मुलुंड ः मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १) आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंडमधील ७० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान कार्ड नोंदणी करण्याची व्यवस्था मुलुंड पश्चिमेतील देविदयाल रोड आणि मुलुंड पूर्वेतील समर्पण हॉल येथे करण्यात आली होती. तब्बल ६०४ ज्येष्ठ नागरिक या शिबिरात सहभागी झाले होते. मुलुंडमध्ये ७०हून अधिक वर्षे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३५ हजारहून अधिक आहे. परिणामी या शिबिराची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळे आमदार मिहीर कोटेचा यांनी हे शिबिर १५ जानेवारी २०२५ पर्यंत राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. आयुष्मान शिबिर आमदार कोटेचा यांच्या कार्यालयामध्ये आणि मुलुंड पूर्व येथे सकाळी १० ते सायंकाळी पाच या कालावधीदरम्यान नियोजित ठिकाणी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल ३५ हजार कार्ड तयार केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना वाटण्यात येणार आहेत. परिणामी त्याची संख्या मोठी असल्याने त्याला थोडा वेळ लागेल, असेदेखील कोटेचा यांनी स्पष्ट केले.