आंतरशालेय खो-खो स्पर्धा

 

मुंबई : माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलतर्फे आयोजित अमृत महोत्सवी आंतरशालेय खो-खो स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू असून,  झालेल्या अंतिम सामन्यात चुरशीच्या खेळाचे प्रदर्शन झाले. या दोन्ही सामन्यात यजमान सरस्वती मंदिर हायस्कूल विजय साजरे केले.
मुलींचा अंतिम सामना:
मुलींच्या अंतिम सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने बंगाली एज्युकेशन सोसायटीला ८-६ असा दोन गुणाने पराभव करत विजय मिळवला. या सामन्यात सरस्वती मंदिर कडून खेळताना अवनी पाटीलने (१:५० व १:३० मि संरक्षण) स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षण बक्षीस मिळवले. हर्षला सकपाळने (२:२० मि. ४:०० मि. संरक्षण व आक्रमणात ०३ गुण)  उत्कृष्ट खेळ करत स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू ठरली. तर पराभूत बंगाली एज्युकेशन सोसायटी कडून खेळताना सिद्धी शिंदेने (आक्रमणात २ गुण) उत्कृष्ट खेळ करताने स्पर्धेतील  उत्कृष्ट आक्रमक खेळाडू ठरली.
मुलांचा अंतिम सामना:
मुलांच्या अंतिम सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने  डी. बी. कुलकर्णी हायस्कूलवर १७-११ असा ६ गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात सरस्वती मंदिर कडून खेळताना रुद्रसिंग चव्हाणने (२:५० व २:३० मि. संरक्षण) जबरदस्त खेळ करत स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षण बक्षीस मिळवले. शिवम झाने (१ मि., १ मि. संरक्षण करून व आक्रमणात ०२ गुण) सुध्दा जोरदार खेळ करत स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू ठरला. तर परभूत डी. बी. कुलकर्णी हायस्कूल कडून खेळताना प्रज्वल सोनावणेने (आक्रमणात २ गुण) सुध्दा चांगला खेळ करत स्पर्धेतील उत्कृष्ट आक्रमक खेळाडू ठरला. स्पर्धेतील खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली, तर सरस्वती मंदिर हायस्कूलने आपल्या खेळाची गुणवत्तादेखील सिद्ध केली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *