ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. १९५४-५५ या वर्षापासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ आता प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद, ठाणे समाज कल्याण विभागाच्या वतीने लाभार्थ्यांचे आधार कार्ड संकलनाचे काम चालू आहे. लाभार्थी कलाकारांनी आधार व्हेरीफिकेशन करण्याचे जाहिर आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
आधार व्हेरीफिकेशन करण्यापूर्वी वृध्द कलावंत यांनी आधार क्रमांक सोबत मोबाईल क्रमांक व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. ज्यांचे आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करावे. ज्या वृध्द कलावंत व साहित्यीकांचे आधार कार्ड हे मोबाईल क्रमांक व बँक खाते लिंक आहेत, त्यांनी आधार व्हेरीफिकेशनसाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती – शहापूर, अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, समाज कल्याण अधिकारी म.न.पा ठाणे, नवीमुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भाईदर व प्रशासन अधिकारी कुळगाव- बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका तसेच जिल्हा परिषद ठाणे जी. एस. टी कार्यालयासमोर वागळे इस्टेट, रोड न. २२, ठाणे (प) या कार्यालयातील ९६१९७८९१६४, ९२२५८५१७८९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी केले आहे. तथापी प्राप्त माहितीतील कलावंतांचे मोबाईल क्रंमाक आधार कार्डला लिंक नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्राप्त झालेले आधारकार्डची पडताळणी करण्याकरिता सांस्कृतिक कार्यालयामार्फतhttp://mahakalasanman.org/AadharVerification.aspx लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाईड मार्फत देखील माहिती तपासणी करता येणार आहे.