नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे लेखनिक तसेच तसेच त्यांच्या भजनातील श्रेष्ठ टाळकरी असलेल्या संत संताजी जगनाडे महाराजांनी ‘तेलसिंधु, ‘शंकरदीपिका’, ‘योगाची वाट’ असे स्वतंत्र ग्रंथलेखनही केले आहे. त्यांच्या ‘तेलसिंधु’ ग्रंथातून त्यांनी तेलाच्या निर्मितीचा व व्यवसायाचा आध्यात्मिक संबंध दर्शवित अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी नमुंमपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
