मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक स्व.गं.द. आबेकर यांच्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ ७ ते १३ डिसेंबर पर्यंत विविध क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमाने स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या समारंभाचा शुभारंभ सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजता
पार पडेल.सकाळी १० वाजता आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज मुला- मुलीं च्या कॅरम स्पर्धा,कॉलेज रेस्टॉरंट,परेल येथे,आयडियल स्पोर्ट क्लब,लिलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील.दुपारी १वाजता गिरणी कामगार महिलांच्या विविध स्पर्धा, उद्घाटन,आंबेकर होमिओपॅथी दवाखान्याच्या डॉ.रुपाली जाधव यांच्या हस्ते पार पडेल.या स्पर्धी रा.मि.म.संघ प्रांगणात पार पडतील.
०००