Month: November 2024

सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ७३ उमेदवार रिंगणात  ३८ उमेदवारांनी घेतली नामनिर्देशनपत्रे मागे

अशोक गायकवाड रायगड : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात सोमवारी (दि.४) नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी ३८ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ७३…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या  वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विविध संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम केंद्राच्या वा.…

पनवेल व कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी दुनी चंद राणा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १८८-पनवेल व १८९ कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून दुनी चंद राणा यांची नियुक्ती करण्यात…

मतविभागणी टाळण्यासाठी नाशिक (पश्चिम) मधून माकपची माघार – डॉ. उदय नारकर

ठाणे : मतविभागणी टाळण्यासाठी, नाशिक पश्चिमची जागा भाजपच्या पदरात पडू नये, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक (पश्चिम) मधील उमेदवार डॉ. डी. एल. कराड हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत,…

 महाराष्ट्राची कबड्डी लीग मे महिन्यात!

सचिव बाबुराव चांदेरे यांची घोषणा   मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने पुढील वर्षी मे महिन्यात महाराष्ट्राची कबड्डी लीग घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी दिली. पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवार, दि. २३ ऑक्टोंबर रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत या विषयावर धोरणात्मक चर्चा करून मंजुरी घेण्यात आली. याबाबत चांदेरे यांनी सांगितले की, “लीगकरिता पुरुष आणि महिलांचे असे एकूण १६ संघ तयार करण्यात येतील. यासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया राबवण्यात येईल. राज्यातील प्रो कबड्डी लीग खेळलेल्या खेळाडूंचाही या लीगमध्ये समावेश असेल. इतर राज्यातील (बाहेरील राज्यातील) एका खेळाडूस प्रत्येक संघात स्थान देण्यात येईल. राज्यातील पुणे आणि मुंबई या दोन शहरांत ही स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धा साधारणत: पुढील वर्षाच्या मे महिन्यात घेण्याचा संघटनेचा मानस आहे. लीगचे नियम आणि अटी लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत.” चांदेरे पुढे म्हणाले की, “यापुढे खाजगी संस्थांना कबड्डी लीग घेण्यासाठी राज्यात परवानगी देण्यात येणार नाही.

 डॉ. डी. वाय. पाटील एसएचा निर्णायक विजय

 एमसीए कांगा लीग क्रिकेट स्पर्धा मुंबई : एमसीए डॉ. एच. डी. कांगा क्रिकेट लीग स्पर्धेच्या ‘ए’  डिव्हिजन सामन्यात डॉ. डी. वाय. पाटील एसएने परळ एससीवर निर्णायक विजय मिळवला. हिंदू जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात शनिवारी डॉ. डी. वाय. पाटील एसएने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ५ बाद १७९ धावांवर घोषित केला. प्रणव केला याने ६४ धावांची नाबाद खेळी करत त्यात मोलाचे योगदान दिले. हर्षल जाधवने ४६ धावा करताना त्याला चांगली साथ दिली. फलंदाजांनंतर गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना परळ एससीला पहिल्या डावात अवघ्या ५७ धावांवर गुंडाळताना त्यांच्यावर फॉलोऑन लादला. त्यानंतर दुसऱ्या डावात प्रतिस्पर्धी संघाला ७८ धावांत गारद करताना एक डाव आणि ४४ धावांनी विजय मिळवला. कर्श कोठारीने (५/२३ आणि ६/२२) सामन्यात ११ विकेट घेत डॉ. डी. वाय. पाटील एसएचा विजय आणखी सुकर केला. संक्षिप्त धावफलक (ए’  डिव्हिजन): डॉ. डी. वाय. पाटील एसए – 5 बाद 179 डाव घोषित(प्रणव केला 64*, हर्षल जाधव 46) वि. परळ एससी – पहिला डाव: सर्वबाद 57 (कर्श कोठारी 5/23, इक्बाल अब्दुल्ला 4/12) आणि दुसरा डाव  –  सर्वबाद 78(आशय दुबे 33, नमन झंवर 31; कर्श कोठारी 6/22, उमर खान 3/28). निकाल – डी. वाय. पाटील एसए एक डाव आणि ४४ धावांनी विजयी. पारसी जिमखाना – 8 बाद 249 (जय जैन 71, केविन आल्मेडा 66, अंगकिर्श रघुवंशी 41; विजय गोहिल 4/55, अथर्व कर्डिले 3/93) वि. अपोलो सीसी – 7 बाद 186 (ओंकार उंबरकर 51, करन शाह 43, स्वप्नील प्रधान 41, शुभम पुण्यर्थी ३०; शम्स मुलानी ६/७०). निकाल – सामना अनिर्णित. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया 3 बाद 275 (आकाश पारकर 104*, आकाश आनंद 100*) वि. कर्नाटक एसए – 6 बाद 121 (गौरिश जाधव 40*; ध्रुमिल मटकर 3/26). निकाल – सामना अनिर्णित. न्यू हिंद एससी – सर्वबाद 72(अथर्व भोसले 3/2, जुनेद खान 3/31) वि. पी. जे. हिंदू जिमखाना – 5 बाद 228 (सिद्धांत अधटराव 62, कौशिक चिखलीकर 56, गौतम वाघेला 53*; शंतनू कदम 3/57). निकाल – हिंदू जिमखाना पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी. शिवाजी पार्क जिमखाना – सर्वबाद 193(रझा मिर्झा 54; हिमांशू सिंग 5/50, विशाल दाभोळकर 4/60) वि. पार्कोफेन क्रिकेटर्स – 4 बाद 108 (प्रसाद पवार 32*). निकाल – सामना अनिर्णित. नॅशनल सीसी – 6 बाद 254 (सिद्धार्थ म्हात्रे 101*, भूषण तळवडेकर 51; योगेश पाटील 3/71) वि. मुंबई पोलीस जिमखाना – 4 बाद 136 (रोहित पोळ 62*, हर्ष आघाव 50*). निकाल – सामना अनिर्णित. व्हिक्टरी सीसी – 9 बाद 190 (सुवेद पारकर 35, जय बिस्ता 34, प्रग्नेश कानपिल्लेवार 33, हार्दिक तामोरे 31; हर्ष तन्ना 4/55) वि. एमआयजी क्रिकेट क्लब – 7 बाद 134 (गौरव जठार 44, वेदांत मुरकर 39; रॉयस्टन डायस 4/21). निकाल – सामना अनिर्णित.

पनवेल व कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी दुनी चंद राणा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

रायगड : अशोक गायकवाड भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १८८-पनवेल व १८९ कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून दुनी चंद राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७०२१९७९४२२ असा आहे. ते १८८ -पनवेल व १८९ कर्जत या विधानसभा मतदार संघातील नागरिकांना शासकीय विश्रामगृह, पनवेल येथे दुपारी १.०० ते दुपारी २.०० या वेळेत भेटतील. तरी नागरिकांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात काही तक्रार असल्यास वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निरीक्षक यांनी केले आहे.

सात विधानसभा मतदारसंघांसाठी पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून स्वप्नील ममगाई यांची नियुक्ती

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूकांदरम्यान, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून स्वप्नील ममगाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८६२३८६६५९९ असा आहे. ते सात विधानसभा मतदार संघातील नागरिकांना शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे सायंकाळी ४.०० ते ५.०० या वेळेत भेटतील. तरी नागरिकांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात काही तक्रार असल्यास वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निरीक्षक यांनी केले आहे. 00000

 “माझे संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न”

भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आरोप   ठाणे : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. तर या भेटीवेळी दीपेश म्हात्रे यांनी त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल खिशात सुरु ठेवला होता, जेणेकरून मी काहीही चुकीचं बोललो असतो तर सर्वांना सांगितले असते, असा खळबळजनक दावा जगन्नाथ पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आहे. डोंबिवली येथे नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दीपेश म्हात्रे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला. निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने मात्र महायुतीच्या बंधनात अडकल्याने भाजपच्या पारंपरिक मतदारसंघ असलेला आणि भाजपचे रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली त्यांना निवडणूक लढविणे शक्य नसल्याने दीपेश म्हात्रे यांनी निवडणुका घोषित होण्याच्या काही दिवस आधीच मशाल हाती घेतली होती. यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून डोंबिवली विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली. तर दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात जोरदार प्रचार देखील सुरु केला आहे. तर काही दिवसांपूर्वी दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याभेटीबाबत जगन्नाथ पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता अनेक विषयांवर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी एका उमेदवाराने माझी भेट घेतली होती. तर या भेटी दरम्यान मला डोंबिवली विधानसभेची गणित समजावून सांगत होता. मात्र मी त्यांना सांगितले तुम्ही कितीही जोर लावला तरी या ठिकाणी तुला यश मिळणार नाही आणि येत्या २० तारखेच्या गणितात रवींद्र चव्हाण पास होतील, असे संभाषण झाल्याचे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले. तर संबंधित उमेदवाराने भेटीवेळी संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल खिशात सुरु ठेवला होता, जेणेकरून मी काहीही चुकीचं बोललो असतो तर सर्वांना सांगितले असते, असा खळबळजनक दावा जगन्नाथ पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आहे. महायुतीचे राजेश मोरे आणि रवींद्र चव्हाण विजयी होणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे डोंबिवली येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात सर्व पदाधिकाऱ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबोधित करून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. तर कल्याण लोकसभेतील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असे मत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.