नेरूळ : कोकण मराठी साहित्य परिषद व यमुनाई फाउंडेशन यांच्या वतीने यमुनाई मातृवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक मोहन भोईर यांनी दिली. दरवर्षी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना यमुनाई मातृवंदन पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा रविवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता वाशी सेक्टर ९ए येथील गुरव न्याती हॉलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या वेळी यमुनाई मातृवंदन पुरस्कार राजेंद्र नाईक यांना, यमुना जीवनगौरव पुरस्कार बापू आजगावकर यांना, यमुनाई सहजीवन पुरस्कार स्नेहा राणी गायकवाड आणि यमुनाई नाट्यमहर्षी पुरस्कार भास्कर पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती मोहन भोईर यांनी दिली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक पाटील, चित्रपट निर्माते मुकुंद महाले, कवी अरुण म्हात्रे, ॲड. पी. सी. पाटील, ॲड. चंद्रकांत मढवी, पुंडलिक म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.