मुंबई : दै. बित्तंबातमीसाठी यंदाच्या वर्षात सेल्स आणि मार्केटींग विभागात सर्वोत्तम कामगिरी नोंदिवण्याचा मान मंजुषा कुलकर्णी यांनी पटकावला आहे. दै. बित्तंबातमीच्या सुरुवातीपासून मंजुषा कुलकर्णी या सक्रीय आहेत.
कायदेशिर नोटीस आणि इतर जाहिरातीमिळून यंदाच्या वर्षात सर्वाधिक सहा लाख तीस हजार रुपयांच्या जाहीरातींचा व्यवसाय त्यांनी दै. बित्तंबातमीला मिळवून दिला होता. त्यांना आखून देण्यात आलेल्या किमान पाच लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवसाय त्यांनी केल्याबद्दल त्यांचा एकतीस हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस देऊन त्यांचा संपादक-प्रकाशक संदीप चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दै. बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर, सल्लागार नीता जांभेकर, न्यूज एडिटर सिद्देश शिगवण उपस्थित होते.
फोटोओळी
दै. बित्तंबातमीच्यासेल्स आणि मार्केटींग विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मंजुषा कुलकर्णी यांचा एकतिस हजार रुपयांचा बोनस देऊन सत्कार करतना संपादक- प्रकाशक संदीप चव्हाण. सोबत दै. बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर, सल्लागार नीता जांभेकर, न्यूज एडिटर सिद्देश शिगवण.
00000
