मुंबई : भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ५ डिसेंबर रोजी बोईसर मधील तारापूर एम्.आय.डि.सी.येथील मे. साळवी केमिकल्स लिमिटेड, मे. केशव ऑरगनिक्स प्रा.लिमेटेड, तसेच मे. डि.आर.व्ही.ऑरगनिक्स या तिन्ही कंपन्याने भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे नेतृत्वाखाली काम करण्याचे स्वीकारले आहे.
आज तिन्ही कंपन्यांमध्ये द्वारसभा पार पडला, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सन्माननीय सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वात महासंघाचे उपाध्यक्ष श्री देवेंद्रदादा वरूणकर, महासंघाचे संघटक सचिव शभावेश मोरे, अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियनचे सचिव आनंद सावंत, शिवाजी गुनुगडे व पत्रकार महासंघाचे पी.आर.ओ.प्रविण मंत्री, महासंघाचे कार्यकर्ते प्रकाश पाटील,विघ्नेश कडवट व नविन कंपनीचे सभासद यांनी मिळून द्वारसभा यशस्वी रित्या पार पडला.
तसेच व्यवस्थापन मालक यांनी कंपनी मध्ये बोलावुन महासंघाचे ध्येय धोरणे समजुन घेतले.चहापाण्याचा कार्यक्रम करून योग्य मानसन्मान दिला.
भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचा विजय असो असे गौरवोद्गार काढले. यावेळी युनियनचे प्रसिध्दी प्रमुख प्रवीण मंत्री, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.