सिंधुदुर्ग :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम ‘ मशीन ऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करावा या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात येत्या २०,डिसेंबर पर्यंत स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर,अभय शिरसाट,विजय प्रभू, आफ्रीन करोल,सरचिटणीस बाळू मेस्त्री आदी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम् ‘ मशीनच्या वापरामुळे
सर्वसामान्यांना,राजकीय विश्लेषकांना,सर्वानाच थक्क करणारा निकाल लागला आहे.संविधान दिनाच्या दिवशी काँग्रेस नेतृत्वानेही यावर संशय व्यक्त केला आहे.केवळ काँग्रेसच नव्हे तर अन्य विरोधी पक्षांनीही संशय व्यक्त करत ‘ ईव्हीएम ‘ वापराला विरोध केला आहे.
प्रगत देशांमध्येही निवडणुकांमध्ये मतदान पत्रिकेचा वापर केला जातो.तर मग आपल्या देशात का नाही…? आणि म्हणूनच काँग्रेस पक्षातर्फे, येत्या २० डिसेंबर पर्यंत ‘ईव्हीएम ‘ विरोधात देशभर स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
इथून पुढे ,सर्व निवडणुकांमध्ये मतदान पत्रिकांचा वापर करावा अशी लोकांचीही मागणी आहे असेही शेख यांनी स्पष्ट केले.