खरेतऱ बहुतेक वृत्तवाहिन्यांना साध्या सरळ व सोप्या बतमीत मुळीच रुची वा रस नाही. त्यांना सतत पडद्यामागे काय हालचाली सुरु आहेत, याचे कुतुहल आहे. मानवीवंश शास्त्राचा विचार करणारे विद्वान सांगताता की माणसाला पुरातन काळापासून गॉसिप ऐकायलाच आवडते. कुठे काय भानगड सुरु आहे याचेच कुतुहल लोकांना असते. खरी गोष्ट बरेचदा साधी व सोपी असते. ती ऐकण्यात लोकांना रसच नसतो!! कुणाचे कुठे चुकले आहे ? कोण अडखळला आहे ? कोण धडपडला आहे ? याच्या बातम्या व माहित्या लोकांना ऐकायच्या असतात. ही सारे समाजमाध्यमांचा फुगा फुगवणारी साधनेही असतात. ट्वीटर वा व्हाटसपवर फिरणारे व मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होणारे संदेश काय असतात याचा थोडा विचार केला की हेच लक्षात येते की भानगडी हाच समजामाणद्यांचा आत्मा आहे. आणि वृत्तपत्रांचेही वाचकही याच समाजाचा घटक अस्लायने त्यंनाही अदिक चवीने चघळायला अशाच बातम्या लागत असतात. गेले पंधरा दिवस आपण आजुबाजूला याचीची सारी दृष्य रूपो पाहात ऐकत होतो…!
सरकार बसायला इतका वेळ का लागतो याचा शोध आपापल्या परीने ही सारी मंडळी लावत असताना, मग सुरु झाल्या अफवांच्या मालिका. “शिंदेंचा चेहरा पडलेला होता, ते नाराज दिसताहेत, ते चर्चेला गेले नाहीत, बैठका रद्द झाल्या आहेत, शिंदे आजारी असल्याचे नाटक करत आहेत, शिंदेंना गृहखाते हवे आहे, शिंदेंना मुख्यमंत्री पद द्या, ते नसले तर ते सरकारमध्ये राहणार नाहीत, जर शिंदे सरकारमध्ये नसतील तर हे सरकारच बसू शकत नाही. शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंकडे निघाले आहेत, शरद पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांना बोलावत आहेत….” वाटेल त्या पुड्या अफवा सोडल्या जात होत्या.
अर्थातच विरोधा पक्षांचे कामच हे असते की, ते सरकारच्या प्रत्येक कार्यक्रमात वा उपक्रमात तृटीच शोधतात. सरकार २६ तारखेलाही स्थापन होणयाच्या हालचाली दिसत नव्हत्या तेंव्हा लगेच संजय राऊतांचे काम सुरु झाले. त्यांना साथ द्यायला सुषमा अंधारे, श.प.राष्ट्रवादीचे नेते-प्रवक्ते, काही काँग्रेसवाले हे सारे सज्ज होतेच.
भाजपा शिंदेंचा गेम करणार आहे, शिंदेंना आता स्वतःची खरी किंमत कळेल, भारतीय जनता पक्ष शिंदेंचा आणि अजित पवारांचाही कचरा करून टाकणार, शिंदेंशिवाय भाजपा शपथविधी करण्याच्या तयारीत होता… अशा चर्चांना या मंडळींनी उधाण आणले.
एकनाथ शिंदेंनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितले की भाजपाचे शीर्ष नेते जो निर्णय़ करतील तो मला मान्यच आहे. शिदेंचे शिवसेनेतील वरिष्ठ माजी मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत आदि परोपरीने सांगत होते की शिंदे साहेब खरेच आजारी आहेत, ते नाराज नाहीत. ते उपमुख्यमंत्री होणारच आहेत… पण त्यावर ना वृत्तपत्रे ना वृत्त वाहिन्या ना जनता विश्वास ठेवत होती.
पण राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या पत्रकारांना हे पक्के माहिती होते की मतदानाच्या आधीपासूनच प्रचार संपता संपता एकनाथ शिंदे हे खरोखरीचे आजारी झाले होते. त्यांच्या घशाला वेदना होत होत्या. त्यांना थ्रोट इन्फेक्शनचा त्रास होत होता. राजकीय नेते व पक्ष हे पंचांग पाहून सारे कार्यक्रम ठरवत असतात असे नाही. पण अगदीच अवसेला शपथ विधी नको, त्यातल्या त्यात शुभ दिवस कोणता असेल असा थोडा विचार नक्कीच होत असतो. त्या प्रमाणे शपथविधीसाठी नोव्हेंबरच्या अखेरीचे दिवस हे अयोग्य ठरले होते. आणि डिसेंबरमध्ये सुरवातीला शपथ विधी व्हायचा तर त्यासाठी जागा कोणती योग्य असेल, हेही शोधकार्य सुरु होते. शिवाजी पार्कचा विचार करता येत नव्हता कारण. १ डिसेंबर पासून ते ७ तारखेपर्यंत दादर शिवाजी पार्कचा परिसर महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यकर्मसाठी राखीव ठेवण्यता येत असतो. हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखो भीम अनुयायंनी हा पिरसरत फुलून जात असतो. म्हणून मग दक्षिण मुंबईत समारंभाची जागा असावी असा विचार झाला.
