ठाणे महानगरपालिकेच्यावतीने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
