सरसंघचालक भागवातांचे आवाहन
नागपूर : हिंदू धर्म ठिकवायचा असाल असेल तर तमाम हिंदू जोडप्यांनी किमान तीन मुले जन्माला घालायलाच पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलतांना मोहन भागवत म्हणाले, ‘लोकसंख्या घट ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगतं की जेव्हा जन्मदर २.१ च्या खाली येतो तेव्हा पृथ्वीवरून ती भाषा, धर्म आणि संस्कृती नामशेष होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ मध्ये ठरविण्यात आले. लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर २.१ पेक्षा कमी नसावा. आमच्यासाठी दोन-तीन मुलं असणं गरजेचं आहे. लोकसंख्येची गरज आहे. कारण समाजाचे अस्तित्व राखण्यासाठी हे गरजेचे आहे.
दरम्यान भागवत यांच्या विधानावर एमआयएमचे नेते असउद्दीन ओवेसीयांनी टिका केली आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी मुसलमानांवर आरोप करतात की मुस्लीम समुदाय आबादी वाढवतात त्यांना रोखले पाहिजे आणि येथे भागवत आता आबादी वाढवायला सांगत आहे. आधी मोदी आणि भागवत यांनी काय ते ठरवावे आणि मग बोलावे असा खोचक टोला त्यांनी हाणला.