– तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने ध्यान महोत्सवाचे आयोजन
पनवेल : राज भंडारी
‘हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल येथे दिनांक ८ डिसेंबर रोजी ‘रजत जयंती ध्यान महोत्सव सोहोळा’ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने , जे जे हॉस्पिटलचे माजी डीन तथा जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया टेकनिकल कमिटीचे चेयरमन पवन भोईर, तसेच निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. योगेश्वर दयाळ कौशिक यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला २५० पेक्षा अधिक साधक आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या विचारांतून उपस्थितांना संबोधित करताना मानव सेवा हि ईश्वर सेवा आहे म्हणून मानव सेवा करत असताना आपण ध्यान करत असू तर ते देवाकडे पोहोचते, या ताणतणावाच्या युगा मध्ये बरेचसे आजार शरीराला होत आहेत, अल्पवयात हार्ट अटकचे प्रमाण हि वाढले आहे, आजची पिढी मोबाईलच्या अती आहारी जात आहे आणि ध्यानधारणा हा त्यावरचा उत्तम उपाय आहे असे ते म्हणाले. पवन भोईर यांनी क्रीडा जगतात ध्यान किती आवश्यक आहे हे प्रतिपादन करून त्यांनी सर्वांना किमान अर्धा तास तरी मोबाईल दूर ठेवण्याचे आवाहन केले .
कार्यक्रमाची सुरुवात तेजज्ञान फाउंडेशनच्या विजेंद्र जैन यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून देत केली. तेजग्यान चे वक्ते प्रभात कोळवणकर यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे, असे समजावले. जीवनात ‘स्वल्पविराम’ घेण्याचे महत्व पटवून देत, “हातातील मोबाइल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास, ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा, ‘स्व-अनुभव’ होईल,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. “मी कोण आहे?” हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, ज्यातून उपस्थितांना ‘स्व-अनुभव’ मिळाला.
या कार्यक्रमाला २५० पेक्षा जास्त साधक आणि नागरिक सहभागी झाले होते. उपस्थितांनी मनोभावे कार्यक्रमाचा आनंद घेतला. पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी आपल्या विचारांतून उपस्थितांना संबोधित केले मानव सेवा हि ईश्वर सेवा आहे म्हणून मानव सेवा करत असताना आपण ध्यान करत असू तर ते देवाकडे पोहोचते म्हणून मानव सेवा करा .या ताणतणावाच्या युगा मध्ये बरेचसे आजार शरीराला होत आहेत,अल्पवयात हार्ट अटक चे प्रमाण हि वाढले आहे,आजची पिढी मोबाईलच्या अतिआहारी जात आहे आणि ध्यानधारणा हा त्यावरचा उत्तम उपाय आहे असे ते म्हणाले. ध्यानाचा प्रचार सगळीकडे केला पाहिजे आणि तेजग्यान फाउंडेशन हि संस्था हे कमी फार उत्तम प्रकारे करत आहे असे सांगून त्यांनी सर्वाना साधनेसाठी प्रेरणा दिली. पवन भोईर यांनी क्रीडा जगतातही ध्यान किती आवश्यक आहे हे प्रतिपादन केले व सर्वां किमान अर्धा तास तरी मोबाईल दूर ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजेंद्र जैन यांनी रंगतदार पद्धतीने केले आणि फाउंडेशनच्या २५ वर्षांच्या प्रवासाची ओळख श्रोत्यांना करून दिली. कार्यक्रमाच्या समारोपात, जवळपास सर्व उपस्थितांनी २१ दिवसांचे ध्यान चॅलेंज घेण्याचा संकल्प व्यक्त केला. याचबरोबर, तेजज्ञान फाउंडेशनतर्फे अशा प्रकारचे कार्यक्रम भारतातील सुमारे १२५ शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशभर ध्यानाच्या माध्यमातून शांतता आणि आनंदाचे सशक्त वातावरण निर्माण होत आहे.