समतामूलक विचारांचा प्रचार – प्रसार करण्याची जबाबदारी आपलीच – आयुक्त सौरव राव
ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी य देशाला फक्त संविधानच दिले नाही. तर, सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिले आहेत. आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीने प्रसारीत करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन ठामपा आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळेस ते बोलत होते.
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकाराने पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनिष जोशी, बिरारे, गोदापुरे आदी उपस्थित होते. यावेळी सौरव राव यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजाने चालावे, यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे, असे सांगितले. या प्रसंगी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.