मुंबई : मुंबई विद्यापीठातफे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मल्लखांब पुरुष व महिला स्पर्धेत महिला गटात डहाणुकरच्या जान्हवी जाधव आणि पुरुष गटात रहेजाच्या ऋषभ गुबाडेने वैयक्तिक विभागात अव्वल क्रमांक मिळवला. सांघिक स्पर्धेत महिला गटात विद्यालंंकारने आणि पुरुष गटात डहाणुकरने विजेतेपद पटकावले ही स्पर्धा एल. एस. रहेजा महाविद्यालयात घेण्यात आली होती.
डॉ. मनोज रेड्डी, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ, डॉ.देबजित सरकार, प्राचार्य, एल. एस. रहेजा महाविद्यालय आणि श्री. गणेश देवरुखकर(द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त), स्पर्धा संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.
स्पर्धेचा वैयक्तिक निकाल …विजेते. ..
महिला गट जान्हवी जाधव (एम. एल. डहाणूकर महाविद्यालय)
पुरुष गट… ऋषभ गुबाडे (एल. एस. रहेजा महाविद्यालय)
सांघिक गट….
महिला …
१) प्रथम – विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
२) द्वितीय – एम. एल. डहाणूकर महाविद्यालय
३) तृतीय – भावन्स महाविद्यालय
पुरुष
१) प्रथम.. एम. एल. डहाणूकर महाविद्यालय
२) द्वितीय – अण्णा लीला महाविद्यालय
३) तृतीय – भावन्स महाविद्यालय.