व्हीटीसमोरच्या आझाद मैदानाची निवड २६-२७ नोव्हेंबरलाच प्रशासनाने केली होती. तिथे तयारी करण्यासाठी अवधी लागणारच होता. भव्य दिव्य समारंभाची तयारीही तितकीच वेळ काढू ठरणार होती. अशा साऱ्या कारणांनी २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर ५ डिसेंबरला शपथविधी समारंभ पार पडला.
भारतीय जनता पक्षाला देवेन्द्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे होते हे पहिल्या दोन दिवसातच स्पष्ट झाले होते. इतके मोठे बहुमत मिळवण्यासाठी त्यांनी गेली पाच वर्षे जे अथक काम केले होते, मविआचे सरकार पाडून सत्ता खेचून आणल्या नंतरही फडणवीसाना डावलून शिंदेंच्या गळ्यता मुख्यमंत्रीपदाची माळ घातली गेली होती. त्या अन्यायाचे परीमार्जनही होणे भागच होते. देवाभाऊंना कामाची पोचपावती पक्ष देणार हे अपेक्षित होते. आणि शिंदेंचे आजारपण थोडे बहुत नाराजी नाट्य हे संपवून मगच भाजपाने गटनेता व पर्यायाने मुख्यमंत्री पदावरचे फडणवीसांचे नाव जाहीर केले.
देवेन्द्र फडणवीस यांनीच नंतर बोलताना स्पष्ट केले की शिंदेंना उपमुख्यमंत्री होण्या पेक्षा शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून पक्ष कार्य करणे महत्वाचे वाटत होते. केवळ म्हणूनच ते सुरवातीला तयार नव्हते. बाकी गृहमंत्रीपद हवे वगैरे काही हट्ट नव्हते. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिंदेंचे मन वळवले. मीही त्यांची भेट घेऊन हेच सांगितले की, पक्ष वाढवण्याचे काम सत्तेत राहूनही तुम्ही चांगले करू शकाल. मी माझा सांगितला. शिंदे जेंव्हा राज्याचे प्रमुख बनले तेंव्हा मी सत्ते जायला राजी नव्हतो. मला पक्षकार्यासाठी मोकळा ठेवा असे मी म्हणालो होतो. पण पक्षाने मला सांगितले पद घ्यावे लागेल राज्य नीट चालवावे लागेल. ते मी ऐकले आणि ते योग्य झाले. हा माझा स्वानुभवाचा साक्षात्कार एकनाथरावांना पटला व ते उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार झाले.
नीतीश कुमार, चंद्राबाबु नायडू, हेमंत बिस्व सर्मा आदि बावीस राज्याचें मुख्यमंत्री, अमित शहा, राजनाथ सिंग आदि डझनभर केंद्रीय मंत्री, एनडीएतील देशभरातील मित्र पक्षांचे सारे प्रमुख नेते, हिंदी फिल्म सृष्टीचे लोकप्रिय कलावंत, अंबानी पासून सारे उद्योग जगत, समाजाचे धुरीण संत-महंत आणि पन्नास हजारांचा उसळणारा, कौतकभऱ्या नजरेने समारंभ पाहणारा समुदाय… अशा मोठ्या दिमाखदार थाटात देवेन्द्र फडणवीसांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
तो समारंभ अभूतपूर्व असाच होता. राष्ट्रीय राजकारणातील फडणवीस यांचे वाढलेले वहय त्यातून दिसत होते. पण आता पुढची वाटचाल तितकीच बिकट राहणार आहे. महाप्रचंड बहुमतासह सरकार तर आले आहे, पण निवडून आलेल्या महायुतीच्या २३३ आमदारांचे समाधान सतत होणे अशक्य आहे. शिवाय जातीपातीच्या राजकारणाची उभी राहिलेली भुते शांत होणार नाहीत. हिंदु मुस्लीम वाद राज्यात वाढू नयेत असेच काम सरकारला करावे लागेल. लाडक्या बहिणींना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना अधिकचे निधी देताना विकासकामेही रखडून चालणार नाही. लाख लाख कोटी रुपये खर्चांच्या ज्या नदी जोड प्रकल्पांचा ध्यास फडणवीसांनी व्यक्त केला आहे, त्या खर्चाची तोंड-मिळवणी करण्याचे आव्हान मोठे आहे. महाराष्ट्रालात फिनटेक मध्ये देशात व जगात अव्वल स्थान मिळवता येईल असे निर्मला सितारामन यांनी फडणवीसांची गटनेता म्हणून निवड झाली, तेंव्हा सांगितले होते. आर्थिक राजधानीचे ते महात्म्य टिकवण्याचेही ते फार मोठे आव्हान फडणवीसांपुढे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ठेवले आहे. तेंव्हा आता पुढेच खरी कसोटी लागणार आहे याची जाणीव “देवाभाऊं”ना ठेवावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *