अनिल ठाणेकर
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
डॉ.जितेंद्र आव्हाड यांची शॉर्टटर्म  मेमरी लॉस झालेला आहे, या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. याचक  कार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी सांगितले होते की, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  २४ हजार दुबार मतदार आहेत हा सर्वप्रथम आक्षेप मी स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला होता. १२ हजार दुबार नावे ही १४४ कल्याण ग्रामीण मधील, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  मध्ये आहेत. हा सर्वप्रथम आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही नोंदविला होता. याच्याविरुद्ध आर ओ कडे तीन नावे वगळता येणार नाहीत यासाठी थयथयाट करायला कोण गेले होते ? याची शोधपत्रकारिता करावी, सीसी फूटेच तपासावे, याचे सत्य आपल्या डोळ्यासमोर येईल. जितेंद्र आव्हाड यांना स्वतःच्या विजयावर विश्वास नाहीय का ? की आपण एवढ्या मताधिक्याने कसा जिंकलो? याची शंका मनामध्ये आहे का ? आम्ही तर अत्यंत विनम्रपणे मुंब्रा कळव्यातील जनतेने जो जनादेश दिला तो स्विकारलेला आहे. जितेंद्र आव्हाड हे ईव्हीएम हॅक करुन त्यांच्या मतदारसंघांमध्ये विजयी झालेत का ? अशाप्रकारची शंका आता त्यांच्या वर्तवणुकीवरुन येत आहे.लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत. ईव्हीएबाबत शंका असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम राजीनामा द्यावा पोटनिवडणूक आपोआप लागेल.  मग ही निवडणूक ईव्हीएम घ्यायची की बॅलेट वर घ्यायची हे निवडणूक आयोग ठरवेल. जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम कसे हॅक होते हे प्रत्यक्ष निवडणूक आयोगाला दाखवावे, पण त्यातुन हे देखील समोर येईल की त्यांचा विजय देखील ईव्हीएम हॅक करुन केला आहे, हे सत्य देखील जगासमोर येऊ शकते.२८८ विधानसभा जागांपैकी २४ ठिकाणी पराभूत उमेदवारांनी दुबार वीवीपॅट मोजणीचा आग्रह केला आहे. याचा अर्थ ९० लोकांना ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. हेच यावरुन सिद्ध होते.आणि २४ ठिकाणी देखील रिकाउंटींग होईल तेव्हा त्यांना देखील विश्वास होईल की महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारले आहे.ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२४ -२५ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली त्या दिवसापासून महाविकास आघाडी ही योजना कशी फेल होमार ? या योजनेला पैसे मिळणार नाहीत? तसेच या योजनेच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये देखिल गेले. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली ५ महिन्यांचे इन्स्टॉलमेंट महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिबीटी ने गेले आणि ज्या महाविकास आघाडीने ह्या योजनेला विरोध केला, जे या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आल्यानंतर ३ हजार पैसे देऊ अशा प्रकारे खोटं देखिल बोलले गेले. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीने दीड हजार रुपयांना विरोध केला, हि योजना पुढे चालणार नाही असे वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात गेले. पण त्याच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये ३००० रुपये माता भगीनींच्या खात्यामध्ये आम्ही देऊ अशा प्रकारे ते खोटं बोलले. म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी महाविकास आघाडीचा पराभव केला.  लाडकी बहीण योजना फेल करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टा मध्ये गेली, असे आनंद परांजपे म्हणाले.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *