटो सर्कल सोसायटीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त १० नोव्हेंबर  ते १७ नोव्हेंबर  दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन…