मुंबई : लोकप्रिय व कुस्ती प्रेमी आमदार .नरेंद्र मेहता यांचा नुकताच भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाल , पुष्पगुच्छ व फेटा बांधून मिरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष .मिलिंद लिमये , आखाड्याचे सर्वेसर्वा वसंतराव पाटील यांच्या हस्ते मेहता यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी उपस्थित असलेल्या मिरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक धृवकिशोर पाटील,ज्येष्ठ पत्रकार .देवेंद्र पोरवाल, माजी .नगरसेवक .भगवती शर्मा , कॅम्लीन इंडिया लिमिटेड चे सेल्स मॅनेजर .गिरीश बिवलकर आणि आमदार मेहतांचे सहाय्यक .नरेंद्र तावडे यांना देखील सन्मानित करण्यात आले.
या वेळी शालेय राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धेत पदकविजेते ओम जाधव, मनस्वी राऊत,डाली गुप्ता या पैलवानांचा देखील खास सत्कार करण्यात आला.
या सर्व पैलवानांचा सत्कार भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन आमदार मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वयाच्या १९ व्या वर्षी अग्निविर मध्ये भारतीय भुसेनेत भरती झालेला पै. करण डुमने यांचा देखील आमदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक .बलराज बागल सर यांनी केले.
