ठाणे : मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे नुकतेच ‘ग्रीन ग्रो आगरो अॅग्रो सोल्यूशन’चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालय बँकेचे उपाध्यक्ष श्री.सुनील खाडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास म्हसा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण घागस, कान्होळ ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती पूनम जिवान शेळके, चिरड येथील श्री.जयवंत तुळशीराम कंटे, बोरिवळी येथील श्री.काळूराम दत्तु घरत तसेच नागरिक आणि ग्राहकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘ग्रीन ग्रो आगरो अॅग्रो सोल्यूशन’मध्ये ग्राहकांसाठी सॉइल चार्जर टेक्नोलॉजी वैदिकची उत्कृष्ट दर्जाची शेतीसाठी लागणारी खते व औषधे उपलब्ध आहेत. दुकानाचे मालक तुषार चंद्रकांत चौधरी यांनी या यशस्वी सोहळ्यासाठी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि भविष्यातही दर्जेदार सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच ‘ग्रीन ग्रो आगरो अॅग्रो सोल्यूशन’ला दुकान क्र.3, अंकिता कॉन्प्लेक्स, म्हसा-मुरबाड रोड, म्हसा, तालुका – मुरबाड, जिल्हा – ठाणे येथे सकाळी ९ ते ५ या वेळेत भेट द्यावी, असे आवाहनही श्री.चौधरी यांनी केले.
0000
